अंतुलीत स्वच्छतेच्या घंटागाडीचे लोकार्पण
त-हाडी प्रतिनिधी : शिरपूर तालुक्यातील अंतुली येथील माजी शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल आमदार काशिराम पावरा, जिल्हा परिषद माजी उपअध्यक्ष देवेंद्र पाटील शिरपूरचे माजी नगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून व प्रधानमंत्री गैण खनिज योजना अंतर्गत विकास निधीतून लक्ष्मीपुजन दिनानिमित्तने (दि २१) संपूर्ण गावातील कचरा व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतीने नागरिकांसाठी नवीन घंटा गाडी उपलब्ध करून दिली. ग्रामपंचायतीचे कार्यालयासमोर अंतुली ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच आरती धर्मेंद्र ईशी , उपसरपंच .मुलचंद शिरसाट यांच्या हस्ते पुजा करून या घंटा गाडीचे लोकार्पण करण्यात आले.
अंतुली गाव कचरा मुक्तीच्या व स्वच्छतेच्या दिशेने वाटचाल करील अशी अपेक्षा कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती इंशेद्र ईशी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.यावेळी सरपंच आरती. ईशी,उपसरपंच मुलचंद शिरसाट, ग्रामपंचायत सदस्य धर्मेंद्र ईशी.गुलाब निकम , रविंद्र पवार , शिवाजी शिरसाट, लुका ईशी रविंद्र चव्हाण, चिंतामणी ईशी प्रभाकर ईशी प्रविण कोळी, बन्सीलाल ईशी धनराज ईशी राजेन्द्र उशी किसन ईशी संजय शिरसाट जितेंद्र ईशी अर्जुन ईशी ,
आदींसह ग्रामस्थ माेठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो. – अंतुली येथे ग्रामपंचायतीचे प्रधानमंत्री गैण खनिज योजना अंतर्गत स्वच्छतेच्या घंटागाडीचे लोकार्पण सरपंच आरती धर्मेंद्र ईशी उपसरपंच मुलचंद शिरसाट ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते


