* कंचनपूर येथील सेवानिवृत्त जवान जितेंद्र पाटील यांचा सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न *.
डोंगरगाव( प्रतिनिधी )आर आर पाटील == शिंदखेडा तालुक्यातील कंचनपुर येथील कै , लक्ष्मण सुकलाल पाटील या शेतकऱ्याचे ते सुपुत्र होते जितेंद्र पाटील यांनी भारतीय सैन्य दलात सतत 22 वर्षे प्रदीर्घ सैन्य दलात राहून उत्तम प्रकारे देशाची सेवा केली त्यांची गावात व परिसरात वागणूक गोड असल्यामुळे मनमिळाव स्वभावामुळे दिनांक 7/2/2026 रोजी ग्रामस्थांनी आणि परिवाराने त्यांच्या सेवा पूर्ती गुणगौरव कार्यक्रम आयोजित केलेला होता
या दिवशी सहवाद्यासह सैन्य दलाच्या गाडीवरून जितेंद्र पाटील यांची सपत्नीक वालखेडा गावापासून संपूर्ण कचनपूर गावात स्वागत सत्कार करत मोठ्या आनंदात मिरवणूक काढून त्यांच्या राहत्या निवासस्थानी मंडपात सेवापूर्ती चा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी नातेवाईक ग्रामस्थ पंचक्रोशीतील राजकीय सामाजिक इतर सर्व क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती यावेळी आयोजकांनी स्नेहभोजनाचा कार्यक्रम देखील आयोजित केलेला होता जितेंद्र पाटील यांच्या कार्यातून तरुण युवकांना देश सेवा करावी अशी प्रेरणा मिळाली


