ॲड विद्याताई मोटे यांचा पुणेतील नागरिकांशी संवाद
उपजीविका भागवण्यासाठी ग्रामस्थ पुण्यात स्थायिक
माणगंगा न्युज
नुकत्याच येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने साध्य फाउंडेशनच्या अध्यक्ष व ॲडव्होकेट विद्याताई मोटे यांनी उपजविका भागवण्यासाठी परगावी असणारे नागरिक, यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी संपर्क संवाद यात्रा सुरू केली आहे.

यामध्ये उपजीविका भागवण्यासाठी मुंबई पुणे येथे नागरिक स्थायिक झाले आहेत. अशा नागरिकाशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न साध्य फाउंडेशनच्या माध्यमातून होत आहे.
गावाकडे शेती आहे. पण सततचा दुष्काळ यामुळे या शेती वरती उपजीविका भागत नाही . कुटुंबाचा खर्च भागत नाही म्हणून अनेक तरुण युवक उपजीविका भागवण्यासाठी मुंबई पुणे येथे मिळेल ते काम करून उपजीविका भागवतात व तिथेच स्थायिक झाले आहेत. अशा गावाकडील कुटुंबाच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न साध्य फाउंडेशनच्या माध्यमातूनॲड. विद्याताई मोटे करीत आहेत.
नुकत्याच येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने विद्याताई मोटे यांचा मुंबई पुणे येथे दौरा सुरू असून अनेक नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांच्या अडचणी जागेवर सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. अनेक नागरिकांना त्यांच्याकडून मदतीचा हात मिळाला आहे व भविष्यातही मदत करणार असल्याचे ॲड विद्याताई मोटे यांनी सांगितले
या संवाद यात्रेत गावाकडील व मुंबई शहरातील तसेच पुणे शहरातील राहणाऱ्या नागरिकांच्या अनेक समस्या आहेत त्या समस्या स्वतः साध्य फाउंडेशनच्या अध्यक्ष विद्याताई मोटे उपस्थित राहून सोडवत आहेत त्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावर समाधान व्यक्त होत आहे.
यावेळेला एडवोकेट विद्याताई मोठे म्हणाल्या की निवडणुका येतात जातात निवडणुका होतच राहतात परंतु नागरिकांना आलेल्या अडचणी सोडवणे गरजेचे आहे, आणि त्या मी अनेक महिन्यापासून सोडण्याचा प्रयत्न करीत आहे .निवडणूक आहे म्हणून अडी अडचणी जाणून घेणे किंवा त्या सोडवणे हा माझा हेतू नाही .लोकांच्या कुटुंबातील अडचणी दुःख जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न मी करीत आहे असे यावेळी बोलताना म्हणाल्या.
याच अनुषंगाने गावाकडील पुणे येथे राहत असणाऱ्या नागरिकांचा मेळावा घेऊन संवाद साधला व त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला यावेळी हा संवाद मेळावा ॲड.विद्याताई मोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.


