एक शांत,संयमी आणी समाजकारणातुन राजकारणाची सांगड घालणार्या ‘सुनिल धनगर’ यांचा त-हाडी सर्कलमध्ये बोलबाला
जयश्री सुनिल धनगर यांनाच त-हाडी सर्कलमधुन उमेदवारीसाठी जनता आग्रही
त-हाडी:-शांत,संयमी,हसतमुख व्यक्तिमत्व आणि ऊच्चशिक्षित असलेल्या आपल्या सामाजिक कार्यातुन राजकारणाशी जोड घालुन जनतेतुन माजी सरपंच असणार्या जयश्री सुनिल धनगर यांचा होवु घातलेल्या जि.प.निवडणुकीसाठी त-हाडी सर्कलमधुन निवडणुक लढवावी असे सर्वधर्मीय मतदार साकडे घालत असुन अनेक दिग्गज पक्षही टिकीट घेण्यासाठी मनधरणी करत आहेत.जनतेचा आशीर्वाद मिळाल्यास नक्कीच त-हाडी सर्कलचा गड काबिज करण्याचा मानस राजकारणात सक्रीय असणारे सुनिल धनगर यांनी सांगीतले.
सदैव लोकहितासाठी सक्रीय असणारे आणी अल्पावधीतच गोरगरीबांच्या गळातला ताईत बनलेल्या सुनिल धनगर यांनी आपल्या मुस्सदी आणी लोकहितवादी कार्याचा परिचय देत आपल्या पत्नीला शिरपूर तालुक्यातील १०, हजारापेक्षाही लोकसंख्या असणार्या त-हाडी ग्रुप ग्रामपंचायत मधुन जनतेतुन सरपंचपदी विराजमान केले.तेवढ्याच विश्वासाने लोकांनी टाकलेला विश्वास आणी जबाबदारी धैर्याने पेलत विविध विकासकामाला चालना देवुन गावचे नंदनवन केले.यामुळे जनमानसात सुनिल धनगर यांचे नाव सर्वांच्या ओठी येत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले अशात पं.स.आणी जि.प.निवडणुकीचे आरक्षणही जाहीर झाले.त-हाडी सर्कल हे अनु.जाती महिलासाठी राखीव आले आणी सर्वांच्या मुखी ऊच्चशिक्षित जयश्री धनगर यांचे नाव एकमुखाने गुंजले.त-हाडी सर्कलमध्ये विकासकाम आणी सुस्वभावी व्यक्तीमत्व यामुळे आपल्या पक्षाकडुन सुनिल धनगर यांचे हात बळकट करुन जयश्रीताईलाच टिकीट द्यायचे यासाठी सर्व दिग्गज पक्ष संपर्क करत आहेत.जनतेचा आशीर्वाद आणी साथ मिळाल्यास जरुर आपन त-हाडी सर्कल काबिज करु असा विश्वासही यावेळी सुनिल धनगर यांनी व्यक्त केला आहे.
सुस्वभावी म्हणून जयश्रीताई आणी सुनिल धनगर हे सर्वांना परिचीत आहेत.शिरपुर तालुक्यातील राजकारणात आणी समाजकारणात सदैव अग्रेसर असलेल्या छोटेसे रोपटे त्याचा आज झालेला विशाल वटवृक्ष बनविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे .
व्यक्तिचे मन शुध्द असले की त्या व्यक्तिचा कोणीही शत्रु होवू शकत नाही . सर्वांनाच चांगल्या मनाच्या व्यक्तिशी मैत्री करावीशी वाटते.असे निर्मळ मनाचे व्यक्तिमत्व म्हणजे सुनिलभाऊ.निर्मळ मना बरोबरच सहनशीलता त्यांच्या अगदी रोमारोमात भरलेली दिसते.म्हणूनच त्यांना निर्मळ मन आणि सहनशीलतेचे धनी म्हंटले जाते .राजकारण आणि समाजकारण यामध्ये अतिशय उत्कृष्ठ कार्य करून त्यांनी आपल्या कामाचा एक आगळावेगळा ठसा जनमाणसात उमटविलेला आहे.अल्पावधीतच एक चांगला लौकीक प्राप्त करुन समाजात एक मानाचे.आदराचे स्थान त्यांनी मिळविलेले आहे.कुणाचीही मदत करण्याची नेहमीच त्यांची तयारी असते.इतरांच्या संकटात देखिल त्यांचा मदतीचा हात सदैव तयारच असतो .
सत्ता आणि संपत्तीचा हव्यास त्यांनी कधीच केला नाही.सामाजिक दातृत्वाच्या भावनेतून सतत निस्वार्थी काम करणारे सुनिल धनगर खरच एक आगळेवेगळे व्यक्तिमत्व म्हणून सर्वांना परिचीत आहेत .कमी बोलणे आणि सर्वांना आपलेसे करणे हा स्थायी भाव त्यांच्या अंगी असल्यामुळे सर्वांना त्यांचे व्यक्तिमत्व राजकारण्यांना मनापासून भावते.त-हाडी सर्कलमध्ये त-हाडी , ममाणे अभानपुर ,भटाणे, वरुळ, जवखेडा, जळोद ,सटीपाणी ,नवी अंतुली जुनी अंतुली ,त-हाडकसबे, लोढरे या सर्व गावातुन सर्व जातीतील मतदारांचा कौल घेतला असता सुनिल धनगर यांच्या सुविद्य आणी ऊच्चशिक्षित पत्नी जयश्री धनगर यांचे हात बळकट करुन त-हाडी सर्कलमध्ये ऊमेदवार म्हणून साथ देवू अशी सर्वांनी एकमुखाने मागणी केली आहे.
फोटो – जयश्री सुनिल धनगर


