राष्ट्रीय वयोश्री योजना !!
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई: माननीय खासदार गोपाळ शेट्टी व माननीय आमदार सुनील राणे यांच्या अथक प्रयत्नांनी ६० वर्षे पूर्ण झालेल्या जेष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणे देण्यात येणार आहेत.
आपल्या उपनगरातील मालाड ते दहिसर या विभागातील ६० वर्षे पूर्ण झालेल्या जेष्ठ नागरिकांचे जीवन सुलभ करण्यासाठी आवश्यक उपकरणे केंद्र शासनाच्या वतीने तपासणी करून मोफत वितरण करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रासह कार्यालयात संपर्क साधावा.
दूरध्वनी क्रमांक : ९०८२९८४२४४ / ८८७९९९७००८
आवश्यक कागदपत्रे :-
१) फोटो
२) आधार कार्ड
३) रेशन कार्ड
६० वर्ष पूर्ण झालेल्या वयस्कर नागरिकांसाठी सहाय्यक उपकरणे पुढीलप्रमाणे देण्यात येणार आहेत :-
- छडी
- एल्बो क्रचेज
- क्रचेज
- वॉकर
- ट्राय पॉड्स
- श्रवणयंत्र
- दाताची कवळी
- चष्मा
- डायबिटीज विशेष बूट
- व्हीलचेयर
- व्हीलचेयर कमोडसह
- कामोफवली खुर्ची
दिनांक : २५/०८/२०२१, वेळ :- ९ ते २
स्थळ :- आचार्य नरेंद्र विद्यामंदिर, वझीरा नाका, बोरिवली (प.), मुंबई.
या संधीचा ऊपयाेग घेण्याचे आवाहन शरी शिवानंद शेट्टी. मा. नगरसेवक यांनी केले आहे.







