• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

अखेर दोन हल्लेखोर पोलिसांच्या जाळ्यात : विठ्ठलवाडी पोलिसांची अभिमानास्पद कामगिरी ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, उल्हासनगर यांचे मनोगत

माणगंगा by माणगंगा
February 13, 2026
in Uncategorized
0
शेवटी देवाक काळजी !ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, उल्हासनगर यांचे मनोगत !!

अखेर दोन हल्लेखोर पोलिसांच्या जाळ्यात : विठ्ठलवाडी पोलिसांची अभिमानास्पद कामगिरी ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, उल्हासनगर यांचे मनोगत !

!जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७. गेल्या पाच फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता माझ्यावर तीन अज्ञात हल्लेखोरांनी मला रस्त्यात अडवून भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्याचे पडसाद महाराष्ट्रात पसरले होते. तसेच प्रसिद्धी माध्यमानेही याची गंभीरपणे दखल घेतली होती. मारेकरी हे नंबर प्लेट नसलेल्या स्कूटर वरून आल्याने त्यांची ओळख पटवणे हे अवघड काम होते. CC फुटेज मध्ये ते दिसत असले तरी त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नसल्याने त्यांना शोधणे हे खूप कठीण काम होते. परंतु या बाबतीत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक कोळी साहेब हे सुरुवातीपासून सकारात्मक होते. मला त्यांनी आस्वस्थ केले होते की, हल्लेखोर कुठेही पळून गेले तरी आम्ही त्यांना अटक करणार! याबाबतीत ते माझ्या सतत संपर्कात होते

. वेळोवेळी प्राप्त होणारे CC footege मला दाखवत होते. त्यामुळे अशोक कोळी साहेबांच्या कार्यपद्धतीवर आणि प्रामाणिकपणावर माझा ठाम विश्वास बसला होता. काल रात्री त्या हल्लेखोरांपैकी दोन हल्लेखोरांना अटक करण्यात आली. आणि त्यांनी मी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला. याबद्दल सर्वप्रथम विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री कोळी साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो. हा हल्ला माझ्या निर्भीड पत्रकारितेमुळे ज्यांना हानी पोहोचली अशा स्थानिक राजकारण्यांनी घडवून आणला, हे माझे सुरुवातीपासूनचे ठाम मत होते. हाती आलेल्या माहितीनुसार वरील दोन्ही आरोपी हे सुपारीबाज असल्याचे सिद्ध होत असून त्यांनी रेकी करून नियोजन बद्दरित्या सूत्रधाराने आखलेल्या कटानुसार माझ्यावर हल्ला घडवून आणला.

या दोन मारेकरांपैकी एक जण लालचक्की या माझ्या विभागातील तसे दुसरा कोळशेवाडी विभागातील असल्याचे समजते. यावरून या हल्ल्याचा सूत्रधार हा उल्हासनगर महापालिका हद्दीतील व कल्याण लोकसभा मतदारसंघातील आणि विशेषता कल्याण विधानसभा मतदारसंघातील असावा, या माझ्या संशयाला दुजोरा मिळत आहे. ज्या तिसऱ्या व्यक्तीने माझ्यावर हल्ला केला तो सध्या फरार आहे. आरोपींना अटक झाली आहे, मात्र त्यामागील सुत्रधार रेकॉर्डवर येणे जिकरीचे व महत्त्वाचे काम आहे. सूत्रधार आपले राजकीय वजन वापरून स्वतःला या प्रकरणापासून वाचविण्याचा प्रयत्न करू शकतो. तरी देखील विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या तपास अधिकाऱ्यांवर माझ्या पूर्ण विश्वास आहे की, ते गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या सूत्रधारला संरक्षण देणार नाहीत. या दोन आरोपीना कायद्यानुसार अटक करून न्यायालयात हजर केले जाईल व पुढील चौकशीसाठी रिमांड घेतला जाईल, त्यातून सर्व सत्य बाहेर आले पाहिजे. या मारहाणीत माझ्या हातात असलेली सुमारे तीन लाख किमतीची ब्रेसलेट देखील गहाळ झाली आहे. मारहाणीत माझ्या घड्याळाच्या पट्ट्याचे तुकडे तुकडे होऊन हातात घुसल्याने हाताला जखम झाली आहे. तसेच मला मारहाण करून पाडण्यात आले व नंतर पुन्हा बेदम मारहाण करण्यात आले त्यात माझ्या डाव्या हाताच्या खांद्याला दोन ठिकाणी fracture झाले आहे. त्यामुळे दोन महिने माझ्या हालचालीवर बंधन येणार आहे. या हल्ल्यामुळे मी मुळीच घाबरलेला नाही व माझे पत्रकारितेचे मिशन अजिबात थांबणार नाही. मी अनिष्ट प्रवृत्ती विरोधात सतत लढा देत राहीन.

या प्रकरणी या हल्ल्यानंतर ज्या ज्या हितचिंतकांनी मला प्रत्यक्ष रुग्णालयात व घरी येऊन सहृदयपणे भेट दिली त्यांचा मी अत्यंत ऋणी आहे. आजकालचे राजकारणी हे असहिष्णू झाले आहेत. त्यांना फक्त स्तुति प्रिय आहे. काही भाटगिरी करणारे पत्रकार पाकीट घेऊन नको त्या लोकांची स्तुती करीत असतात त्यामुळे ते प्रसिद्धीला सोकावलेले आहेत.मात्र माझ्यासारखा निष्पक्ष व निर्भीड पत्रकार सत्य जगासमोर मांडून त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम करतो ते त्यांना सहन होत नाही. मी केलेली टीका वास्तववादी असते, पूर्वग्रह दूषित नसते तर ती प्रासंगिक असते. चांगल्याला चांगलं वाईट याला वाईट म्हणण्याचे धाडस माझ्यात आहे.काही यूट्यूब पत्रकार व स्थानिक जिल्हा दैनिकांना या प्रकरणावर मौन पाळणे स्वहिताचे वाटले. एका ज्येष्ठ, निर्भीड पत्रकारावरील हल्ल्याची दखल घेण्या ऐवजी, आपले हितसंबंध जपणे श्रेयस्कर वाटले असावे. कोंबडे झाकले म्हणून पहाट व्हायची राहत नाही, हे त्यांनी लक्षात असू द्यावे. आज मी जात्यात असलो तरी तुम्ही सुपात आहात, पण तुमच्यावर तशी वेळ आल्यावर मी तुमच्यासारखा नतद्रस्तपणा करणार नाही, तुमच्या पाठीशी उभा राहीन.पोलिसांनी निस्पक्षपणे तपास करून खऱ्या सूत्रधारांना जगासमोर बेनकाब करावे, हीच अपेक्षा. हल्लेखोरांचे आभार की त्यांनी माझा लिहिता हात शाबूत ठेवला.

Views: 37
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
नवनिर्वाचित महापौरांचे असेही स्वागत…ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, उल्हासनगर यांचे मनोगत !!

नवनिर्वाचित महापौरांचे असेही स्वागत…ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, उल्हासनगर यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)