पुणे (प्रतिनिधी):बालरोग परिचर्या (Pediatric Nursing) क्षेत्रातील
भारती विद्यापीठ ‘कॉलेज ऑफ नर्सिंग’मध्ये राज्यस्तरीय परिषद संपन्न; बालरोग परिचर्या क्षेत्रातील आधुनिक धोरणांवर मंथन!
पुणे (प्रतिनिधी):बालरोग परिचर्या (Pediatric Nursing) क्षेत्रातील आव्हाने पेलण्यासाठी आणि रुग्णसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी परिचारिकांची ‘क्षमता बांधणी’ ही काळाची गरज आहे, असा सूर भारती विद्यापीठ येथे उमटला. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय, कॉलेज ऑफ नर्सिंग, पुणे यांच्या वतीने ‘क्षमता बांधणी:
बालरोग परिचर्या काळजी वाढवण्यासाठीची धोरणे’ या विषयावर २७ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित केलेली एक दिवसीय राज्यस्तरीय परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाली.दिग्गज मान्यवरांची उपस्थितीकार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र परिचर्या परिषदेच्या (MNC) निरीक्षक डॉ. सौ. नूतन पोतदार यांच्या शुभहस्ते आणि विशेष उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या आय.क्यू.ए.सी. (IQAC) डायरेक्टर डॉ. सौ. कीर्ती गुप्ता उपस्थित होत्या.परिचारिकांच्या कौशल्यवृद्धीवर भरकॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्या आद. डॉ. भाग्यश्री जोगदेव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या परिषदेत बालरोग विभागातील आधुनिक उपचार पद्धती आणि तांत्रिक कौशल्य विकासावर प्रामुख्याने भर देण्यात आला. या परिषदेत पुणे आणि परिसरातील सुमारे ३०० परिचारिकांनी सहभाग नोंदवला.
सतत व्यावसायिक विकास (CPD) कार्यक्रमांमुळे आरोग्य सेवा व्यावसायिकांच्या ज्ञानात भर पडते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.तज्ज्ञ वक्त्यांचे मार्गदर्शनपरिषदेच्या विविध सत्रांमध्ये तज्ज्ञ वक्त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यामध्ये:डॉ. सौ. भाग्यश्री जोगदेव (प्राचार्या)श्री. हकीम सिंगसौ. रुचा बडेसौ. कांचन शिंदे * सौ. शर्मिला कुलालयांनी बालरोग शुश्रूषेतील नवनवीन धोरणे आणि ‘क्षमता बांधणी’च्या प्रभावी तंत्रांवर सखोल प्रकाश टाकला.नेटकं नियोजन आणि समारोपकार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सौ. स्नेहा संकपाळ व कु. धैर्यश्री तांदळे यांनी केले. परिषदेची सांगता कॉलेज ऑफ नर्सिंगचे उपप्राचार्य डॉ. प्रवीण दानी यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. या यशस्वी आयोजनाबद्दल राहुल खरात व अन्य मान्यवरांनी प्राचार्या डॉ. भाग्यश्री जोगदेव व त्यांच्या टीमचे विशेष अभिनंदन केले आहे.


