• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

साहित्यिक, समाजसेवक, माजी नसरसेवक व सेवा निवृत्त शिक्षक व कवी असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले शांताराम निकम यांचे मनोगत…. सॅल्युट दिलीप मालवणकर

माणगंगा by माणगंगा
December 21, 2025
in Uncategorized
0
मध्यवर्ती शाखा गमावलेली उल्हासनगर शिवसेना शाखा : २५ पैकी दोनच उरलेत………..एकाच शाखेत दोन भाऊ दोन सेना चालवतात, आहे की नाही गंम्मत……..ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!

साहित्यिक, समाजसेवक, माजी नसरसेवक व सेवा निवृत्त शिक्षक व कवी असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले शांताराम निकम यांचे मनोगत

सॅल्युट दिलीप मालवणकर

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

साहेब,आपल्या लेखांची खूपच मार्मिक आणि ओघवती भाषा आहे. काळजातून लिहिले आहे, शब्दही चपखल बसले आहेत. असे लिखाण ओढून ताणून करताच येत नाही, ते हृदयातून यावे लागते म्हणूनच ते इतरांच्या हृदयाला भिडते.

साहेब,तुम्ही अगदी तळमळीने सुरुवातीपासून लिहित आहात.आपला प्रत्येक लेख म्हणजे अग्निबाण आहे, तो वाचकांचे हृदय पेटवल्याशिवाय राहत नाही. तुमच्या लिखाणामुळे प्रतिस्पर्ध्याचे खूपच मतं कमी झाली आहेत. वाचकांनी तुमचे लेखन वाचून स्वतःचे मत बनवले आहे.

आपली लेखणी सिद्धहस्त आहे,हे शत्रूही मान्य करेल. कारण शत्रूही आपले लेख आवर्जून वेळ काढून वाचत असतो.कधीकधी आपल्या लेखातून शत्रू काही मुद्दे हेरून स्वतःमध्ये सुधारणा करत असतो.

आपले लेखन मुद्देसूद आणि कायद्याच्या भाषेत असल्यामुळे आपण कोणाच्या कचाट्यात सापडत नाहीत. लोक एखाद्या विशिष्ट व्यक्तीला घाबरून त्याच्याबद्दल, त्याच्या चुकीबद्दल दबक्या आवाजातही बोलायला घाबरतात.पण आपण समोरची व्यक्ती कोण आहे,किती मोठी हे याची भीडभाड न ठेवता, जे खरे आहे ते चव्हाट्यावर आणता. म्हणूनच तुमचा सर्वदूर दबदबा आहे.

आपल्या सिद्धहस्त लेखनातील एक टक्काही आमच्यासारख्यांना मिळाला तरी आम्ही त्याचे सोने केल्याशिवाय राहणार नाही.

आपल्याकडे प्रचंड माहितीचा साठा आहे.प्रमाणाशिवाय आपण लिहीत नाही. म्हणूनच आपल्या लेखातील एखादी चूक शोधण्यासाठी स्पर्धक किंवा शत्रू रानरान पछाडतो. पण दमछाक होण्याशिवाय त्याला काहीही भेटत नाही,ही खरी आपल्या लेखणीची ताकद आहे.ही ताकद सगळ्यांकडे असतेच असे नाही.आणि असली तरी ती वापरण्याची हिम्मत असेलच असे नाही.,

आपली लेखणी ही काही सिद्धहस्त लेखकांच्या पंक्तीला जाऊन बसली आहे.

आमच्यासारख्या ओढून ताणून लिहिणाऱ्यांना आपला हेवाच वाटत असतो.

खूप प्रसंग, घटना, आमच्या डोळ्यासमोर घडत असतात पण आम्हाला त्या शब्दबद्ध करता येत नाही.आणि आपण एक शब्दावरून भलामोठा लेख लिहिता तोही विविध उदाहरणे देऊन.

आपण फक्त विरोधातच लिहिता असे नाही,तर आपली लेखणी कर्तृत्ववान लोकांचे गुण सुद्धा तितक्याच आत्मीयतेने आणि तळमळीने गात असते. आपणास ही दैवी देणगी असावी इतकी ती सिद्घ आहे.

आपली टीका ही कामजोरांवर नसतेच तर ती असते समाजातील गुंड, भ्रष्ट्राचारी, देशाला लुटणाऱ्या लोकांविरुद्ध.

आपले लिखाण हे साहित्यिक भाषेचे मूल्यमापन करून केलेले असते.ना व्याकरणात चूक ,ना चुकीचा शब्द चुकीच्या जागी.

आपले लिखाण हे लिहायचे म्हणून लिहायचे असे नसते तर समाजातील वाईट प्रवृत्तीविरुद्ध असते.

आपल्या लिखाणामुळे जितके शुद्ध मनाचे वाचक आपले हितचिंतक झाले तितकेच वाईट वृत्तीचे वाचक शत्रुसुद्धा झाले आहेत.तरीही वयाची,वेळेची किंवा शरीराची तमा न बाळगता आपण लिहितच असता.

असा कोणता विषय आहे की जो आपण लिहिला नाही?

कोरोना काळात आपल्या वयाचे लोक अंथरून धरून ,घराला कडी कोयंडा लावून दिवस मोजत होते ,जगाची नाळ तोडून टाकली होती ,तेंव्हा आपली लेखणी दृष्ट प्रवृत्तीवर आणि कोरोनावर बेछूट वार करत होती.

शहरातीलच नाही तर देशातील अनेक चुकीचे विषय आपण लोकांच्या निदर्शनास आणले. पण कातडी बचाव असलेला समाज आणि स्वार्थी, डरपोक लोकांनी तुम्हाला साथ दिली नाही.पण आपण घेतलेला विषय कधीही अर्धवट सोडून दिला नाही. आपण उचललेल्या कितीतरी विषयांवर मांडवली करण्यासाठी आपणाकडे पैशाची पाकिटं आली पण आपण पैशापेक्षा तत्व मानलेत. इतरांसारखे एखादा विषय खुप ताणून नंतर तोडपाणी करून स्वतःचे घर भरले नाहीत.आपण आजही असे स्वार्थी आणि स्वयंघोषित नेते समाजात पाहतो की, एखादा विषय ताणून धरून मोठी तोडपाणी करून घ्यायची,विषय सोडून देऊन शांत बसायचे पण त्यांना त्या काळात ज्या सामान्य लोकांनी सहकार्य केलेले असते त्यांना वाऱ्यावर सोडून देतात.
अशा लोकांमुळेच भ्रष्टाचारी लोकांचे पेव फुटते. ते पैशावर सगळ्यांना मोजत असतात.पण त्यांना आपल्यासारखा खमक्या भेटतो आणि त्यांचे मनसुभे मोठ्या नुकसानीसह धुळीत मिसळतात.

साहेब, आपण लेखनासाठी सरकारी नोकरी सोडली,हे एक दुर्मिळ उदाहरण आहे .आपले लेखन म्हणजे नव पत्रकारांना शिकण्यासाठी दिलेली शिदोरी आहे.पत्रकार म्हणजे लोकशाहीचा तिसरा स्तंभ असतो. तो कसा असावा, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारा असावा.दबंगापुढे झुकणारा नसावा,आणि गरिबाला व
वाकवणारा नसावा याचे मूर्तिमंत उदाहरण आपण आहात.

आपण नोकरी केली असती तर आपण आज चांगली पेन्शन घेऊन राहिला असता.आपल्या कुटुंबाच्या ईच्छा पैशाच्या जोरावर पुरवल्या असत्या. आपणाकडे पैसा असता पण आपण विजनवसात गेला असतात.अनेकांसारखे आपण अमुक अमुक तारखेला इहलोकी जन्म घेतलात आणि अमुक अमुक तारखेला इहलोक सोडून गेलात.इतकेच आपल्या नशिबी राहिले असते तेही आपल्या कुटुंबापूरते. पण आपण केलेल्या त्यागाने एकतर आपला उपजत गुण जपता आला आणि समाजाची सेवा करता आली.

यापुढे जेव्हा केव्हा उल्हासनगरचा इतिहास लिहिला जाईल तेंव्हा आपण विशिष्ट लोकांच्या यादीत वरच्या स्थानी असाल आणि इतिहासकाराला आपण केलेली आंदोलने, त्याग,सहन केलेल्या हाल आपेष्ठा यासाठी अनेक पाने खर्ची करावी लागतील,हे निच्छित.

साहेब,आपण ज्यांच्यावर चांगले लिहिले,ज्यांच्या गुणांची कदर करणारे मोठमोठे लेख लिहिले त्याच लोकांवर त्यांच्या चुकीच्या धोरणावर टीकात्मक लेखन करताना नक्कीच आपणास दुःख झाले असेल.पण त्या व्यक्ती आपल्या खूप जवळच्या होत्या म्हणून आपण त्यांच्या चुकांवर पांघरून घातले नाही. या आपल्या स्वभावाबद्दल आपल्याला कडक सॅल्युट आहे.

मालवणकर साहेब,तुम्ही मला शाबासकी द्यावी, किंवा तुमच्याकडून काही मिळावे यासाठी हा लेखन प्रपंच खचितच केलेला नाही. तर तो मनातून आपोआप आला आहे.मनात साठवून ठेवता आला नाही म्हणून तो बाहेर आला आहे.

जे तुमचे गुण आहेत ते विरोधकांनासुद्धा आकर्षित करतात,विरोधक तुमचे लेख अगोदर वाचतात हे तुम्हाला माहित नसेल.तुमची साहित्यिक सोपी आणि मनाला भिडणारी भाषा वाचकांच्या मनावर राज्य करते,हे तुम्हाला सांगण्यासाठी म्हणून हा लेखन प्रपंच.आणि असेच प्रबोधनात्मक, निर्भीडपणे, सत्य लिहीत रहा ,हे सांगण्यासाठी हे कष्ट.

एकेकाळी तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे तुमचे जिवाभावाचे सहकारी, ज्यांचेज्ञ जाहीर गोडवे तुम्ही गायलेत, त्यांचे कर्तृत्व जनमानसात जाहीर केलेत. त्यांनी चूक केली तर तुम्ही त्यांनाही सोडले नाहीत. तर मी किस झाड की पत्ती.

मी जरी तुमच्या गुणांची महिमा गायली असेल तरीही माझें भविष्यात काही चुकले किंवा मी चुकीचा निर्णय घेतला तर तुम्ही माझ्या मानगुटीवर पाय ठेवायला कमी करणार नाहीत, कारण सत्याची कास धरणारे कोणाचीही हयगय करत नाहीत, कोणाला जवळ कोणाला दूर करत नाहीत.
हे माहीत असूनही मालवणकर साहेब तुमच्या धडाकेबाज, निर्भीड लेखणीला कडक सॅल्युट.

Views: 50
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
शिवसेना उबाठाच्या या अतिदारूण पराभवास जबाबदार कोण?निवडणुकीत पक्षांतर्गत विरोधकला कसे संपवायचे? याचे मासलेवाईक उदाहरण ! ज्येष्ठ पत्रकार .दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!

शिवसेना उबाठाच्या या अतिदारूण पराभवास जबाबदार कोण?निवडणुकीत पक्षांतर्गत विरोधकला कसे संपवायचे? याचे मासलेवाईक उदाहरण ! ज्येष्ठ पत्रकार .दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)