चंद्रभान शर्मा कॉलेजमध्ये चार दिवसीय मेगा कल्चरल फेस्ट 2025–26 उत्साहात पार.
चंद्रभान शर्मा कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स (स्वायत्त), यांनी नुकताच चार दिवसीय मेगा कल्चरल फेस्ट 2025–26 मोठ्या उत्साहात आयोजित केला होता. ज्यात महाराष्ट्र राज्यातील मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील विविध महाविद्यालयांनी या सांस्कृतिक पर्वात सक्रिय सहभाग नोंदवला.
या फेस्टमध्ये द बिझ बझ (कॉमर्स), सिनर्जी (BCA), इम्पल्स (ज्युनियर कॉलेज) आणि टेक हेस्ट (IT) यांसारख्या विभागीय उत्सवांचा समावेश होता. अकाउंटिंग, फायनान्स, बँकिंग, मॅनेजमेंट, कोडिंग, अॅप डेव्हलपमेंट, टेक डिबेट आणि करंट अफेयर्स अशा विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आपले ज्ञान, कौशल्य आणि सर्जनशीलता प्रदर्शित करण्यासाठी उत्कृष्ट व्यासपीठ मिळाले.
कॉलेजमध्ये आयोजित टॅलेंट हंट – अंतर्गत महाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धा 2025 मध्ये संगीत, नृत्य, नाट्य आणि कला या विभागांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रभावी सादरीकरणे केली. या कार्यक्रमाचे उद्घाटन लोकप्रिय पार्श्वगायक आदर्श शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. तसेच व्यवस्थापक विश्वस्त श्री. प्रशांत जी. शर्मा आणि प्राचार्या डॉ. वैशाली राजपूत यांची उपस्थिती लाभली.
उत्सवाचा समारोप ख्वाहिश 2025–26 या राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाच्या भव्य बॅनर ड्रॉप सोहळ्याने झाला. “ऐसा देश है मेरा” हा वर्षाचा थीम या प्रसंगी अनावरण करण्यात आला. या समारंभाला श्री. कमलेश ठाकूर, श्री. शिव ठाकरे, श्री. मणि ममल्लन आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती लाभली. या सोबतच आयोजित कॉन्टिंजंट लीडर्स मीट मध्ये मुंबईतील असंख्य महाविद्यालयांच्या प्रतिनिधींनी विक्रमी नोंदणी केली.
राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सव ख्वाहिश 2025–26 दिनांक 19 आणि 20 डिसेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात येणार असून, यंदाचा उत्सव अधिक भव्य, अधिक आकर्षक आणि तरुणांच्या कलागुणांचा मोठा उत्सव ठरणार आहे.
— शुभम पेडामकर


