गॅस एजन्सी दिघंची, गॅस एजन्सी वरकुटे यांची गॅस सेवा कोलमडली
आटपाडी प्रतिनिधी
सध्या अलीकडच्या काळामध्ये गॅस सिलेंडर मिळणे मुश्किल झाले आहे. अशातच गॅस एजन्सी दिघंची व गॅस एजन्सी वरकुटे या दोन्ही गॅस एजन्सी ची सेवा विस्कळित झाली आहे.विस्कळित झालेल्या सेवेमुळे ग्राहकांना नाहक त्रास होत आहे. वेळेत गॅस मिळत नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. अखेर काही ग्राहकांना चुली पेटवाव्या लागत आहेत.त्या मुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.


