*“बालविवाहमुक्त सांगलीसाठी सघन मोहीम!” –
डॉ. आंबेडकरशेती विकास व संशोधन संस्थेचा जिल्हा प्रशासनाला पाठिंब्याचा आग्रह*आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त सांगली जिल्ह्यात डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था बालविवाहाविरुद्ध सघन मोहीम राबवणार आहे. दिवाळीपासून प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी) पर्यंत ही मोहीम राबवली जाणार असून, यासाठी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी उपजिल्हाधिकारी मा. स्नेहल कनीचे मॅडम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे सर आणि महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पाटील मॅडम यांना निवेदन सादर केले
.या निवेदनात “बालविवाहमुक्त भारत” मोहिमेला एक वर्ष पूर्ण होत असल्याचे नमूद करत, सांगली जिल्हा प्रशासनाच्या नेतृत्वाखाली बालविवाह निर्मूलनासाठी विशेष जिल्हास्तरीय उपक्रम राबवण्याची मागणी करण्यात आली.संस्थेच्या संचालिका *प्रभा यादव* यांनी सांगितले की, “सरकार, पोलिस आणि समाज यांच्या एकत्र प्रयत्नांमुळे बालविवाह रोखणे शक्य झाले आहे. गेल्या दोन वर्षांत ‘जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन’ संस्थेने देशभरात सुमारे चार लाख बालविवाह रोखले आहेत.”निवेदनात जिल्हा प्रशासनाला परिपत्रक जारी करण्याची विनंती करण्यात आली आहे,
ज्यामध्ये पुजारी, मौलवी, पाद्री, विवाह हॉल, केटरर्स, बँड ग्रुप आदींनी बालविवाहास कोणतीही मदत केल्यास कठोर कारवाई करण्याचे निर्देश असावेत. तसेच, बालविवाहमुक्त पंचायतींची ओळख पटवून त्यांचा गौरव करण्याचीही सूचना देण्यात आली.संस्थेच्या कार्यकर्त्या *राजमती कांबळे, सपना कांबळे आणि परमेश्वर गोडबोले* यांनी ही मागणी प्रशासनासमोर मांडली.डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था ही “जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन” (JRC) या भारतातील २५० हून अधिक स्वयंसेवी संस्थांच्या नेटवर्कची भागीदार आहे, जी देशभरातील बालहक्कांसाठी कार्यरत आहे.संस्थेचा विश्वास आहे की, प्रशासनाच्या सक्रिय सहकार्याने *‘बालविवाहमुक्त सांगली जिल्हा’* हे स्वप्न लवकरच सत्यात उतरेल.


