• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

मुंबईफाइल्स जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचे मनोगत जगदीश का. काशिकर,

माणगंगा by माणगंगा
February 8, 2026
in Uncategorized
0
मुंबईफाइल्स जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचे मनोगत जगदीश का. काशिकर,

मुंबईफाइल्स जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचे मनोगत जगदीश का. काशिकर,

मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.गेल्या आठवड्यात दादरच्या गोखले रोडवरून जात असताना नेहमीप्रमाणे वाटेत कित्तेभंडारी हॉल लागला. त्यावेळी आठवण झाली ती साने गुरुजी कथामालेची. याचे कारण, या कथामालेचा शुभारंभ हा १९५१ साली कित्तेभंडारी हॉलमध्ये झाल्याचे मला माहिती होते.

गुरुजींचे जीवनस्नेही आणि गांधीवादी विचारवंत आचार्य भागवत यांनी कथा निवेदनाने या कथामालेचे उदघाटन केले होते, हे मी ऐकले होते. प्रकाशभाई मोहाडीकर यांना साने गुरुजी कथामालेची कल्पना सुचली. या कथामालेचे कार्यालय रानडे रस्त्यावर ज्या एका ठिकाणी होते, ती जागा माझे वडील स्व. वसंतराव देसाई यांची होती.

ती जागा त्यांनी त्यांना वापरायला दिली होती. १९५० च्या दशकात ते मुंबईमध्ये राहत असताना, त्याच परिसरात एका गच्चीवर छोट्याशा खोलीत राहत होते. यशवंत क्षीरसागर हे साने गुरुजी कथामालेचे निष्ठावंत कार्यकर्ते. ७ व ८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईत गवालिया टॅंक मैदानावर काँग्रेसचे महाअधिवेशन भरले होते. साने गुरुजी ज्यांना मानत, त्या महात्मा गांधी यांनी त्यावेळी स्फूर्तिदायक भाषण केले आणि ‘चले जाव’ चा नारा दिला.

९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी शिवाजी पार्क मैदानात कस्तुरबा गांधी भाषण करणार आहेत असे वृत्त पसरल्यामुळे, हजारो लोक शिवाजी पार्कमध्ये गोळा झाले. कित्ते भंडारी हॉलपासून हाकेच्या अंतरावरच शिवाजी पार्क आहे आणि या हॉलच्या आसपास देखील प्रचंड मोठा जमाव होता. कस्तुरबा काय सांगणार, हे ऐकण्यासाठी लोक उत्सुक होते. परंतु शिवाजी पार्कला पोलिसांनी वेढा घातला होता. त्यावेळी लोक संतप्त होऊन निदर्शने करत घोषणा देऊ लागले. तेव्हा माहीम टेंभी गावचा वामन देवजी तांडेल हा मच्छिमार युवक त्याच जमावत सामील झाला होता. तेथूनच लोकांची प्रक्षोभक निदर्शने सुरू झाली. मुंबईतील या निदर्शनात पालघर जिल्ह्यातील अधिवेशनाला गेलेल्या काही मंडळींनी सहभाग नोंदवला घेतला होता. तेथे झालेल्या गोळीबारात तो हुतात्मा झाला. या आंदोलनात देशासाठी आपल्या प्राणाचे बलिदान करणारा तो पालघर तालुक्यातील हा पहिला हुतात्मा होय. वामन तांडेल हा ३४ वर्षांच्या आसपासचा तरुण होता

. तो तेव्हा मुंबईच्या रेल्वेमध्ये सुतार म्हणून काम करत होता. त्यानंतर बढती मिळून तो फोरमन झाला आणि तो माहीम टेंभी येथे येऊन-जाऊन राहत होता, अशी हकीकत. पंढरीनाथ तामोरे यांनी आपल्या ‘आदर्शाचे प्रकाशदीप’ या पुस्तकात नोंदवली आहे. तामोरे हे ‘दर्याचा राजा’ या नियतकालिकाचे संपादक आहेत. मगाशी ज्या कित्ते भंडारी हॉलचा उल्लेख केला, त्या हॉलमध्ये इतर नेत्यांच्या देखील अनेक सभा झालेल्या आहेत. शिवाजी पार्कचे ऐतिहासिक महत्त्व लोकांना माहीतच आहे. या हॉलच्या मागच्या गल्लीमध्ये माधव मनोहर राहत असत. आणि एक दिवस त्यांच्याकडे गेल्याचे आठवत आहे. त्यांच्या घरासमोरच पन्नास वर्षांपूर्वी ‘सोबत’ साप्ताहिकाचे संपादक ग. वा. बेहेरे यांना शिवसैनिकांनी मारहाण केली होती. या बेहेरे यांच्या साप्ताहिकात त्यावेळी मी लिहीत असे.याच गल्लीत एका कॉर्नरला माधव मनोहरांच्या घराच्या समोरच ‘शंकर निवास’ या इमारतीत सुधीर फडके राहत असत. त्या घरी श्रीधर फडके यांना भेटण्यासाठी सुमारे दोन दशकांपूर्वी गेल्याचे आठवते. या गल्लीमध्येच आजही ‘वसंत वाचनालय’ सुरू आहे.

दादर पश्चिमेला पूर्वी देखील फार वाचनालय होती, असे नव्हे. परंतु मी मुंबईला आलो, तेव्हा दादर पोर्तुगीज चर्चसमोरच्या कॉर्नरला पूर्वी ‘गणेश वाचनालय’ होते.मी १९७८ साली मुंबईला आल्याबरोबर दादर सार्वजनिक वाचनालयाचा सदस्य झालो आणि नंतर २०-२२ वर्षांनी त्या वाचनालयाचा, म्हणजेच ‘दासावा’चा उपाध्यक्ष झालो. तेव्हा अध्यक्ष सुधीरभाऊ जोशी हे होते. आमच्या वाचनालयाची एक सहल दिवे आगर येथेही गेली होती. मी देखील तिथे गेलो होतो. दादरप्रमाणेच माहीम सार्वजनिक वाचनालय देखील उत्कृष्ट आहे. ४०-४५ वर्षांपूर्वी तेथेही कधी कधी जाऊन वर्तमानपत्रे वाचल्याचे आठवते. कारण शिवाजी पार्क जवळच अल्ट्रा हाऊसिंग सोसायटीमध्ये माझे मामा राहत असत.

त्याच सोसायटीत प्रसिद्ध पटकथा लेखक आणि ‘सत्यकथे’चे पहिले संपादक ग. रा. कामत राहत असत. त्यांच्याकडे एकदा गप्पा मारण्यात काही तास कसे निघून गेले. हे समजले देखील नाही… कामत यांच्या बाल्कनीत कावळे येत असत आणि त्यांच्यावर कामत व त्यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री रेखाताई त्यांचे खूप प्रेम होते… अगदी लहानपणी मी जेव्हा आईबरोबर मुंबईला येत असे, तेव्हा शिवाजी पार्क जवळच्या सेनापती बापट पुतळ्याजवळ सायकलचे एक दुकान होते. तिथे भाड्याची सायकल घेऊन शिवाजी पार्कमध्ये ती चालवायला गेल्याचे देखील आठवते

.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्या गल्लीत कदम मॅन्शनमध्ये राहत असत, तेथून दोन बिल्डिंग सोडून माझा मामा राहत असे. त्या गल्लीचे टोक तिथेच संपते. ती गल्ली अत्यंत शांत होती. त्या काळी ‘मार्मिक’ गाजत होता. रमेश ठाकरे ‘आरोळी’ नावाचे साप्ताहिक काढत असत. शिवाजी पार्क समोरच्याच महात्मा गांधी तरण तलावात पोहण्यासाठी शशी कपूर आपल्या मुलांना घेऊन तिथे येत असे. ‘मिस्टर अँड मिसेस 55’ मधील ‘ठंडी हवा काली घटा आ ही गयी झुमके’ या गाण्याचे शूटिंग या तलावातच झाले आहे….

दादर, माटुंगा आणि आगर बाजार परिसरात पूर्वी वाड्या होत्या आणि आंटीचे अड्डेही… आगर बाजारमध्येच प्रसिद्ध समीक्षक स. गं. मालशे राहत असत. पोर्तुगीज चर्चजवळच्या ‘सहकार निवास’ सोसायटीत मी पेईंग गेस्ट म्हणून राहत असे. माझ्यासमोरच्या फ्लॅटमध्ये राजकपूरच्या बरसात, आवाराचे लेखक व्ही.पी. उर्फ वसंत साठे त्याचप्रमाणे हिंदी गीतकार आणि पटकथा लेखक वसंत देव राहत होते. ना. सी. फडके यांचे चिरंजीव विजय हे देखील त्याच सोसायटीत राहत. तिथून जवळच जयवंत दळवी राहत. येताजाताना पिशवीतून ते मासळी वा भाजी घेऊन जाताना दिसायचे… अविस्मरणीय दिवस… (सोबतचा फोटो ‘सोबत’कार ग. वा. बेहेरे यांचा)

Views: 55
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
माता रमाईंचा त्याग आजच्या स्त्रियांसाठी आदर्श – डॉ. सुप्रिया कदम-साळुंखेआटपाडीत माता रमाबाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; खरात साहेबांच्या पुढाकाराचे कौतुक

माता रमाईंचा त्याग आजच्या स्त्रियांसाठी आदर्श - डॉ. सुप्रिया कदम-साळुंखेआटपाडीत माता रमाबाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; खरात साहेबांच्या पुढाकाराचे कौतुक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)