राष्ट्रवादीचे राजू जानकर यांचा भाजपमध्ये प्रवेश.. आमदार पडळकर यांच्याकडून स्वागत
झरे, ता. आटपाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेश सरचिटणीस तथा युवा नेते राजू शेठ जानकर यांनी कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.
यावेळी माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर,युवा नेते बंडू शेठ कातुरे, तानाजी मामा यमगर, युवा मोर्चा खानापूर तालुका अध्यक्ष निलेश पाटील, बाळासाहेब मेटकरी, यशवंत मेटकरी, तालुका उपाध्यक्ष अजय पाटील, युवा नेते सागर सोनवले, रोहन कांबळे तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
हा प्रवेश म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या विकासाभिमुख धोरणांवर, स्पष्ट नेतृत्वावर आणि जनहिताच्या कार्यावर जनतेने व्यक्त केलेला विश्वास आहे. या सर्व नवप्रवेशी कार्यकर्त्यांचे भारतीय जनता पार्टी परिवारात मनःपूर्वक स्वागत असून, त्यांच्या सहभागातून संघटन अधिक मजबूत होऊन परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास आहे.


