• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

“जेंव्हा इंदिरा गांधींनी कर्मचाऱ्यांचे नाव घेऊन ख्यालीखुशाली विचारली”उमेश काशीकर यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
November 19, 2025
in Uncategorized
0
“जेंव्हा इंदिरा गांधींनी कर्मचाऱ्यांचे नाव घेऊन ख्यालीखुशाली विचारली”उमेश काशीकर यांचे मनोगत !!

“जेंव्हा इंदिरा गांधींनी कर्मचाऱ्यांचे नाव घेऊन ख्यालीखुशाली विचारली”

उमेश काशीकर यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा राजभवनाशी संबंध त्या पंतप्रधान होण्यापूर्वीपासून आला.

दिनांक ३० एप्रिल १९६० रोजी महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या राजभवन येथे झालेल्या शासकीय सोहळ्यात त्या पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यासह आल्या होत्या. त्यादिवशी मुंबईत झालेल्या पंडित नेहरूंच्या सार्वजनिक सभांमध्ये देखील त्या उपस्थित होत्या.

महाराष्ट्राच्या नकाशाच्या अनावरणाचा कार्यक्रम रात्री ११.३० वाजता सुरु झाला होता. त्यानंतर पंतप्रधान नेहरू यांनी रात्री बाराच्या ठोक्याला किंवा त्यानंतर काही मिनिटांनी राज्याच्या नकाशाचे अनावरण केले होते. या राज्यनिर्मिती सोहळ्याला इंदिराजी उपस्थित होत्या.

इंदिरा गांधी यांची दोन्ही मुले राजीव गांधी व संजय गांधी लहानपणी आईसोबत राजभवनात येत व येथील समुद्र किनाऱ्यावर खेळायला त्यांना आवडत, असे राज्यपालांचे सेवानिवृत्त कॉम्प्ट्रोलर जनार्दन संखे यांनी लिहिले आहे. संखे यांनी दोन्ही मुलांना अनेकदा मुंबईत फिरवले असल्यामुळे त्यांना इंदिरा गांधी व राजीव गांधी व्यक्तिशः ओळखत.

पंतप्रधान झाल्यावर काही वर्षांनी इंदिराजींना भेटण्यासाठी संपूर्ण चित्रपट सृष्टी राजभवन येथे अवतरली होती. हा फोटो मध्यंतरी सर्वत्र झळकला होता.

दिनांक ११ डिसेंबर १९७६ रोजी इंदिरा गांधी मुंबईत आल्या होत्या. त्या दिवशी तत्कालीन राज्यपाल नवाब आलियावर जंग यांच्या पत्नी झेहरा यांनी सुरु केलेल्या संस्थेचे उदघाटन त्यांनी केले होते. ‘नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटीज’ ही संस्था आजही वांद्रे येथे कार्यरत आहे.

जनार्दन संखे यांनी ‘आठवणीतील राजभवन’ या आपल्या पुस्तकात लिहिले आहे की संस्थेच्या उद्घाटनानंतर इंदिरा गांधी पुण्याला निघून गेल्या. परंतु त्याच दिवशी सायंकाळी राज्यपाल आलियावर जंग यांना राजभवन येथे हृदयविकाराचा तीव्र झटका आली आणि त्यातच त्यांचे निधन झाले.

इंदिरा गांधी पुण्याहून परत मुंबईला आल्या. राजभवनातील दरबार हॉल येथे त्यांनी नवाब आलियावर जंग यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.

अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीची चौकशी

सन १९८२ साली महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती गंभीर असताना इंदिरा गांधी खास त्यांना भेटण्यासाठी मुंबईला आल्या होत्या. त्यादिवशी त्यांचा मुक्काम थोड्याच वेळाकरिता राजभवनातील ‘जल किरण’ या अतिथीगृहात होता.

या दौऱ्यासंदर्भातील एक आठवण राज्यपालांचे निवृत्त जमादार विलास मोरे सांगतात:

“त्या दिवशी माझी पहिल्यांदा पंतप्रधान इंदिरा गांधी यांचेकडे सेवक म्हणून ड्युटी लागली होती. ‘जल किरण’ अतिथीगृह येथे इंदिरा गांधी यांचे आगमन झाल्यावर त्या कारमधून उतरताना त्यांचे सेवेसाठी हजर होतो. एक गोष्ट आजही आठवते; ती म्हणजे उतरल्या उतरल्या त्यांनी थोड्या अंतरावर उभे असलेल्या राजभवनातील दोन जुने बटलर – कैतान डिसुझा व रिकार्डो वाज – यांना नाव घेऊन ‘कैसे हो?’ असे विचारले. इंदिरा गांधी राजभवनातील कर्मचाऱ्यांना नावाने ओळखत होत्या, या गोष्टीचे आजही आश्चर्य वाटते.”

इंदिरा गांधी बरेचदा खुल्या कारमधून नागरिकांना अभिवादन करत जात असत अशीही आठवण मोरे यांनी सांगितली.

दिनांक १३ जानेवारी १९८१ रोजी इंदिरा गांधी यांनी राजभवनातील जुन्या दरबार हॉल येथे दिव्यांग व्यक्तींच्या कार्यक्रमाला संबोधित केले होते. यावेळी राज्यपाल ओ पी मेहरा व मुख्यमंत्री ए आर अंतुले हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. उद्योगपती एस.पी गोदरेज यांनी देखील इंदिराजींची भेट घेतली होती. या आठवणी छायाचित्र रुपाने उरल्या आहेत. आज इंदिरा गांधी यांची १०८ वी जयंती आहे.

Views: 53
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
निवडणूक म्हणजे लोकशाहीचा आधारस्तंभ

निवडणूक म्हणजे लोकशाहीचा आधारस्तंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)