• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

राज्यपालांचे ‘हे’ पत्र संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील काळ्या अध्यायाचे स्मरण देते… !! उमेश काशीकर यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
December 25, 2025
in Uncategorized
0
राज्यपालांचे ‘हे’ पत्र संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील काळ्या अध्यायाचे स्मरण देते… !! उमेश काशीकर यांचे मनोगत !!

राज्यपालांचे ‘हे’ पत्र संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील काळ्या अध्यायाचे स्मरण देते… !!

उमेश काशीकर यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

दिनांक २१ नोव्हेंबर १९५५ रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील आंदोलकांवर झालेल्या पहिल्या गोळीबारात काही आंदोलक हौतात्म्यास प्राप्त झाले होते व अनेक जण जायबंदी झाले.

पोलिसांनी फ्लोरा फाउंटेन (पुढे हुतात्मा चौक) येथे जमलेल्या आंदोलकांना पांगविण्यासाठी हा गोळीबार केला होता. कालांतराने आंदोलन चिघळले व मुंबईत इतर ठिकाणी व मुंबई राज्यात देखील इतरत्र गोळीबार होऊन या लढ्यात एकंदर १०५-१०७ आंदोलकांना हौतात्म्य प्राप्त झाले, हे सर्वविदित आहे.

संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या या सुरुवातीच्या काळात मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई हे होते, तर राज्यपाल होते डॉ हरेकृष्ण महताब !

आंदोलन काळातील गोळीबाराच्या घटनांनंतर काही महिन्यांनी, दिनांक ३० ऑगस्ट १९५६ रोजी, राज्यपाल डॉ. हरेकृष्ण महताब यांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना एक पत्र पाठविले होते. हे पत्र राज्यपाल डॉ महताब यांनी पुढे आपले आत्मचरित्र ‘व्हाईल सर्विंग माय नेशन’ मध्ये प्रकाशितही केले.

पत्रात मुंबई प्रांतातील गोळीबाराच्या घटनांचा थेट कुठेही उल्लेख नाही.

परंतु सदर पत्र संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील आंदोलकांवर झालेल्या गोळीबाराशी संबंधित होते हे अगदी स्पष्ट आहे.

.३०३ रायफलचा वापर झाला नसता तर …..

पंतप्रधानांना उद्देशून लिहिलेल्या पत्रामध्ये राज्यपाल डॉ महताब म्हणतात:

“एका मुद्द्याकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो, तो म्हणजे जमाव पांगवताना पोलिसांकडून होणारा शस्त्रांचा वापर.

सध्या निःशस्त्र जमाव पांगवण्यासाठी पोलिसांकडून शक्तिशाली अश्या ३०३ रायफल्सचा वापर केला जातो.

अनेकदा अतिशय कमी अंतरावरून अशा रायफल्स वापरण्याची वेळ पोलिसांवर येते. याचा परिणाम असा होतो की अनेक लोक अत्यंत भीषण पद्धतीने मारले जातात—काहींच्या कवट्या उडून जातात, तर काहींची आतडे बाहेर येतात—आणि त्यामुळे जनतेला अत्यंत भयाण असे दृश्य पाहावे लागते.

मला शस्त्रांच्या वापराविषयी थोडीफार माहिती आहे आणि माझ्या मते, कमी अंतरावर मोठा जमाव पांगवण्यासाठी साध्या बंदुका पुरेशा ठरू शकतात.

साध्या बंदुकांचा वापर केल्यास मृत्यूदर खूपच कमी राहील आणि कोणत्याही परिस्थितीत असे भीषण दृश्य निर्माण होणार नाही.

निःशस्त्र जमाव पांगवण्यासाठी मुळातच ३०३ रायफल्सचा वापर करणे निंदनीय आहे.

अर्थात, जमावाकडे प्राणघातक शस्त्रास्त्रे आहे आणि मोठ्या प्रमाणावर अराजक निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे, अशी माहिती पोलिसांकडे असेल तर आणि तेव्हाच ३०३ रायफल्सचा वापर केल्या जावा.

अन्यथा निःशस्त्र जमावावर इतके शक्तिशाली शस्त्र वापरण्याचे काहीच प्रयोजन नाही.

याबाबत मी येथे अधिकाऱ्यांशी चर्चा करीत आहे; परंतु गृह मंत्रालयाने देखील या विषयाची तपासणी करून घ्यावी, अशी माझी नम्र विनंती आहे.

आपल्या देशातील सर्वसामान्य जनता स्वभावतः शांततावादी आहे आणि आंदोलकांची संख्या तुलनेने फारच कमी असते.

अशा परिस्थितीत जेव्हा त्यांना अत्यंत क्रूर पद्धतीने मारले जाते, तेव्हा जनतेची सहानुभूती आंदोलकांच्या बाजूने वळते.

आपल्या संदर्भित पत्रात आपण देखील या मुद्द्याकडे राज्य सरकारांचे लक्ष वेधले आहे.

अनुषंगाने, वापरल्या जाणाऱ्या शस्त्रांच्या प्रश्नाचाही विचार करून त्याची तपासणी करणे आवश्यक आहे.” (पत्राचा मुख्य मजकूर समाप्त)

Bombay 6,
30th August, 1956.

Your circular letter to the Chief Ministers No. 458-PMO/56 dated 26th August, 1956, precisely states the position as it exists in almost
every State. You have put the problems in their proper perspective and have clinched the issues so precisely that they cannot escape serious consideration of all those who are incharge of administration.

To one matter I would draw your attention and that is the question of the use of firearms by the Police when dispersing crowds. At present they use powerful 303 rifles to disperse unarmed crowds. Very often they are called upon to use such rifles at very short range. The result is that many are killed in a very bad way, the skulls of some being blown up, the entire intestines of others coming out, leaving a ghastly scene to the utter disgust of the public.

I know something about the use of firearms and I am inclined to think that ordinary guns will be sufficient to disperse large crowds at short range. The death rate would be much lower if ordinary guns are used and in no case would a ghastly scene be left behind. The use of 303 Rifles for dispersing unarmed crowds is prima facie reprehensible. Of course, if a report is received that the crowd is armed with deadly weapons and determined to create large-scale lawlessness, then and then alone may 303 rifles be used. Otherwise there is no point in using such a powerful weapon on unarmed crowds.

I am discussing this point with the officers here, but I would like you kindly to have it examined in the Home Ministry also. My point is that our general public are so pacifist in outlook and the number of demonstrators is so small in comparison that when they are killed in a bad manner, they arouse the sympathy of the public in their favour. You have also drawn the attention of the Governments to this aspect of the question in your letter under reference. Incidentally the question of weapons used should also be examined.

Yours sincerely,

(H. Mahtab)

Pandit Jawaharlal Nehru,
Prime Minister, New Delhi.

या पत्रातून संयुक्त महाराष्ट्र आंदोलन काळात झालेल्या गोळीबाराच्या घटनांची भीषणता लक्षात येते. त्याहीपेक्षा निःशस्त्र, शांततावादी आंदोलकांवर प्राणघातक शस्त्रांचा वापर झाला नसता, तर कदाचित इतक्या मोठ्या प्रमाणावर रक्तपात टाळता आला असता, हे प्रकर्षाने जाणवते.

असो. रायफलच्या विषयावर कालांतराने उच्चस्तरावर चिंतन झाले व .३०३ ही रायफल कायमची बाद करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या इतिहासातील एका अतिशय दुखद आणि दुर्दैवी अध्यायाची आठवण करून देणारे हे पत्र आहे.

Views: 63
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
मुंबईचे शिल्पकार नाना ऊर्फ जगन्नाथ शंकरशेठ…..जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचे मनोगत !!

मुंबईचे शिल्पकार नाना ऊर्फ जगन्नाथ शंकरशेठ.....जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)