मायणी नगरी राममय होणार! २६ मार्चला निघणार भव्य ‘श्रीराम नवमी शोभायात्रा
मायणी दि. २२:- प्रतिनिधी,दत्ता कोळी
येत्या गुरुवार, दिनांक २६ मार्च २०२६ रोजी मायणी नगरीत ‘समस्त हिंदू बांधव’ यांच्या वतीने प्रभु श्रीरामांच्या जन्मोत्सवानिमित्त भव्य ‘शोभायात्रा’ आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘पर्व ६ वे’ असलेल्या या सोहळ्यात यंदा तरुणाईसाठी विशेष ‘रील स्पर्धेचे’ आकर्षण असणार आहे.
शोभायात्रेचे नियोजन अत्यंत भव्य स्वरूपात करण्यात आले असून कार्यक्रमाची रूपरेषा खालीलप्रमाणे असेल:सकाळी १० ते १२ : श्रीराम मंदिरात उत्सवाच्या मूर्तीची विधिवत पूजा.दुपारी १२ वाजता : प्रभू श्रीरामांचा पाळणा व महाआरती.दुपारी १ ते ४ : भाविकांसाठी लाडू प्रसाद वाटप.सायंकाळी ६ वाजता : ‘भगवा ध्वज चौक’ येथून भव्य शोभायात्रेला सुरुवात होणारं आहे.
यंदाच्या शोभायात्रेत सियाराम देखावा, अश्वदळ (घोडे), पारंपारिक वाद्ये, धनगरी गजी नृत्य, अघोरी नृत्य (तांडव शो) आणि बंगाळ्या लाईट शो हे विशेष आकर्षण असतील. सातारा येथील प्रसिद्ध ‘शिवधर्म साऊंड’ आणि फटाक्यांच्या अतिषबाजीने ही मिरवणूक दुमदुमून जाणार आहे. शोभायात्रा भगवा ध्वज चौक – बसस्थानक परिसर – नवी पेठ – भवानी चौक (डॉ.तांबवेकर दवाखाना) मार्गे जाऊन मारुती मंदिर (उभी पेठ) येथे विसर्जित होईल.डिजिटल युगासाठी ‘रील स्पर्धा’ सोशल मीडियाच्या माध्यमातून संस्कृतीचा प्रसार व्हावा, या उद्देशाने आयोजकांनी ‘REEL स्पर्धा’ आयोजित केली आहे.विषय: शोभायात्रा, अघोरी नृत्य आणि बजरंगबलीची कमाल.बक्षीस: प्रथम क्रमांक २१००/-, द्वितीय १५००/-, तृतीय १०००/- आणि चतुर्थ १०००/- रुपये (सर्व विजेत्यांना प्रमाणपत्र दिले जाईल).नियम: रील किमान १ मिनिटाची असावी आणि ती ‘shri_shivpratishthan_mayani’ या पेजला कोलॅब (Collab) करावी.बक्षीस वितरण: २ एप्रिल २०२६ रोजी हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी सायंकाळी ५ वाजता हनुमान मंदिर (उभी पेठ) येथे होईल.
“जातीपातीमध्ये अडकलेला हिंदू समाज एकाच भगव्या ध्वजाखाली आणण्यासाठी आणि तरुणांमध्ये धर्माभिमान जागृत करण्यासाठी हा सोहळा आयोजित केला आहे,” अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे. समस्त हिंदू बांधव आणि धर्मप्रेमी मायणीकरांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


