तऱ्हाडी येथे कृषिदुताद्वारे मार्गदर्शन
त-हाडी
शिरपूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी सध्या त्यांच्या गावी कार्यरत आहेत. कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत स्वतःच्या गावातील शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव येथील कृषिदुत भूषण जगन्नाथ पाटील याने ग्रामीण कृषी कार्यानुभव आणि कृषी औद्योगिक अंतर्गत या कार्यक्रमांतर्गत अभ्यास दौऱ्यात शिरपूर तालुक्यातील तऱ्हाडी येथे माती परीक्षनाचे फायदे, बीज प्रक्रिया व त्याचे फायदे, पशुखाद्य प्रक्रिया, कीटकनाशकांच्या फवारनी वेळी घ्यावयाची काळजी, तन व्यवस्थापन, कृषी उपयुक्त आधुनिक शेतीसाठी मोबाईल ॲप व त्याचा वापर, पिकांवरील मित्र किट व शत्रू किट यांची ओळख व व्यवस्थापन अश्या विविध विषयांवर त्याने प्रत्याशिकांच्या माध्यमातून शेतक्यांना माहिती दिली आहे.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी
त्याचे कौतुक करत अभ्यास दौऱ्यासाठी शुभेच्या दिल्या. या उपक्रमासाठी डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे प्रा.डॉ शैलेश तायडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. ए डी फाफडे कार्यक्रम अधिकारी प्रा. विशाल दळवी व तज्ञांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो – कृषीदुत भुषण पाटील त-हाडी येथे शेतकऱ्यांना माती परीक्षण, बिज प्रकिया, पशूखाद्य प्रकिया, तन व्यवस्थापन, कृषी उपयुक्त माहिती देताना भुषण पाटील व शेतकरी वर्ग