• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

संविधान वाचण्यापेक्षा आम्ही महिला पोथ्या पुराणात जास्त अडकलो: रूपाली चाकणकर यांचे धाडशी विधान ज्येष्ठ पत्रकार हेरंब कुलकर्णी

माणगंगा by माणगंगा
March 8, 2026
in Uncategorized
0
संविधान वाचण्यापेक्षा आम्ही महिला पोथ्या पुराणात जास्त अडकलो: रूपाली चाकणकर यांचे धाडशी विधान ज्येष्ठ पत्रकार हेरंब कुलकर्णी

संविधान वाचण्यापेक्षा आम्ही महिला पोथ्या पुराणात जास्त अडकलो: रूपाली चाकणकर यांचे धाडशी विधान ज्येष्ठ पत्रकार हेरंब कुलकर्णी

का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

महिला आयोगाच्या महिला दिनाच्या कार्यक्रमात आज महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी सावित्रीबाईंनी आम्हाला ज्यासाठी शिकवले ते न करता संविधान न वाचता आम्ही पोथ्या पुराणात जास्त रमलो असे धाडसी विधान केले.रूपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून बोलल्या आहेत हे जास्त महत्त्वाचे आहे. आजकाल समाजातील प्रचलित मतांना कुरवाळत आणि गुडी गुडी बोलणे हे राजकीय नेत्यांचे लक्षण ठरत असताना आपल्यावर टीका होईल हे माहीत असूनही यांच्या या स्पष्ट बोलण्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे आणि महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर त्या विधानावर चर्चाही करणे आवश्यक आहे.पोथ्या पुराणे यात हिंदूंच्या पोथ्या, मुस्लिमांचे कुराण आणि ख्रिश्चनांचे बायबल सुद्धा येते हे अगोदर स्पष्ट करूया म्हणजे तुम्हाला आमचाच धर्म दिसतो,समोरचा धर्म दिसत नाही का ?अशा बकवास कमेंट येणार नाही. धार्मिक ध्रुवीकरण झालेल्या आजच्या काळात अत्यंत शांतपणे महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणाचे प्रमाण वाढूनही महिलांचा सामाजिक चळवळीत महिलांचा सहभाग वाढला का..? महिला धार्मिक मनुवादी कर्मकांडातून बाहेर पडून एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून विकसित होत आहेत का ? यावर चर्चा करायला हवी. पुरुष व महिला हे दोघेही समाज व्यवस्थेचे घटक असल्याने महिलांची वेगळी चर्चा करणे काहींना चुकीचे वाटू शकते परंतु महिला दिनाच्या निमित्ताने महिला प्रश्नावर चर्चा करताना एक मुद्दा म्हणून यावर बोलायला हवे… धर्मसंस्था व राजकीय सामाजिक व्यवस्थेने स्त्रियांचे उदात्तीकरण करून त्यांच्यावर अनेक बंधने लाभले, स्त्रियाही त्या बंधनांना बंधन न मानता त्याचा भाग बनवून घेतात.. महात्मा फुले पासून अनेक समाजसुधारकांनी व्यवस्थेवर टीका करत धर्माची कर्मकांडाची चिकित्सा करत महिलांना ही जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला त्यातून स्त्रियांच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले, आत्मविश्वासाने स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या अनेक क्षेत्रात कर्तृत्व दाखवले पण विवेकी वैचारिक क्षमता विकसित करत लादलेल्या बंधनातून बाहेर पडत सामाजिक चळवळीचा भाग होण्याचे हे प्रमाण खूप कमी आहे..याचे काय करायचे ? सामाजिक व धार्मिक बंधनातून स्वतःला दूर करून समाजातील प्रश्नांची जोडून घेणे ही संख्या कमी आहे यावर बोलणे आवश्यक आहे… मुस्लिम धर्मात सुधारण्याची चळवळ कमी प्रमाणात झाल्याने मुस्लिम महिला धर्माच्या बंधनात हिंदू महिलांपेक्षा अधिक आहेत हे मान्य आहे पण हिंदूंमध्ये इतक्या चळवळी होऊन सुद्धा स्त्रियांचे शिक्षण वाढून सुद्धा सुशिक्षित स्त्रिया कर्मकांडात अडकल्या आज धार्मिक समारंभ, पोथी पुराणे ऐकण्यात, शिवपुराण आणि असे मोठे मोठे होणारे कार्यक्रम,सामूहिक आरत्या, धार्मिक परंपरा यात या शिकलेल्या भगिनी आहेत हे दुःखद आहे..उलट पूर्वी ब्राह्मण जे वाचत होते ती स्तोत्र पोथ्या आम्ही वाचू शकतो ही समानता मिळाल्याचे त्यांना समाधान असते…मान्य आहे की आज दिले जाणारे शिक्षण या बंधनांची जाणीव करून देत विद्रोही बनवायला मदत करत नाही. समाजातील वैचारिक संस्था,प्रसारमाध्यमे ही अशा प्रकारचे जागरण कमी प्रमाणात करतात परंतु महिलांमध्ये शिकलेल्या महिलाही स्वतःहून अशा प्रकारच्या सुधारकांच्या विचारांचे वाचन करून कर्मकांडातून बाहेर पडत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.. किंबहुना कर्मकांडाचे समर्थन करतात .कर्मकांड म्हणजे धर्म नाही हे स्वामी विवेकानंद सर्व संतांनी सांगितले तरीही आज वेगवेगळ्या बाबांच्या पूजेला लागलेली मोठी संख्या सुशिक्षित महिलांची आहे. मार्गशीर्ष गुरुवारपासून वटसावित्री पर्यंत कर्मकांड करण्यात रमणाऱ्या सुशिक्षित महिला आहेत.. गणेशोत्सवात पुण्याच्या गणपती समोर हजारोंच्या संख्येने अथर्वशीर्ष म्हणणाऱ्या महिला त्याच पुण्यात ते वाचण्याची क्षमता देणाऱ्या सावित्रीबाईंच्या वाड्यामध्ये जात नाही हे कसे समजून घ्यायचे ? ज्या धार्मिक रूढी परंपरांनी स्त्रियांना गुलाम बनवले त्या परंपरांमधील शोषण लक्षात घेऊन त्यातून महिलांनी बाहेर पडावे व संविधानाने दिलेले अधिकार वापरत एकूणच स्त्रियांचे प्रश्न समाजाचे प्रश्न याच्याशी जोडून घेणे आवश्यक आहे.. शिक्षण घेतलेल्या महिलांनी महाराष्ट्रातील समाज सुधारकांची परंपरा आणि वैचारिक साहित्याचे वाचन करून सामाजिक चळवळीत सहभागी झाले पाहिजे म्हणजेच खऱ्या अर्थाने संविधानाचे अनुकरण करणे आहे हाच मुद्दा महत्त्वाचा आहे..दुर्दैवाने शिक्षणाचे प्रमाण ज्या प्रमाणात वाढलेआहे त्या प्रमाणात ही संख्या खूपच अत्यल्प आहे हा खरा मुद्दा आहे. … तुम्ही देव मानणे किंवा धर्मावर श्रद्धा ठेवणे याबद्दल कोणतीच तक्रार नाही. महात्मा गांधी महात्मा फुले साने गुरुजी हे अतिशय धार्मिक होते परंतु गुलाम करणाऱ्या परंपरांचा ते भाग झाले नाहीत. उलट त्यांना आव्हान देत समाजातील शोषित वंचितांसाठी त्यांनी संघर्ष केला हीच अपेक्षा महिला दिनाच्या निमित्ताने शिकलेल्या स्त्रियांकडून आहे. तेव्हा आमच्या धार्मिक असण्याला विरोध करता का ? असा कांगावा न करता मूळ मुद्दा लक्षात घेण्याची गरज आहे..रूपाली चाकणकर यांनी महत्त्वाची चर्चा सुरू केली आहे.

Views: 73
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
ईगल फौंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे महिला गौरव सोहळा संपन्न

ईगल फौंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे महिला गौरव सोहळा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)