जावीर यांच्या कोलदांडा या काव्यसंग्रहास ग्रंथरत्न पुरस्कार जाहीर
…….दशक महोत्सवी प्रतिष्ठा साहित्य संमेलन 2026 हे संमेलन तासगाव जिल्हा सांगली येथे शनिवार दिनांक 21 मार्च 2026 रोजी भरत आहे
संमेलनाचे अध्यक्ष थोर विचारवंत बाबुराव गुरव सर असून प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार संजय पाटील साहेब आहेत .या कार्यक्रमात विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे .प्रसिद्ध साहित्यिक, काष्ट शिल्पकार रमेश जावीर यांचा कोल दांडा हा काव्यसंग्रह तेजश्री प्रकाशन इचलकरंजी तर्फे 2025 मध्ये प्रकाशित झाला असून या काव्यसंग्रहास विचारवंत माननीय बाबुराव गुरव यांची प्रस्तावना लाभली आहे.
या काव्यसंग्रह मध्ये दलित पद दलिता वरील कविता व्यक्त होताना दिसतात .सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यामध्ये हा काव्यसंग्रह मैलाचा दगड ठरेल अशी आशा कवी रमेश जावीर व्यक्त करतात .प्रतिष्ठा फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तानाजी राजे जाधव हे कार्यक्रमाचे निमंत्रक असून यापूर्वीही रमेश जावीर यांचा पहिले दिव्यांग साहित्य संमेलन 2018 श्रीक्षेत्र नरसिंह वाडी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथे कथाकथनकार माननीय रमेश जावीर म्हणून सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला होता .
रमेश जावीर यांचे आटपाडी तालुका साहित्य मंच तर्फे साहित्यिक कवी सुनील दबडे सर गझलकार सुधाकर इनामदार यांनी हार्दिक अभिनंदन होत आहे.


