• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

ईराण युध्दज्येष्ठ पत्रकार तुषार गायकवाड यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
March 24, 2026
in Uncategorized
0
ईराण युध्दज्येष्ठ पत्रकार तुषार गायकवाड यांचे मनोगत !!

ईराण युध्दज्येष्ठ पत्रकार तुषार गायकवाड यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.इराण-इस्त्रायल आणि अमेरिका युद्धाचा आजचा २४ वा दिवस… २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सुरू झालेल्या या युद्धाने जगाला दाखवून दिले की, ट्रम्प आणि नेतान्याहू यांची “४८ तासात इराण लोळवतो” ही मस्ती किती खोटी होती.युध्दात इराणचे नुकसान झाले नाही असे नाही.

युध्दात कधीही एकाच बाजूने नुकसान होत नाही. दोन्ही बाजूला कमी अधिक प्रमाणात नुकसान होत असते. गल्फ राष्ट्रांसह तीनही देशांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र इराणने दाखवलेली आंतरराष्ट्रीय राजकीय परिपक्वता हा अभ्यासाचा विषय झाली आहे.धर्मांध म्हणून हिणवले जाणाऱ्या इराणने स्वतःच्या न्याय हक्कासाठी लढताना जागतिक तेलाच्या २०% वाहतुकीचे केंद्र असलेली हॉर्मुज सामुद्रध्वनी प्रभावीपणे बंद करुन जागतिक अर्थव्यवस्था हादरवून सोडली आहे. ४८ तासांत इराणला लोळवण्याची वल्गना करणारे अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंम्प मानसिकदृष्ट्या अस्थिर झाले आहेत.

डोनाल्ड ट्रंम्प यांची दर्पोक्तीयुक्त वक्तव्ये दिवसेंदिवस अधिक हास्यास्पद होत चालली आहेत. जगाच्या पटलावर डोनाल्ड ट्रंम्पना एकटे पाडण्यात इराणची कुटनीती यशस्वी ठरली आहे.होमुर्झची सामुद्रधुनी ताब्यात घ्यायला चाललेल्या ट्रंम्प ब्रिटिन, चीन, जपान, फ्रान्स, इटली, जर्मनी यांसारख्या देशांनी साथ न दिल्याने ट्रंम्पची अवस्था लाकडाच्या फटीतील पाचर काढताना स्वतःची शेपूट अडकलेल्या माकडासारखी झाली आहे. भारताचीही अवस्था फारशी वेगळी नाही. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी बोलणी केल्याने दोन एलपीजी जहाजे सुरक्षित भारतात पोहोचली आहेत. मात्र अजूनही सुमारे २२ जहाजे अडकून पडलेली आहेत. प्रत्येक जहाजासाठी स्वतंत्र वाटाघाटी कराव्या लागणार आहेत.

ज्यामधे अजूनही भारताला यश आले नाही. देशावर ही विचित्र वेळ पंतप्रधानांच्या परराष्ट्र धोरणामुळे ओढावली आहे. त्यामुळे जयशंकर पुढे करुन मोदी पडद्याआड गेलेत. शक्तिशाली देशही एकटे पडू शकतात आणि छोटे देश कुटनीतीद्वारे लढा देऊ शकतात. रशिया – युक्रेन, इराण – इस्त्रायल व अमेरिका युध्द तेच सांगतेय.भारतासारख्या विकसनशील देशाला अशी भाईगिरी परवडणारी नसल्यानेच नेहरुंनी भारताचे स्वतंत्र अलिप्ततावादी परराष्ट्र धोरण अंमलात आणले. जगभरातील देशांनी त्यास पाठिंबा दिला. पण मोदी हे पूर्वजांची मालमत्ता विकून मनमानी ऐश करणारे राज्यकर्ते निघाल्याने आज देशातील सामान्य लोक सिलेंडरच्या रांगेत आहेत.इराणच्या ९० टक्के तेल निर्यातीचे केंद्र असलेल्या खार्ग बेटावर अमेरिकेने १३ मार्चला हल्ला केला, पण या हल्ल्यात इराणचे फारसे नुकसान झाले नाही. इराणने एक तासात काम पुन्हा सुरू केले. इस्रायल अमेरिकेची अत्याधुनिक व धुरंदर बाॅम्बर विमाने क्षतिग्रस्त करण्यात इराणला यश मिळत आहे.

त्यामुळे कोणताच पर्याय चालत नसलेल्या इराणला वठणीवर आणण्यासाठी ट्रंम्पनी ४८ तासांचा अल्टीमेटम दिली आहे. जर इराणने होर्मुज मार्ग पूर्ण उघडा केला नाही. तर इराणचे पॉवर प्लांट्स उद्ध्वस्त होतील. असे ट्रंम्प म्हटलेत. इराणने यावर प्रत्युत्तर दिले की, “पॉवर प्लांट्सवर हल्ला झाला तर आखातातील सर्व ऊर्जा, डेसालिनेशन प्लांट्स बंद करु. संपूर्ण क्षेत्र अंधारात ठेवू!” इराणने होमुर्झच्या सामुद्रधुनीत ८०% माइन्स टाकल्या आहेत. तिथे अनावश्यक मोठे स्फोट घडले तर इंटरनेट केबल्स कापल्या जातील.या केबल्सना धक्का लागला तरी जगभर १० ट्रिलियन डॉलर व्यापार ठप्प होईल. भारतातील रेल्वे, बँक, हवाई सेवांवर परिणाम होईल. होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या इंटरनेट केबल्स मध्ये AAE-1, FALCON, Tata TGN इत्यादी इंटरनेट केबल्स असल्याचे समजतेय. यांस धक्का लागल्यास भारतासह आशिया, युरोप, आफ्रिकेच्या इंटरनेटवर गंभीर परिणाम होऊ शकतो.दुर्दैवाने युध्दाचा परिणाम म्हणून या केबल्स नादुरुस्त झाल्या तर दुरुस्त करण्यासाठी कैक महिने जावू शकतात असे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

जगातील महाशक्तीला लोळवण्यात अल्पशक्ती इराण यशस्वी ठरत आहे, ते इराणच्या जनतेच्या खंबीरतेच्या व दिवंगत खामेनेईंच्या नियोजनाच्या जोरावर.ट्रंम्प आणि नेतान्याहू या दोहोंची अवस्था दारु पिऊन हातात पलिता घेतलेल्या माकडास विंचूचा दंश व्हावा अशी झाली आहे. भारतात ४० दिवस पुरेल एवढा एलपीजी व इंधन साठा आहे म्हणून सांगणार सत्ताधाऱ्यांकडे घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून ९ किलोग्रॅम सिलींडर पुरवठा करण्याचा निर्णय का घेतला? याचे उत्तर नाही.सत्ताधाऱ्यांच्या प्रमुखाची अवस्था जत्रेत हरवलेल्या मुलाखारखी झालेला असताना, गोदी मेडीया प्रमुखांचे महिमामंडन करण्यात व्यस्त आहे. सदसद्विवेकबुद्धी जागृत असलेल्या जनतेने भारत सरकार रशियाकडून मुबलक तेल खरेदी का करत नाही? अमेरिकेची सलगी सोडून का देत नाही? हा प्रश्न विचारणे क्रमप्राप्त आहे.देशातील हाॅटेल इंडस्ट्री बंद पडत असताना, सर्वसामान्य नागरिकांना दोन वेळच्या भुकेची भ्रांत असताना, देशाच्या प्रमुखांकडे कसलेही नियोजन व व्हिजन नसताना २०२९ मध्ये परत तेच सत्तेवर येतील हे आज सांगणाऱ्या गोदी मेडीया कर्मचाऱ्यांना जोपर्यंत देशवासी वठणीवर आणणार नाहीत तोपर्यंत असंवेदनशीलतेचा हा खेळ असाच सुरु राहणार आहे.फोटो : समुद्रातील इंटरनेट केबल (TeleGeography)

Views: 44
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
ईराण युध्दसंजीव चांदोरकर यांचे मनोगत !!जगदीश का. काशिकर,

ईराण युध्दसंजीव चांदोरकर यांचे मनोगत !!जगदीश का. काशिकर,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)