नियोजन समितीचे सदस्य लक्ष्मण सरगर यांचा भाजपला पाठिंबा
आटपाडी तालुक्यातील धनगर समाजाचे नेते व रा.स.प चे माजी जिल्हाध्यक्ष, सांगली जिल्हा नियोजन समिती सदस्य .लक्ष्मणभाऊ सरगर यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थित त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसह साथीदारासह भारतीय जनता पार्टीला बिनशर्त पाठिंबा दिला.सरगर यांनी पांठीबा दिल्याने भाजप ची ताकत वाढली असून साध्य स्थितीला तालुक्यात भाजप नंबर एक चां पक्ष बनला आहे.


