• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

माझंही मत….;हर्षवर्धन सपकाळांनी अभ्यास करून बोलणेच उचित ठरेल…;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
April 24, 2026
in Uncategorized
0
आयुष्यातले सांगाती … दत्ताभाऊ मेघे;

माझंही मत….;हर्षवर्धन सपकाळांनी अभ्यास करून बोलणेच उचित ठरेल…;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.एक काळ असा होता की काँग्रेसमध्ये नेते सुद्धा अभ्यास करून बोलायचे. कोणतेही हवेत विधान करणारे नेते काँग्रेसमध्ये नव्हते. मला आठवते स्वर्गीय वसंतराव नाईक, वसंतराव साठे, शंकरराव चव्हाण, वसंत दादा पाटील, डॉ. श्रीकांत जिचकार, यशवंतराव चव्हाण, विठ्ठलराव गाडगीळ या नेत्यांची भाषणे ऐकणे ही एक पर्वणी असायची. कोणत्याही विषयाचा साद्यंत अभ्यास करून ते बोलायचे. ना बुडखा ना शेंडा असे निराधार वक्तव्य हे करायचे नाहीत.

मात्र आज परिस्थिती बदलली आहे. आज काँग्रेसचे नेते तोंडाला येईल ते बोलतात. मग त्यात तथ्य आहे की नाही हे ते कधीही बघत नाहीत. बोलण्यापूर्वी अभ्यास करून यावे हे तर त्यांच्या गावीही नसते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल महिला आरक्षण विधेयक संदर्भात एक पत्र परिषद घेतली. त्यात बोलताना त्यांनी टीका केली की नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला महिलांना संसदेत आरक्षण द्यावे असे वाटते, तर त्यांची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वोच्च पद असलेल्या सरसंघचालकपदावर महिलेला का नेमले जात नाही? आणि त्यासाठी भाजप का आग्रह धरत नाही?हर्षवर्धन सपकाळ यांनी अशाच आशयाचे विधान वर्षभरापूर्वी देखील केले होते. त्यावेळी मी माझ्या “घ्या समजून राजेहो” या स्तंभातून त्यांना उत्तर देखील दिले होते.

अर्थात त्यांना वाचन करण्याची सवय नसावी. अभ्यासाची तर त्याहून नसावी. त्यामुळे ते त्या भानगडीत पडले नाहीत आणि पुन्हा त्यांनी तेच विधान केले आहे. इथे एक बाब स्पष्ट करायची आहे की मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कोणताही पदाधिकारी नाही, किंवा प्रवक्ता तर बिलकुलच नाही. मात्र संघाचा एक अभ्यासक आणि पत्रकार या नात्याने मी माझे मत इथे मांडतो आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना १९२५ साली झाली. ही सुरुवात तरुणांनी आणि बालांनी दररोज एक तास येऊन विविध खेळ खेळावे आणि त्या माध्यमातून त्यांच्यात सौहार्द निर्माण व्हावे, तसेच चर्चांमधून देशभक्तीचे बीज पेरले जावे, या अपेक्षेतून करण्यात आली होती. त्या काळात थोड्याही वयात आलेल्या मुली मुलांबरोबर मैदानावर खेळायला जाणे हे कौटुंबिक आणि सामाजिक दृष्ट्या सुद्धा निषिद्ध मानले जात होते. त्यामुळे महिलांना संघात येऊ देणे शक्य नव्हते. तसे केले असते तर नवा सामाजिक वाद निर्माण झाला असता. म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही फक्त बाल तरुण आणि ज्येष्ठांचीच संघटना राहिली.

मात्र त्याचवेळी संघ त्यांच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून कौटुंबिक संबंध प्रस्थापित करत होताच. त्यातूनच अनेक कुटुंबातील मातृशक्तींना असे वाटू लागले की ज्याप्रमाणे बाल आणि तरुणांसाठी अशी संघटना आहे, त्याचप्रमाणे बालिका, तरुणी आणि महिलांसाठी देखील संघटना व्हावी. त्यासाठी वर्धेच्या मावशी केळकर पुढे आल्या आणि त्यांनी संघ संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांच्याशी चर्चा करून संघाच्याच धर्तीवर महिलांसाठी राष्ट्र सेविका समितीची स्थापना केली. मावशी केळकर यांचे चरित्र आणि समकालीन संघ साहित्य याच्या नोंदी सापडतात. ही संघटना देखील हळूहळू वाढली आणि आज ती देखील संघासारखीच देशव्यापी झालेली आहे. आज संघाचे स्वयंसेवक ज्या हिरीरीने सामाजिक कार्यात अग्रेसर असतात, त्याच हिरीरीने राष्ट्रसेविका समितीच्या सेविका देखील सक्रिय असतात. देशाची फाळणी झाली तेव्हा हजारो हिंदू महिलांना अत्याचाराला सामोरे जावे लागले होते. त्यांच्या मदतीसाठी देशातून राष्ट्रसेविका समितीच्या कित्येक सेविका सीमावर्ती भागात सक्रिय झाल्या होत्या.

राष्ट्रसेविका समितीला सुरुवातीला संस्थापक मावशी केळकर त्यांच्यानंतर उषाताई चाटी मग प्रमिलाताई मेढे आणि आता शांताक्का या प्रमुख संचालिका म्हणून नेतृत्व देत आहेत. आज राष्ट्रसेविका समिती ही संघाच्याच बरोबरीने देशहिताच्या रक्षणासाठी कार्यरत आहे, आणि संघ विचारांवरच तिचे कार्य सुरू आहे. अशावेळी संघाच्या सरसंघचालक पदी महिला असावी असा हट्ट हर्षवर्धन सपकाळ यांनी धरावा? हा त्यांचा पोरकटपणाच म्हणावा लागेल.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही केवळ संघटना नाही तर तो एक विचार आहे. आणि तोही राष्ट्रभक्तीने प्रेरित झालेला विचार आहे. त्यामुळेच या विचाराने प्रेरित झालेले स्वयंसेवक या संघटनेने घडवले, आणि ही संघटना आज १०१ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. मात्र जे संघात गेले आणि संघात रुळले त्यांनाच हा विचार समजला आहे. अन्यथा बाकीच्यांची अवस्था एक हत्ती आणि सात आंधळे या कथेतल्या सात आंधळ्यांसारखी झालेली आहे. त्यामुळेच मग हर्षवर्धन सपकाळ यांच्यासारखे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले नेते अभ्यास न करता संघाबाबत तोंडाला येईल ते विधान करत असतात आणि स्वतःला हास्यास्पद ठरवून घेतात. अर्थात हे माझे मत झाले……. तुमचे मत मांडायला तुम्हाला मोकळीक आहेच…….

Views: 47
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
संस्थात्मक आठवणी : सचिन तेंडुलकर आणि लोकभवनउमेश काशीकर यांचे मनोगत !!

संस्थात्मक आठवणी : सचिन तेंडुलकर आणि लोकभवनउमेश काशीकर यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)