साहेब फक्त दोन दिवस मैदानात आले… अन्. आख्ख्या जिल्ह्यातील मोकळच नावाजलेल्यानच्या ………….टाईट झाल्या..स्वप्नील पावणे यांचे मनोगत
राजकारण हे जसे वरून दिसते तसे ते कधीच नसते याचा प्रत्यय सर्वांना काल सांगलीत आला. एका व्यक्तीला थांबण्यासाठी आणि आपले राजकीय अस्तित्व थोडेफार का होईना जिवंत ठेवण्यासाठी काय जी गडी एक दोन , एक ,दोन सदस्य घेऊन मिरवत होते..जिल्ह्यात अस लय पुढारी आहेत की आता त्यांना परसाकडे बसताना पण अडचण आहे. साध दोन पायाने नीट चालवत नाही पण त्यांना फक्त गोपीचंद पडळकर साहेबांना थांबवायचं आहे..
पडळकरांच्या नेतृत्वाचा जेव्हा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा तेव्हा आमच्या जिल्ह्यातील नेत्यांच्यातील सगळे हेवे दावे संपतात,दादा – बापू घराण्याचा वाद संपवून मिटून आपण सत्ता आपल्या ताब्यातून जायला नको असे म्हणता. आम्हाला कोणाला जातीवाचक बोलायचे नाही परंतु एकटा वाघ गोपीचंद पडळकर तुम्हाला एवढा खटकतो…. का तर…तो तुम्हाला लवून मुजरा घालत नाही..बाकी जिल्ह्यातील सगळे नेते जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात.आणि आमचा वाघ स्वाभिमानाने डौलदार चालत राहतो,,पुढे जात राहतो हे तुमचं दुखणं किती वेळा तुम्ही प्रयत्न करणार थांबवण्याचा,,अरे बेट्यानो सूर्य कधीच उगवला आहे
त्याच्यावर झाकरान टाकून तो थोडीच झाकणार आहे. तुम्ही जिल्ह्यात मागे ओढायचा प्रयत्न करताय अरे पडळकर साहेबांचं नेतृत्व राज्यात केव्हाच पोहचलं आहे. भीगवण प्रकारात मानसिक दृष्ट्या कंट्रोल केलेली मुलगी ही साहेब परत आणू शकतात. याच्या वरून आमच्या साहेबांची इच्छा शक्ती आणि ताकद समजून घ्या.. हा माणूस असाच पुढ आलेला नाही जबरदस्त इच्छा शक्ती आणि स्पिरिट असलेला हा माणूस तुम्हाला समजणं अशक्य आहे.न्हवे तर कधी समजणार सुद्धा नाही. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या हातून सत्ता जाणार हे सर्वांना माहीत होतच सदस्य संख्येवरून तुम्हाला फक्त एक सदस्य हवा होता,तरी तुमच्या पुंग्या टाईट करून सोडल्या यातच साहेबांचा विजय आम्ही मानतो. खरं तर सुरुवातीला आमदार गोपीचंद पडळकर साहेब या जिल्हापरिषद सत्ता समीकरण प्रक्रियेत नव्हतेच, वरिष्ठ पातळीवर महायुतीच्या चर्चा चालू होत्या.
परंतु काही जातीवादी फितूर जंत ला मिळाल्यामुळे वरिष्ठांनी शेवटच्या क्षणाला पडळकर साहेबांना लक्ष घालायला लावले परंतु तो पर्यंत राजकारण नेक्स्ट लेव्हल ला गेले होते. तरीही तुमची महिनाभराची तयारी आणि फक्त आमच्या साहेबांचे दोन दिवस… जिल्ह्यातील मोठा पुढारी समजणाऱ्याचा तर शेवटी शेवटी………… पाताळ झाला होता. अरे जबड्यात हात घालून सदस्य काढले.. भीद्री हॉटेलच्या लाइटा घालवून बसली.. यावरून समजते तुम्ही किती ……गऱ्या मांडीचे आहात. ते मुघलांच्या घोड्यांना पाण्यात संताजी धनाजी दिसायचे ना तसे आमच्या जिल्ह्यातील गड्यांना गोपीचंद पडळकर साहेब दिसतात..
कुट आला गोपीचंद हित आला का तिथ आला…. ते बालिश बुद्धी खासदार तर गाडीचा कंडक्टर बनून आला.. साहेबांना जरा आठ दिवस अगोदर पक्षाचा आदेश असता. तर निकाल काय लागला असता z.p अध्यक्षाचा ते कळू पण दिलं नसते. गडी एवढ भीतेत…ये डर अच्छा लगता है हमको.. और गोपीचंद नाम का डर आप लोगोंको आखरी सास तक रहेगा.. एका जत्रेने देव म्हातारा होत नसतो..
अजून लय बाकी आहे.. निवडणुका येत राहतात जात राहतात.. काळ बदलत राहतो. परंतु काळानुसार गोपीचंद पडळकर हे नाव सुद्धा वाढतच राहणार.. तुम्ही थांबवून थांबणारे आम्ही थोडीच आहोत…*अरे जबड्यात घालुनी हात मोजीले तुमचे दात…! मारीतो टाप… दौडत राहील कायम अश्व आमच्या साहेबांचा…!*


