धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने धर्मवीरांच्या शक्तिस्थळावर त्यांना अभिवादन !!
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
ठाणे: प्रताप सरनाईक फाउंडेशन व विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सर्व वैद्यकिय उपकरणांसहित सुसज्ज दोन कार्डियाक अँब्युलन्स, दोन ब्लड डोनेशन व्हॅन, कर्करोगाचे निदान जागेवर तात्काळ होण्याकरीता एक कर्करोग निदान व्हॅन व शितपेटीसह दोन मोक्षरथ अशा सर्व वैद्यकिय सुविधा ठाणेकर नागरिकांना २४ तास मोफत उपलब्ध होणार आहेत. आज या सर्व सुविधा उपक्रमांचा, वाहनांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री एकनाथ शिंदे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्ताने धर्मवीरांच्या शक्तिस्थळावर त्यांना अभिवादन करून हा कार्यक्रम झाला.
या सर्व आरोग्य सुविधा नागरिकांना वर्षभर व 24 तास विनामूल्य उपलब्ध असतील.







