• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

तब्बल ७६ वर्षे अबाधित असलेला राज्यपालांचा क्रिकेटमधील विक्रम !! ज्येष्ठ पत्रकार उमेश काशीकर यांचे मनोगत !!जगदीश का. काशिकर,

माणगंगा by माणगंगा
March 7, 2026
in Uncategorized
0
तब्बल ७६ वर्षे अबाधित असलेला राज्यपालांचा क्रिकेटमधील विक्रम !! ज्येष्ठ पत्रकार उमेश काशीकर यांचे मनोगत !!जगदीश का. काशिकर,

*तब्बल ७६ वर्षे अबाधित असलेला राज्यपालांचा क्रिकेटमधील विक्रम !!* ज्येष्ठ पत्रकार उमेश काशीकर यांचे मनोगत !!जगदीश का. काशिकर,

मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.मुंबईच्या एका राज्यपालांच्या नावे सहज घडलेला क्रिकेट मधील एक जागतिक विक्रम गेल्या ७६ वर्षांमध्ये कुणीही मोडू शकलेला नाही !हे विक्रमवीर गव्हर्नर होते स्वातंत्र्यानंतर मुंबई प्रांताचे पहिले भारतीय गव्हर्नर राजा महाराज सिंह !सर्वसाधारणपणे गव्हर्नर किंवा राज्यपालांना महत्वाच्या सामन्यांच्या वेळी निमंत्रित केले जाते ते नाणेफेकीसाठी, खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी किंवा सामना संपल्यानंतर चषक / बक्षीस वितरणासाठी.

परंतु, मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या तीन दिवसांच्या प्रथमश्रेणी सामन्यात गव्हर्नर राजा महाराज सिंह खेळाडू व कर्णधार म्हणून प्रत्यक्ष सहभागी झाले होते. राज्यपालांचे एडीसी असलेले रुसी मोदी हे स्वतः क्रिकेटर होते व ते स्वतः देखील या संघाकडून खेळत होते. दिनांक २५ – २७ नोव्हेंबर १९५० असे तीन दिवस खेळल्या गेलेला हा प्रथम श्रेणी सामना होता बॉम्बे गव्हर्नर्स XI विरुद्ध कॉमनवेल्थ XI. संघाचे नाव बॉम्बे गव्हर्नर्स XI असल्यामुळे राजा महाराज सिंह यांना संघाचे कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले. या संघामध्ये भारतातल्या नवानगर व पतियाळा अश्या दोन राजघराण्यांचे सदस्य देखील खेळाडू म्हणून सहभागी झाले होते. राजा महाराज सिंह स्वतः पतियाळा राजघराण्याचे होते. बॉम्बे गव्हर्नर संघाचे सदस्य होते:

एम आर रेगे, एम एस रणवीर सिंहजी (नवानगर), रुसी मोदी (गव्हर्नर साहेबांचे एडीसी होते), चंद्रकांत गडकरी, पतियाळाचे युवराज, के राज सिंह, ए के खन्ना, व्ही राजिंदर नाथ (यष्टीरक्षक), राजा महाराज सिंह (कर्णधार), सी आर रंगाचारी व गुलाम अहमद !कॉमनवेल्थ संघाचे कर्णधार होते लेझली एम्स व सदस्य होते लेन फिशलॉक, जॉर्ज एम्मेट, जॅक इकिन, केन ग्रिव्ज, रेजिनाल्ड स्पूनर (यष्टीरक्षक), डिक शॅकलटन, एड्डी पेंटर, जिम लेकर, जॉर्ज ट्राइब, लेझली एम्स (कर्णधार ) व सोनी रामदिन या सामन्यात बॉम्बे गव्हर्नर XI संघ पराभूत झाला तर कॉमनवेल्थ संघ विजयी झाला. पण ते महत्वाचे नाही !!राज्यपालांचे एडीसी रुसी मोदी यांनी पहिल्या डावात संघाच्या वतीने सर्वाधिक ६८ धावा केल्या ! राजा महाराज सिंह यांचा हा पहिलाच प्रथम श्रेणी क्रिकेट सामना होता आणि त्यात त्यांनी नवव्या क्रमांकावर खेळण्यासाठी येऊन ४ धावा काढल्या !! मोठी गोष्ट आहे !!

राज्यपाल आपल्या एडीसीसह एकत्र खेळले असा हा कदाचित पहिलाच प्रथम श्रेणीचा सामना असेल ! योगायोग म्हणजे दोघांनाही इंग्लंडचा फिरकीपटू जिम लेकरने बाद केले. गोलंदाज जिम लेकर हा राजा महाराज सिंह यांच्या पेक्षा तब्बल ४४ वर्षांनी लहान होता ! आपला पहिला वहिला प्रथम श्रेणी क्रिकेट सामना खेळणारे मुंबईचे राज्यपाल राजा महाराज सिंह यांचे नाव रेकॉर्ड बुक मध्ये गेले ते यासाठी की दिनांक २५ नोव्हेंबर १९५० या पहिल्या दिवशी त्यांचे वय होते ७२ वर्षे १९२ दिवस !! दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी राज्यपाल ब्रेबॉर्न स्टेडियमकडे फिरकलेही नाही. त्यामुळे दुसऱ्या डावात त्यांच्या नावापुढे अनुपस्थित असे लिहिण्यात आले !

Views: 48
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
इराणी शिया राजवटीची रचना, पर्शियन शिया राष्ट्रवाद आणि अंतर्गत बंडाळीच्या शक्यतांची “रिजिम चेंज विंडो”

इराणी शिया राजवटीची रचना, पर्शियन शिया राष्ट्रवाद आणि अंतर्गत बंडाळीच्या शक्यतांची "रिजिम चेंज विंडो"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)