उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची सुरेंद्र गुदगेंकडून सदिच्छा भेट
मायणी :प्रतिनिधी,दत्ता कोळी
महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ना. श्रीमती सुनेत्राताई पवार यांची मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे व मायणी अर्बन बँकेचे चेअरमन श्री. सुरेंद्र गुदगे यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत मायणी परिसरातील शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील प्रश्नांसह विविध विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर सुनेत्राताई पवार यांची भेट घेताना सुरेंद्र गुदगे यांनी मायणी परिसरातील शेती, पाणी आणि रस्ते विकास यांबाबत उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. प्रामुख्याने मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून ग्रामीण भागात राबवले जाणारे शैक्षणिक उपक्रम आणि मायणी अर्बन बँकेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात होत असलेली प्रगती याबाबत त्यांना आढावा दिला.
याभेटीदरम्यान सुनेत्राताई पवार यांनी मायणी परिसरात सुरू असलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचे कौतुक करताना भागातील जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी शासन स्तरावरून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याचे सुरेंद्र गुदगे यांनी सांगितले.
"राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या अभ्यासू आणि संयमी नेतृत्वाचा फायदा ग्रामीण भागातील विकासकामांना नक्कीच होईल."
— श्री. सुरेंद्र गुदगे (चेअरमन, मायणी अर्बन बँक)


