मा. अजितदादा पवार यांचे आज बारामती येथे विमान लँडिंग होतं असताना झालेल्या अपघातात अकाली दुःखद निधन झाले
ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, उल्हासनगर यांचे मनोगत !!जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
तळागाळातील जनतेशी नाळ जोडलेला, स्पष्टवक्ता व दूरदृष्टी असलेला नेता, ज्यांनी सहा वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम केला, ज्यांचा राजकारणावर जबरदस्त पगडा होता, लाडकी बहीण योजनेचे जनक व बारामतीचे भाग्यविधाते अशी ओळख असलेले चतुरस्त्र व्यक्तिमत्व असलेल्या अजितदादा पवार यांचे अकस्मात निधन झाले.
शरद पवारांचा हात धरून राजकारणात प्रवेश केलेले अजितदादा पवार राजकारणात चार पावले पुढे गेले होते, मुख्यमंत्री पदासाठी लागणारे सर्व गुण असूनही मुख्यमंत्री पदाने त्यांना अखेर पर्यन्त हुलकवणी दिली. शरद पवारांना आत्ता वय झालं तुम्ही राजकारण आमच्यावर सोपवून सल्लागार म्हणून रहा! असे सांगणारे अजितदादा आज अचानक अपघातात बळी गेले. त्यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राने एक उमद्या, स्पष्टवक्त्या, हजरजबाबी, नेता गमावला.अजितदादा पवार यांची व माझी दोन वेळा भेट झाली होती. एकदा मंत्रालयात तर एकदा राष्ट्रवादी पक्षाच्या मुंबई येथील कार्यालयात. भेटीची वेळ सकाळी सातची होती. इतका कार्यतत्पर नेता दिघे साहेबांखेरीज अजितदादाच होते अन्य माझ्या पाहण्यात नाही. उल्हासनगर महानगर पालिकेतील वादग्रस्त जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे प्रकरणी अजितदादा यांची भेट घेताच त्यांच्या कार्यतत्परतेचा अनुभव आला होता. आमच्या समोरच त्यांनी महापालिका आयुक्तांना फोन लावून निर्देश दिले होते. (वरील छायाचित्र त्याच वेळचे असून त्यांच्या समोरील ही भदाणे प्रकरणाची आहे.)कार्यक्षम उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांना अन्याय विरोधी संघर्ष समितीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.


