प्रधानमंत्री किसान सन्मान योजना’ व ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेपासून वंचित असलेल्या शेतकर्यांना त्वरीत लाभ सुरू करा
विशाल कंरके यांची मागणी
त-हाडी:-प्रधानमंत्री किसान सन्मान योजना’ व ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेतील लाभापासून शिरपूर तालुक्यासह जिल्ह्यात हजारो शेतकरी वंचित राहिलेले आहेत.या वंचित असलेल्या शेतकर्यांना त्वरीत लाभ सुरू करून देण्यात यावा अशी मागणी मा.व्हा चेअरमन तथा सामाजिक कार्यकर्ते विशाल कंरके यांनी केली आहे
शेतकरी कुटुंबांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी दि. २१ फेब्रुवारी २०१९ पासून केंद्र शासन पुरस्कृत विषयांकीत योजना चालू झाली. याच धर्तीवर काही कालावधीनंतर राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना चालू केली. (पी. एम. किसान योजने अंतर्गत प्रती वार्षिक रक्कम रु. ६,०००/- लाभ (दर चार महिन्यानी २,०००/-) अशी वार्षिक समान तीन हप्ते पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे जमा केली जात असते.
पण मागील ३.५ वर्षांहून अधिक काळापासून हजारो वंचित लाभार्थ्यांचा लाभ देण्यात आले नाहीत, शासनाच्या ढिसाळ कारभारामुळे शोधता न येणारा लाभार्थी म्हणून त्यांना अपात्र ठरविण्यात आले.लाभ वंचित झालेल्या शेतकर्यांच्या वतीने त्यांना न्याय मिळावा म्हणून विशाल कंरके यांच्या मागणीनुसार आवश्यक ते सर्व दस्तऐवज, लाभ कार्यान्वीत करण्यासाठी शेतकर्यांनी संबंधित खात्यांकडे जमा केले,परंतु अनेकांना लाभ मिळाला नाही. शेतकयांच्या सहनशक्तीचा अंत न पहाता सर्व लाभ पुर्वलक्षी प्रभावाने त्वरीत कार्यान्वीत करण्यात यावेत.परतीच्या पावसामुळे व निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच शेतकऱ्यांची अतोनात हानी झाली आहे.पिकेही हातातून गेली आहेत.
गवत कुजल्यामुळे चाऱ्याचा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. अजून पंचनामे पूर्ण झालेले नाहीत,अजुनही काहींना नुकसान भरपाईही मिळालेली नाही. या प्रसंगी शासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून विषयांकित लाभ तत्परतेने त्यांना प्रदान करण्यात यावेत अशी मागणी विशाल कंरके यांनी प्रशासनाकडे केली आहे.


