महादेवा, तुझा दर्शन मार्ग पूल कधी पूर्ण होणार? चांदनदीवरील हेमाडपंथीय महादेव मंदिर दर्शन मार्ग पुलाची मोठी दुरावस्थामायणी
मायणी गावासह हजारो हिंदू भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या आणि एक ऐतिहासिक कलाकुसरीच्या ठेव्याचे उत्तम उदाहरण असणाऱ्या चांदनदीकिनारी उभारण्यात आलेल्या संगमेश्वर हेमाडपंथीय महादेव मंदिराकडे जाणाऱ्या पुलाची मोठी दुरावस्था झाली असून याठिकाणी येणारे शिवभक्त ,महादेवाकडेच आता हा पूल कधी उभारला जाणार अशी आर्त साद घालताना दिसत आहेत. राजकारणाच्या विळख्यात सापडलेल्या या पुलाची कहाणी काही वेगळीच म्हणावी लागेल. राजकारणाच्या तिड्यात देवालाही विनावे,यासारखे दुर्दैव मायणीकरणासाठी काय असावे!
चांद नदीवरील मंदिर दर्शनासाठी बनवण्यात आलेल्या सकावपुलाची मोठी पडझड झाल्याने गत पावसाळ्यात याठिकाणी पुलाचा काहीभाग वाहून गेल्याने महादेवाची नित्यापूजेत विघ्न निर्माण झाल्याचे चित्र प्रथमच पहावयास मिळाले. बायपास रस्त्याच्या उंचवट्याने हा पूलमार्ग संभाव्य अपघाताचे ठिकाण बनल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.
निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधिकारी, विरोधक यांच्याकडून आलेल्या निधीची उपलब्धता त्याचा वापर ना होणे , स्थानिक प्रशासनाकडून ना हरकत दाखल्याची पूर्तता न होणे, या मुद्द्यावर या महादेव मंदिर पुलाची मोठी चर्चा झाली.
प्रथम आलेल्या निधीचा वापर जुन्या साकव पुलाच्या पडझड झालेल्या पायावरच बांधण्याचा ठेकेदाराचा डाव स्थानिक शिवभक्त युवकांनी मोडीत काढून काम बंद पाडले होते. आता याठिकाणी मोठा निधी उपलब्ध झाल्याचे जाहीर रित्या जनतेला नुकत्याच पार पडलेल्या निवडनुकीच्या निम्मिताने अनेक वेळा कानी पडले . आता या कामाची प्रत्यक्षात सुरुवात कधी होणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
तीन महिन्यानंतर सुरू होणाऱ्या पावसाळ्याच्या अगोदर या पुलाचे काम मार्गी लागणे आवश्यक आहे. अन्यथा सध्याचा दुरावस्था झालेला आणि तात्पुरता मुरुम टाकून शिवभक्त युवकांकडून बनवण्यात आलेला पूल पूर्णपणे वाहून जाऊन महादेवाची नित्यपूजा खंडित होण्याची शक्यता आहे.
यामुळे आजच्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने याठिकाणी येणारा प्रत्येक शिवभक्त देवाला यंदातरी राजकारण,आणि आडवाआडवीचे धोरण बाजूला सारून स्थानिक कारभारी आणि लोकप्रतिनिधींनी एकदिलाने भरभक्कम महादेव पूल पावसाळ्याअगोदर उभारावा ,असे साकडे घालताना दिसणार आहे.


