राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते लोकभवनात इतिहास व अभिलेख दालनाचे उदघाटन
मुंबई प्रतिनिधी
.महाराष्ट्र लोकभवन येथे गेल्या १५० वर्षात घडलेल्या निवडक ऐतिहासिक घटना, राष्ट्रीय अतिथींच्या गाठीभेटी तसेच महत्वाच्या दस्तावेजांचे छायाचित्ररूपी संकलन असलेल्या ‘राज्यपाल दालनाचे’ उदघाटन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते आज गुढी पाडव्याच्या दिनी लोकभवन मुंबई येथे करण्यात आले.राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे व जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांनी राज्यपालांना दालनात लावण्यात आलेल्या छायाचित्रे व दस्तावेजांची माहितीदिली
.*दालनात १५० वर्षांमधील निवडक छायाचित्रे व दस्तावेजांचे प्रदर्शन*व्हाइसरॉय लॉर्ड कर्झन यांची ‘गव्हर्मेंट हाऊस’ येथे भेट (१८९८), प्रिन्स ऑफ वेल्स जॉर्ज यांची ‘गव्हर्मेंट हाऊस’ येथे भेट (१९०५); महात्मा गांधी यांच्या ‘गव्हर्मेंट हाऊस’ येथे झालेल्या तीन भेटी (१९१५, १९३१); देशाच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनी ‘गॉड सेव्ह द किंग’ न म्हणता ‘वंदे मातरम’ गाण्याच्या सूचना असलेले शासनाचे परिपत्रक (१९४७); महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर राज्यपालांनी व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांना पाठवलेला शोकसंदेश (१९४८), शासकीय कार्यालयातील जॉर्ज सहावे यांचे छायाचित्र भिंतीवरून काढून त्या ऐवजी महात्मा गांधी यांचे छायाचित्र लावण्याचा शासकीय आदेश (१९४९); सरदार वल्लभभाई पटेल यांच्या निधनानंतर राज्यपालांनी त्यांचे पुत्र डाह्याभाई पटेल यांना पाठवलेले भावपूर्ण पत्र (१९५०); राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या सन्मानार्थ राजभवन येथे आयोजित ‘फॅशन परेड’ ची छायाचित्रे (१९६१); चांद्रवीर नील आर्मस्ट्राँग (१९६९) यांच्या राजभवन येथे झालेल्या स्वागत समारोहाची छायाचित्रे (१९६९) तसेच सन २०११ साली विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघासाठी राष्ट्रपतींच्या उपस्थितीत राजभवन येथे झालेल्या स्वागत समारंभाची छायाचित्रे या विषयांवरील पॅनेल्स दालनात लावण्यात आले आहेत
.दालनातील पॅनेल्स मधील छायाचित्रांची मांडणी व सजावट निधी बोलार यांची आहे; तर कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचे प्रो. महेश ठाकूर यांचे या प्रकल्पाला सहकार्य लाभले आहे.


