ईराण युध्दज्येष्ठ पत्रकार तुषार गायकवाड यांचे मनोगत !!जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.ईरान-भारत संबंधात अनिश्चितता असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मोदींवर विश्वास ठेवा, मोदी सर्व काही सुरळीत करतील’ म्हणून लोकांना केलेले आवाहन जर्मनीच्या क्रुरकर्मा फॅसिस्ट फ्युररच्या समर्थकांची आठवण करुन देते.फ्युररने आत्महत्या केल्यानंतरही जर्मन नाझी लोक ज्या इमारतींच्या भिंतीवर फ्युररचे चित्र आहे,
अशा इमारतींमध्ये आसरा घेण्यासाठी जात असत. कारण त्यांची धारणा होती की, फ्युररचे चित्र असलेल्या इमारतींवर बाँम्ब पडणार नाही. रेड आर्मी फ्युररचे चित्र पाहून नाझींना मारणार नाही. प्रत्यक्षात नाझी ठेचले गेले, फाजील आत्मविश्वास काही कामी आला नाही. मुख्यमंत्र्यांचे आवाहन अशाच फाजील आत्मविश्वासातून आले आहे. कारण मोदींनी भारताच्या अलिप्ततावादी परराष्ट्र धोरणाला चूड लावून अगोदर रशियासोबतचे ७० वर्षांचे संबंध खराब केले.
नंतर इराणसोबतचे ७० वर्षांचे संबंध खराब केले.आजच्या घडीला मोदीजींचे परममित्र डोनाल्ड ट्रंम्प आणि बेंजामिन नेतान्याहू दोघेही चारिमुंड्या चीत होताना दिसत असून इराणच्या बाजूने अनेक देश उभा रहात आहेत. जर्मनीने युध्द लवकरात लवकर थांबवण्याचे आवाहन केले आहे. इटलीने युध्दात सहभागी होण्यासाठी नकार दिला आहे. स्वित्झर्लंडने अमेरिकन इराण युद्धाशी संबंधित सैनिकी कारवाई हेतूच्या उड्डाणासाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे.तर आपल्याकडे मोदीजींनी गोदी मेडीया, आयटी सेल आणि अंधभक्तांची ट्रोलकौरव फौज मैदानात उतरुन इराणसोबतचे संबंध सुरळीत असून होमुर्झच्या सामुद्रधुनीतून भारताची इंधन वाहतूक करणारी जहाजे सुरक्षित प्रवास करु शकतील असे खोटे चित्र निर्माण केले.
पण इराणने अशा लबाडीचा स्विकार केला नाही.वास्तविक इराण – इस्त्रायलच्या युध्दाला आता १६ दिवस पूर्ण होत आहेत. होमुर्झच्या सामुद्रधुनीतून खनिज तेल व एलपीजी गॅसची वाहतूक बंद झाल्यावर मोदींनी १३व्या दिवशी इराणचे राष्ट्रपती मसूद पेजिशकियन यांच्याशी पहिल्यांदाच फोनवर संवाद साधला.मात्र, इराणी राष्ट्रपतींनी या कॉलचा एक्सवर साधा उल्लेखही केलेला नाही. भारतातील इराणी राजदूतांनी ‘भारत आणि इराण जुने मित्र आहेत, दोन-तीन तास थांबा’ असे सांगितले होते. यांस तीन दिवस झाले. अजूनही भारताला होमुर्झच्या सामुद्रधुनीतून इंधन पुरवठा होईल याची कोणतीही खात्रीलायक चर्चा किंवा कृती झालेली नाही.भारतीय गोदी मेडीयाने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगातील नेते युध्द थांबवण्यासाठी मोदींना विनंती करीत असल्याचे सांगितले. मात्र ‘ईरान प्रेस’ने अशा फेक न्यूज नाकारत युध्द फक्त आणि फक्त इराणच्या अटींवर थांबू शकते हे ठणकावून सांगितले. यानंतर भारताच्या विदेश मंत्रालयाने अशा बातम्या फेक न्यूज असल्याचे घोषित केले
.गेली १२ वर्षे अहोरात्र सुरु असलेला हा फेक न्यूजचा खेळ प्रथमच कोणत्याही परिस्थितीत पंतप्रधानांच्या उपयोगी पडत नाहीये. मोराने पिसारा फुलवल्यानंतर जसा त्याचा पार्श्वभाग उघडा पडतो. तशी या फेक न्यूज प्रणालीची अवस्था झाली आहे.या सगळ्या घडामोडींचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम दिसतो. रुपया आजवरच्या उच्चांकी घसरणीवर आहे. शेअर मार्केट गुंतवणूकदारांना दररोज कोट्यावधी रुपयांना स्वाहा म्हणावे लागत आहे.
भारतीय सामान्य नागरिक उत्पन्न बुडवून गॅससाठी रांगा लावत आहेत. भारतीय शेतकऱ्यांचा निर्यात होणारा शेतमाल बंदरात पडून आहे. जरी अमेरिकेने भारतास रशिया कडून ३० दिवसांची खनिज तेल खरेदी करण्याची परवानगी दिली असली, तरीही मोदींनी रशिया सोबत संबंध खराब केल्याने व अमेरिकेच्या गळ्यात गळे घालण्याने रशियाने भारतास याआधी तेलखरेदीवर दिलेल्या सर्व सवलती रद्द केल्या आहेत. त्यामुळे इतर देशांप्रमाणेच महागडे तेल विकत घ्यावे लागणार आहे.आंतरराष्ट्रीय राजकारणात अलिप्त राहून आपल्या देशाचा फायदा बघण्याऐवजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचे जोडे उचलणे देशासाठी खूप मोठे आर्थिक संकट घेऊन उभे ठाकले आहे. एपस्टीन फाईल्स मधील उल्लेख आणि अदानी समूहाच्या भ्रष्टाचार चौकशीमुळे पंतप्रधान अमेरिकेच्या तालावर नाचत आहेत.आजरोजी भारताला इराणकडून प्रचंड प्रमाणात सहकार्याच्या अपेक्षा आहेत, पण इराणकडून त्याबाबत कसलीही स्पष्टता अद्याप पर्यंत तरी आलेली नाही. पुढील परराष्ट्र कुटनितीवर भारताचे पुढील भवितव्य अवलंबून आहे. विशेष म्हणजे इस्त्रायलचे राष्ट्रपती बेंजामिन नेतान्याहू जबरदस्त दुखापतग्रस्त आहेत किंवा मृत झाले आहेत अशा बातम्या येत आहेत. अशा बातम्यांचे खंडन नेतान्याहू यांचेकडून स्वतः मेडीयासमोर येवून होत नाही. इराणचे राष्ट्रपती रस्त्यावर उतरुन देशवासियांना धीर देत असताना नेतान्याहू कुठे गायब आहेत?
याचे उत्तर कोणाकडेही नाही.अमेरिकेने इराणच्या तेल निर्यातीच्या मुख्य केंद्रावर खार्ग बेटावर मोठा हल्ला केला आहे. हे बेट इराणच्या एकूण कच्च्या तेल निर्यातीपैकी ९०% हिस्सा सांभाळते. ट्रंम्प यांनी दावा केला की, बेटावरील लष्करी सुविधा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या, पण इराणने फक्त एक तासातच काम पुन्हा सुरू केल्याचे सांगितले.४८ तासांत इराणला लोळवण्याची भाषा करणारे ट्रंम्प हॉर्मुज सामुद्रधुनी नियंत्रित करण्यासाठी इतर देशांकडे मदत मागत आहेत. या याचनेचा अर्थ अमेरिकने होमुर्झ सामुद्रधुनी नियंत्रित करण्याची आशा सोडून दिली असून, खार्ग हल्ल्याद्वारे इराणचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला आहे. खार्ग बेटाची क्षमता ३० मिलियन बॅरल्स साठवणूक आणि दररोज १५-२० लाख बॅरल निर्यात आहे. इराणने या हल्ल्याची अपेक्षा ठेवली होती त्यामुळे तेलसाठा केला नव्हता असे काही इराणी मेडीया रिपोर्ट सांगत आहेत.
एकूणात वस्तुस्थिती सांगणारी मेनस्ट्रीम मेडीया उपलब्ध नाही. त्यामुळे फेक न्यूजच्या आधारे देशातील जनतेला मूर्खात काढले जातेय.नेहरुंनी जगाला दिलेले अलिप्ततावादी परराष्ट्र धोरण मोदींनी धुडकावले. त्याचे परिणाम आजरोजी मोदी, भारतीय अर्थव्यवस्था, निर्यात करणारे भारतीय शेतकरी, सामान्य भारतीय, शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार, हाॅटेल व्यावसायिक पहिल्या टप्प्यात भोगत आहेत.दुसऱ्या टप्प्यात नोकरदार, खते खरेदी करणारे शेतकरी, सरकारी कर्मचारी यांचाही नंबर लागणार असून युध्द लवकरात लवकर थांबणे किंवा भारताचे इराण व रशियाशी संबंध पूर्ववत होणे, यामुळेच काही प्रमाणात परिस्थिती नियंत्रणात येवू शकते. तरीही त्याचे परिणाम पुढीचे कैक महिने दिसत राहतील.फोटो : सीएनबीसी आवाज


