• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

‘हे’ ब्रिटिश गव्हर्नर होते मराठीचे उत्तम जाणकार…..उमेश काशीकर यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
December 20, 2025
in Uncategorized
0
‘हे’ ब्रिटिश गव्हर्नर होते मराठीचे उत्तम जाणकार…..उमेश काशीकर यांचे मनोगत !!

‘हे’ ब्रिटिश गव्हर्नर होते मराठीचे उत्तम जाणकार

उमेश काशीकर यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

मुंबई आणि मुंबई प्रांतापुरता विचार करताना सन १६६५ ते १९४७ या ब्रिटिश शासनकाळात काळात ईस्ट इंडिया कंपनीचे ४० गव्हर्नर झाले. यामध्ये काही थोड्या कालावधीकरिता ‘हंगामी’ गव्हर्नर देखील आले.

सन १८५७ सालच्या उठावानंतर एक वर्षाने कंपनी राजवट संपुष्टात आली आणि थेट ब्रिटिश राजवट सुरु झाली.

१८५८ ते १९४७ याकाळात मुंबई प्रांताचे २० ब्रिटिश गव्हर्नर होऊन गेले.

अश्या मुंबईच्या एकूण ६० गव्हर्नरपैकी काही गव्हर्नर मराठी भाषेचे उत्तम जाणकार होते, काही प्रयत्नपूर्वक मराठी शिकले आणि काहींनी मराठी भाषेतून प्रशासन आणि शिक्षण कार्याला चालना दिली.

पोर्तुगाली व इंग्रजांचा भाषा विषयक दृष्टिकोन

वास्तविक पोर्तुगालच्या वास्को द गामाने युरोप खंडातून भारतात येण्याचा समुद्री मार्ग शोधला. त्यानंतर पोर्तुगाली व्यापारी, शासक व धर्मप्रसारक सोळाव्या शतकाच्या सुरुवातीपासून भारतात आले. म्हणजे पोर्तुगीज इंग्रजांच्या फार अगोदर आले आणि गेलेही सर्वात शेवटी, म्हणजे १९६१ साली !

तरी देखील मराठी शिकण्याचा बाबतीत त्यांनी गंभीर प्रयत्न केल्याचे दिसत नाही.

“पोर्तुगालातून आलेल्या फिरंगी लोकांपैकी मराठी किंवा उर्दू भाषा शिकलेला कोणीच आढळत नाही. पोर्तुगालहुन आलेले फिरंगी पाच सहा पिढ्यांपासून गोव्यांत राहतात, परंतु त्यांस हिंदू लोकांचा धर्म म्हणून काय आहे हें अद्याप ठाऊक नाही व मराठी भाषेचा एक शब्दही समजत नाही”, असे ‘मुंबईचे वर्णन’ या पुस्तकाचे लेखक गोविंद नारायण माडगांवकर यांनी १८६३ साली प्रकाशित केलेल्या आपल्या पुस्तकात नमूद केले आहे.

मराठी भाषा शिकण्याच्या बाबतीत लेखक माडगांवकर इंग्रजांना धोरणी मानतात.

“इंग्रज लोकांचा दक्षपणा किती आहे तो पहा. प्रारंभापासून जेव्हा त्यांनी भरतखंडात सुरत, खंबायत, कोची इत्यादी ठिकाणी वखारी घातल्या होत्या, तेंव्हापासून कोर्ट ऑफ डैरेक्टर यांचा त्यांस असा हुकूम होता की, ज्या देशांत जाल, त्या देशाची भाषा पहिल्याने शिका. त्याबद्दल त्यांस वर्षासन सुद्धा मिळे.”

मराठीचे उत्तम जाणकार : गव्हर्नर माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन

ईस्ट इंडिया कंपनीच्या गव्हर्नरपैकी प्रसिद्ध गव्हर्नर माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन हे केवळ मराठी भाषा लिहू वाचू शकणारे उत्तम जाणकारच होते असे नाही, तर त्यांनी मराठी भाषेतून शिक्षणाला देखील चालना दिली.

एल्फिन्स्टन यांनी सुरुवातीला असिस्टंट व नंतर रेसिडेंट या नात्याने नागपूर, ग्वाल्हेर व अनेक वर्षे पुणे येथे काम केले. त्यामुळे त्यांनी आपल्या मुंबईच्या गव्हर्नर पदाच्या कार्यकाळात (१८१९-१८२७) प्रशासनात मराठी भाषेला प्रोत्साहन दिले. तसेच मराठी भाषेतून शिक्षणाला प्राधान्य दिले. सन १८२१ साली त्यांनी पुणे संस्कृत कॉलेज (पुढे डेक्कन कॉलेज) स्थापन करून भारतीय भाषा, इतिहास, तत्वज्ञान व उच्च शिक्षणाला प्रोत्साहन दिले. मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेज यांच्या नावाने सुरु करण्यात आले.

ईस्ट इंडिया कॉलेज मध्ये मराठी

ईस्ट इंडिया कंपनीने भारतात सेवेसाठी जाणाऱ्या युवा रायटर्सना (प्रशासकांना) प्रशिक्षण देण्यासाठी लंडनजवळ हेलिबरी येथे ‘ईस्ट इंडिया कंपनी कॉलेज’ची स्थापना केली. स्थापनेमध्ये कंपनीचे अध्यक्ष चार्ल्स ग्रांट यांचा हात होता. चार्ल्स ग्रांट यांचे चिरंजीव रॉबर्ट ग्रांट हे पुढे १८३५-१८३८ या कालावधीत मुंबईचे गव्हर्नर झाले.

मराठी भाषेचा अभ्यासक्रमात समावेश

ईस्ट इंडिया कंपनी महाविद्यालयातील अभ्यासक्रम व्यापक आणि भारतातील अपेक्षित जबाबदाऱ्यांना अनुरूप असा होता. त्यामध्ये राजकीय अर्थशास्त्र, इतिहास, गणित, नैसर्गिक तत्त्वज्ञान, अभिजात साहित्य, कायदा, मानवविद्या आणि भाषाशास्त्र यांचा समावेश होता.

भाषा अभ्यासक्रमात अरबी, उर्दू (हिंदुस्तानी), बंगाली, मराठी, संस्कृत, तेलुगू आणि फारसी या भाषांचा समावेश होता.

या महाविद्यालयात बंगाली, हिंदुस्थानी भाषा सुरुवातीपासून शिकविल्या जात होत्या, तर मराठी भाषा नंतरच्या काळात अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली.

प्रोफेसर एडवर्ड ईस्टविक यांनी सन १८४५ ते १८५८ या कालावधीत हिंदुस्तानी, हिंदी आणि मराठी भाषांचे प्राध्यापक म्हणून सदर महाविद्यालयात सेवा बजावली. सन १८५८ यावर्षी कंपनीने भारतातील गाशा गुंडाळला आणि कॉलेज देखील बंद झाले, असे उपलब्ध माहितीवरून दिसून येते.

हेन्री बार्टल एडवर्ड फ्रिअर

सन १८५८ साली कंपनी राजवट संपली. त्यानंतर चार वर्षांनी, हेन्री बार्टल एडवर्ड फ्रिअर (कार्यकाळ १८६२- १८६७) यांची मुंबई प्रांताचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली. फ्रिअर यांनी मुंबईला आल्यावर अगोदर मराठी भाषा शिकून घेतली.

त्यांचे चरित्र ‘लाईफ अँड कॉरस्पॉन्डन्स ऑफ सर बार्टल फ्रिअर’ (लेखक जॉन मार्टिनयु) मध्ये, गव्हर्नर बार्टल फ्रिअर यांनी ‘नरसोपंत तात्या लक्ष्मण’ या मराठी दप्तरदार अधिकाऱ्याकडून मुंबई विभागाच्या महसूल प्रशासनातील बारकावे समजून घेतले.

लेखकाच्या मते फ्रिअर नेहमी नरसोपंत तात्यांसोबत जमिनीवर बसत व त्यांना आदराने ‘काकाजी’ म्हणत !

याच काकाजींकडून गव्हर्नर बार्टल फ्रिअर यांनी मराठी भाषा शिकून अल्पावधीतच इतकी आत्मसात केली की सर्व पत्र व्यवहार ते कुणाच्याही मदतीशिवाय स्वतःच वाचू शकत.

फ्रिअर गव्हर्नर असताना मुंबई प्रांत मोठा असल्याने त्यांनी उर्दू – पर्शियन तसेच गुजराती आणि कानडी शिक्षक देखील ठेवले होते.

मुंबईला गव्हर्नर म्हणून येण्यापूर्वी बार्टल फ्रिअर हे सिंध प्रांतात कमिश्नर होते. तेथे त्यांनी प्रशासकीय सुधारणांशिवाय पर्शिअन ऐवजी सिंधी भाषेला प्रशासकीय कामकाजाची भाषा केली. त्यामुळे कराची येथे आजही फ्रिअर यांच्या नावाने ‘फ्रिअर हॉल’ नावाची ऐतिहासिक वारसा वास्तू उभी आहे. मुंबईतील फ्लोरा फाउंटन पूर्वी फ्रिअर फाऊंटन म्हणून ओळखला जायचा.

गव्हर्नर शिवाय काही इंग्रज मराठीच्या प्रेमात पडले. त्यांमध्ये जेम्स मोल्सवर्थ (लोक त्यांना आदराने मोलसर शास्त्री म्हणत !) आणि व्हॅन्स केनेडी यांचे नाव घेतले जाते.

Views: 25
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
‘मोरारजींची दारूबंदी आणि राज्यपालांचा ‘शेरलॉक होम्स’ !!’उमेश काशीकर यांचे मनोगत !!

'मोरारजींची दारूबंदी आणि राज्यपालांचा 'शेरलॉक होम्स' !!'उमेश काशीकर यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)