• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

मुंबई महानगर पालिका निवडणूक 2026 च्या निमित्ताने जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचे मनोगत

माणगंगा by माणगंगा
January 2, 2026
in Uncategorized
0
मुंबई महानगर पालिका निवडणूक 2026 च्या निमित्ताने जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचे मनोगत

मुंबई महानगर पालिका निवडणूक 2026 च्या निमित्ताने जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचे मनोगत

जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.महाराष्ट्र विधानसभेच्या२०२४ च्या निवडणुकीत फक्त दहा मुस्लिम उमेदवार निवडून आले. त्यामध्ये तीन काँग्रेसचे, प्रत्येकी दोन समाजवादी पार्टीचे आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आले. तर उद्धव ठाकरेंची शिवसेना, शिंदेसेना आणि एआयएमआयएमचा एकेक उमेदवार निवडून आला. विधानसभेला एकूण ४२० मुस्लिम उमेदवार उभे होते, त्यापैकी २१८ अपक्ष होते.

केवळ मुंबईचा विचार केल्यास, २०१७ च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका या अभंग शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या विरोधात लढले होते. वीस वर्षानंतर हे प्रथमच घडले होते. त्याचवेळी अभंग शिवसेनेने अनेक मुस्लिमबहुल मतदारसंघांत चांगल्यापैकी मते मिळवली होती, पाहिजे. शिवसेनेची प्रतिमा मराठीवादी आणि हिंदुत्ववादी पक्ष म्हणून होती. २०१२ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले होते. त्यावेळी भाजप महाराष्ट्रात आणि केंद्रात सत्तेवर असल्यामुळे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची कसोटी होती.

एकेका जागेला महत्त्व होते. त्यावेळी शिवसेनेने पाच मुस्लिम उमेदवार, मुख्यतः मुस्लिमबहुल भागांत उभे केले. त्यामध्ये त्यांना जवळपास २० टक्के मते मिळाली. शिवसेनेतर्फे दोन मुस्लिम नगरसेवक निवडून आले. शिवसेना ही तेव्हादेखील भाजपशी लढत असल्यामुळे, मुसलमानांनी भाजपच्या विरोधात शिवसेनेला मते दिली. कारण संघ-भाजपाच्या संकुचित विचारसरणीला मुसलमानांचा तीव्र विरोध आहे. भाजप नेते आज मुस्लिमविरोधी वक्तव्ये करून (उदाहरणार्थ नितेश राणे नेहमी ‘हिरवे साप’ वगैरे शब्द वापरत असतात) हिंदूंची मते मिळवू पाहत असला, तरीदेखील भाजपने २०१७ मध्ये मुंबईत सहा मुसलमानांना पालिकेच्या रिंगणात उतरवले होते!

१९९२-९३ चा इतिहास मागे ठेवून अनेक मुसलमानांनी त्यावेळी शिवसेनेच्या बाजूने कौल दिला होता. वांद्रे येथील बेहरामपाडातून हाजी मोहम्मद हलीम खान आणि अंधेरी परिसरातील आंबोली येथून शाहिरा खान यांचा शिवसेनेतर्फे विजय झाला होता. बेहरामपाडासारख्या भागातून उद्धवजींच्या शिवसेनेचा विजय होणे, ही अत्यंत लक्षणीय गोष्ट होती. बेहरामपाडा हा पूर्णपणे मुस्लिम भाग. तो जरी मातोश्रीजवळचा परिसर असला, तरीदेखील तेथे शिवसेनेचे पूर्वी अस्तित्वदेखील नव्हते. उद्धव ठाकरे यांच्या अभंग शिवसेनेने तेथे गेल्या वेळच्या पालिका निवडणुकीत विजय मिळवला.आंबोलीमध्ये मुस्लिम, हिंदू आणि उत्तर भारतीय समाज. तेथेही शिवसेनेचा मुस्लिम उमेदवार विजयी झाला. म्हणजे उत्तर भारतीयांची संख्या भरपूर असूनही, त्यांनीदेखील शिवसेनेला काही प्रमाणात मते दिली. पूर्वी बेहरामपाडामध्ये काँग्रेस किंवा समाजवादी पार्टीचा विजय होत असे.

शिवसेनेला तेथे १००-२०० पेक्षा अधिक मते मिळत नसत. याखेरीज शिवसेनेने चंगेज जमाल मुलतानी या अपक्ष मुस्लिम उमेदवाराचा पाठिंबाही मिळवला होता. ते जोगेश्वरीमधून निवडून आले होते. त्यावेळी तीन मुस्लिम वॉर्डांमध्ये शिवसेनेचा पराभव झाला. तिथे सेनेने स्थानिक मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिलेले होते. त्या ठिकाणी एकूण मतदानाच्या दहा टक्के मते शिवसेनेला पडली होती. धारावीमधून शिवसेनेने शहनाज शेख यांना उभे केले होते. त्यांना एकूण मतदानाच्या ११%, म्हणजे २४३४ मते मिळाली. तेथे रेशमबानू खान या काँग्रेस उमेदवार होत्या. त्यांचा विजय झाला. त्यांना ७१३२ मते पडली. अंधेरी पूर्वेला नेहा खुर्शीद आलम शेख या शिवसेनेच्या उमेदवारास १४%, म्हणजे एकूण २९३४ मते पडली.

जब्बर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी उमेदवारापेक्षा केवळ एक हजार मते शिवसेनेच्या नेहा यांना कमी पडली.महाराष्ट्र विधानसभेत अस्लम शेख (काँग्रेस), अमीन पटेल (काँग्रेस), साजिद खान पठाण (काँग्रेस), साना मलिक (एनसीपी-अजित पवार), मुक्ती मोहम्मद इस्माइल (एआयएमआयएम), हसन मुश्रीफ (अजित पवार-एनसीपी), रईस शेख (समाजवादी पार्टी अबू आजमी समाजवादी पार्टी), अब्दुल सत्तार (शिंदेसेना) आणि हरून खान (उबाठा किंवा युबीटी) असे उमेदवार निवडून आले. दहापैकी पाच उमेदवार हे मुंबईचे निवडून आले. मुंबईत मुस्लिम मतदार १८ ते २० टक्के असून, ते अनेक वॉर्ड्समध्ये निर्णायक ठरू शकतात. विशेषतः दक्षिण मुंबई, भायखळा, मालाड, गोवंडी आदी भागांमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या जास्त आहे. ठाकरे बंधूंची युती ही मराठी मतदारांना एकत्र करण्यासाठी असून, मराठी मुस्लिम फॅक्टरचाही वापर केला जाऊ शकतो. ‘असेंडिया’ या कंपनीने एक सर्व्हे केला आहे. मुस्लिम मतदारांना ठाकरे बंधू एक झाले असून, महाविकास आघाडीच्या ब्रेकअपनंतर आगामी पालिका निवडणुकीत तुम्ही कोणाला पाठिंबा देणार? असा प्रश्न विचारण्यात आला. ६४% मुस्लिम मतदारांनी ‘काही सांगता येत नाही’ असे उत्तर दिले आहे.उद्धव यांची शिवसेना आणि मनसेच्या दृष्टीने ही बाब काहीशी चिंतेची आहे. आता त्या दोन्ही पक्षांना हिंदूंची देखील भरपूर मते मिळतात. तरीदेखील त्यांना या प्रश्नावर काम करावे लागेल.

खरे तर भाजपला हरवण्याच्या स्थितीत असलेला जो कोणी सशक्त उमेदवार असेल, त्याच्यामागे मुसलमान जनता उभी राहू शकते. २०१७ मध्ये भाजपचा पराभव उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर केला होता. उद्धवजींनी ‘करून दाखवले’ या थीमवर प्रचार केला आणि त्यांना यश मिळाले. उद्धवजींवर मुसलमानांचा विश्वास होता आणि मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीतसुद्धा मोठ्या संख्येत मुस्लिम हे उद्धव यांच्यामागे उभे असल्याचे दिसले. यावेळी मात्र काँग्रेस आणि वंचित आघाडी यांचे एक नवीन आव्हान ठाकरे बंधूंसमोर उभे आहे. त्यामुळे मुस्लिम मते ही विभागली जाण्याची शक्यता आहे. मात्र भाजपसमोर कोणता पक्ष वा आघाडी तगडे आव्हान देऊ शकते हा विचार करून, मतदार हे ठाकरे बंधूंना कौल देतात का, ते बघावे लागेल. याचे कारण काँग्रेस आणि वंचित आघाडी यांची मते एकमेकांना कितपत ट्रान्सफर होतील, याची शंका आहे. मुंबईमधील मुस्लिम समाजात वंचितचे तेवढे अस्तित्व नाही आणि काँग्रेस पक्ष मुंबईत अत्यंत दुबळा झालेला आहे. काँग्रेस-वंचित आघाडीबाबत काँग्रेसमध्येच मतभेद असल्याचेही दिसून आले आहे.

या सर्व गोष्टीचा मुसलमान समाज नक्कीच विचार करेल. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून करोनात केलेल्या कामामुळे मुस्लिम समाज अत्यंत प्रभावीत झालेला होता. पाच वर्षांपूर्वी मनसेने पाकिस्तानी व बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध मुंबईत आझाद मैदान येथे मोठा मोर्चा काढला होता. या मोर्चात हजारो लोक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, या मोर्चात मुस्लिम बांधवही उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. त्यावेळी देशातील मुस्लिम हा आमचाच असल्याचेही राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितले होते. ‘जो माझा देशप्रेमी मुसलमान आहे, जो माझा मराठी मुसलमान आहे, त्यांनीही जागरूक राहिले पाहिजे. जे काही चालले आहे, ते त्यांनीही पुढे येऊन सांगितले पाहिजे’, असे आवाहन त्यावेळी राज ठाकरे यांनी केले होते. मनसेचा हा मोर्चा मुस्लिम बांधवांविरुद्ध नसून, पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात असल्याचे राज ठाकरे यांनी निक्षून सांगितले होते. केवळ बांगलादेशी मुसलमानांनी नाही, तर नायजेरियन घुसखोरांनी वसई, विरार, मीरा भाईंदर येथे ऊतपात चालवला आहे, असेही राज म्हणाले होते. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. परंतु पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोर हे माझे बांधव नाहीत. ते भारतीय नाहीत, त्यांना या देशातून हाकललेच पाहिजे. कारण भारत म्हणजे काही धर्मशाळा नाही, असे उद्गार राज यांनी तेव्हा काढले होते. देशातील आणि येथील मराठी मुस्लिम हा आमचाच आहे,

असेही राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितले होते. आझाद मैदानासमोरील हिंसक आंदोलन व पोलिसांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ रझा अकादमीच्या विरोधात राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मोर्चा काढण्यात आला होता. तो रझा अकादमीच्या दादागिरीच्या विरोधात होता, मुस्लिमांच्या विरोधातील नव्हता. या मोर्चाबद्दल मनसेचे नेते शिरीष सावंत यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांविरोधातील खटला मुंबई उच्च न्यायालयाने आठ वर्षांपूर्वी रद्द केला होता. त्या प्रकरणात राज यांनाही सुदैवाने दिलासा मिळाला होता. मात्र रझा अकादमीच्या गुंडगिरी विरोधात भाजपने कोणतीही निषेधात्मक कृती केली नव्हती, हे विशेष.उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना मुसलमानांचे लांगुलचालन केले नाही. उलट कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ दिला नाही. हिंदू आणि मुसलमान यांच्यातील सलोखा कायम टिकवला. कल्याणकारी कार्यक्रम राबवताना हिंदू -मुस्लिम असा भेद केला नाही. आपल्या सर्वसमावेशक धोरणामुळे धार्मिक सौहार्द टिकवले. त्यामुळे मुसलमान, विशेषतः मुंबईतील लोकसभा आणि विधानसभेच्या वेळी, उद्धव यांच्या पक्षाबरोबरच राहिले, हे नोंदवले पाहिजे. भाजप जेव्हा मुस्लिम उमेदवार उभा करतो किंवा शिंदेसेना व अजितदादांचा पक्ष मुस्लिमांना तिकीट देतात, तेव्हा त्यास लांगुलचालन म्हणायचे का? त्यामुळेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र शक्तीमागे हिंदूंप्रमाणेच मुंबईतील मुस्लिम समाज उभा राहिला, तर त्यालाही लांगुलचालन म्हणता येणार नाही.

राज यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात आंदोलन केले आणि हे भोंगे न्यायालयाच्या आदेशामुळेच आता बंद झाले आहेत. त्यामुळे त्या मुद्द्यावरून मनसे विरोधात आग ओकण्याचे तसे कारण उरलेले नाही. शिवसेना-मनसे युतीमागे मराठी लोकांप्रमाणेच मोठ्या संख्येत मुस्लिमही उभे राहतील, असा अंदाज आहे. याचे कारण, भाजपाला समर्थ पर्याय म्हणून उद्धव यांची शिवसेना आणि मनसे हाच एकमेव पर्याय आहे. काँग्रेस-वंचित आघाडीपेक्षा या पर्यायास लोक अधिक पसंत करतील का, हे पाहावे लागेल.

Views: 33
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
आणि सर हॉरमसजी पिरोशॉ मोदी झाले मुंबईचे पहिले ऍक्टिंग गव्हर्नर उमेश काशीकर यांचे मनोगत !!

आणि सर हॉरमसजी पिरोशॉ मोदी झाले मुंबईचे पहिले ऍक्टिंग गव्हर्नर उमेश काशीकर यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)