जिल्हाधिकारी ठाणे यांना अंतिम निवेदन….
अंबरनाथ पूर्व व पश्चिम नगर परिषद हद्दी मध्ये अनधिकृत बेकायदेशीर विनापरवाना उभारलेले ढाबे, पानटपरी, स्टॉल, जुगार अड्डे, क्रिकेट फुटबॉल शेड टर्फ व इतर बांधकामे तोडून बांधकाम धारकांवर गुन्हे नोंद करून कार्यवाही करणे बाबत.
समाजसेवक केवल विकमनी यांचा गंभीर ईशारा/मनोगत
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
अंबरनाथ: मी आपणास लेखी तक्रार देतो की अंबरनाथ पूर्व व पश्चिम नगर परिषद हद्दी मध्ये पालेगाव, बारकुपाडा, शिवमंदिर परिसर, चिखलोली पाडा, टी जंक्शन, डिमार्ट जवळ, NMRL नेवल कंपनी जवळ, लोकनगरी परिसर असे अनेक ठिकाणी अनधिकृत बेकायदेशीर विनापरवाना उभारलेले ढाबे, पानटपरी, स्टॉल, जुगार अड्डे, क्रिकेट फुटबॉल शेड टर्फ हे सर्व अनधिकृत बेकायदेशीर विनापरवाना बांधकाम आहेत आणि कुठलीच शासनाची परवानगी न घेता ही बांधकामे केली आहेत. त्यात अंबरनाथ नगरपरिषद चे अधिकारी कर्मचारी यांनी सर्वांकडून हफ्तेवासुली करून सदरची बांधकामांना अभय दिले आहे. म्हणूनच आज रोजी पर्यंत त्या बांधकामांवर कुठली कार्यवाही झाली नाही. वारंवार आम्ही विविध संस्थेचे लोकांनी आवाज उठवून सुद्धा पैसे घेऊन भ्रष्टाचार करत कार्यवाही मात्र होत नाही असे दिसून येत आहे.
सदरच्या अनधिकृत बेकायदेशीर मध्ये ढाबे आणि क्रिकेट फुटबॉल टर्फ हे आहेत ज्यात रात्री उशिरा अंदाजे ३-५ वाजे पर्यंत सुरू असतात, ढाबे मध्ये जेवण सोबत दारू हुक्का चरस गांजा व इतर अमलीपदार्थ विक्री केले जातात ज्यातून तरुण मुले आणि मुली म्हणजेच तरुण पिढी हे व्यसनाधीन होत आहे. क्रिकेट फुटबॉल टर्फ शेड मध्ये पण रात्री क्रिकेट फुटबॉल खेळताना मुल आणि मुलगी हे दारू बियर सिगरेट गांजा चरस असे नशेखोरी पदार्थ सेवन करतात, हे सर्व त्या क्रिकेट फुटबॉल टर्फ मध्ये उपलब्ध असतात आणि तिकडून विकत मिळतात. यात मोठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे ढाबे किंवा क्रिकेट फुटबॉल बॉक्स शेड टर्फ असो हे १३०×७० फुटाचे बांधकाम आहे आणि ३० फूट इतकी याला उंची आहे शिवाय आतमध्ये एकही सपोर्ट नसून तरीही प्रशासनाने परवानगी दिली कशी, स्ट्रक्चरल ऑडिट आहे का ?? जर उद्या उठून जोरात पाऊस पडला किंवा तुफानी वारा आला त्यात ते शेड कोसळले आणि त्या वेळेस ढाब्यावर ४०-५० लोकं किंवा टर्फ मध्ये १५-२० लहान मुल मुलगी खेळ खेळत असतील आणि अशी मोठी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण राहणार ????
ठाणे जिल्हाधिकारी की अंबरनाथ नगरपरिषद कोण जवाबदारी घेणार ????
नंतर दुर्घटना मध्ये गंभीर जखमी किंवा मृत्यू झालेल्या लोकांना तुम्ही २ किंवा ५ लाख रुपये देणार या पेक्षा आधीच आपण दक्षता घेऊन सर्वच अनधिकृत बांधकामे तोडून साफ सफाई अभियान राबवून घ्यावा….
आज मी या पत्राद्वारे आपणास विनंती आणि सूचना करू इच्छितो की जर १५ दिवसांत आपण या अनधिकृत बेकायदेशीर विनापरवाना शेड धारकांवर कार्यवाही केली नाही तर उच्च न्यायालयात दाद मागण्यास जाणार आणि संबंधित सर्व अधिकारी कर्मचारी वर निलंबन ची कायदेशीर कार्यवाही करणार…., पुढील १५ दिवसांत जर कार्यवाही झाली नाही तर आम्ही सर्व सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते एकत्र मिळून ३००- ५०० लोक शांतपणे कायद्याने दिलेल्या अधिकारानुसार आंदोलन उपोषण मार्ग निवडून अंबरनाथ नगरपरिषद या भोंगळ भ्रष्ट लुटारू कारोबार बद्दल आवाज उठवणार आणि पर्दाफाश करून सर्व जनते समोर आणणार….
या पुढे आंदोलन उपोषण दरम्यान जर कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला तर त्याला जबाबदार हे ठाणे जिल्हाधिकारी व अंबरनाथ नगरपरिषद हे राहतील याची नोंद घ्यावी.


