पारेकरवाडीतील कार्यकर्त्यांचा भाजप मध्ये प्रवेश
पारेकरवाडी ता.आटपाडी येथील मा. उपसरपंच लालासाहेब डोंबाळे यांनी. भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केल्याने राजकीय समीकरण बदलले आहे.
माजो समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
या प्रवेशामुळे गावातील विकास, विश्वास आणि संघटन अधिक बळकट होणार आहे. भाजपच्या विकासात्मक विचारधारेवर विश्वास ठेवत लालासाहेब डोंबाळे यांनी हा निर्णय घेतला.
यावेळी भाजप नेते बंडू कातुरे, मदन कातुरे, उत्तम बरकडे, आप्पा बरकडे, अंकुश डोंबाळे, सचिन खिलारी, दशरथ चवरे, सुरेश भानुसे, मारुती पाटील तसेच अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


