साहित्यिक ,काष्ट शिल्पकार रमेश जावीर यांच्या गुलामी जण कथासंग्रहास दमासा सभेचा विशेष ग्रंथ पुरस्कार जाहीर…….
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूरच्या वतीने देण्यात येणारा विशेष ग्रंथ पुरस्कार 2025 हा पुरस्कार रमेश जावीर यांच्या गुलामी जीन या कथासंग्रहास जाहीर झाल्याचे दक्षिण महाराष्ट्र सभाचे अध्यक्ष भीमराव धुळुबु व कार्यवाह डॉक्टर विनोद कांबळे कळवितात .
या पुरस्काराचे वितरण 24 मे 2026 रोजी कोल्हापूर येथे होणार आहे. गुलामीजीनं हा कथासंग्रह तेजश्री प्रकाशन इचलकरंजी तर्फे 2025 मध्ये प्रकाशित झाला. हा कथासंग्रह दलित ,पददलित ,मूकबधिर ,महिला अन्याय, शिक्षण समस्या, बेरोजगारी इत्यादी वर प्रकाशझोट टाकताना दिसतो .महात्मा फुले ,राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा विचार वारसा जपताना दिसतो .
या कथासंग्रहास प्राध्यापक डॉक्टर मिलिंद कसबे यांची प्रस्तावना लाभली असून हा कथासंग्रह पुस्तक मार्केट डॉट कॉम या मोबाईल ॲप वर मोफत वाचण्यास उपलब्ध आहे.रमेश जावीर चित्रकला ,शिल्पकला ,बरोबरच साहित्य लेखन ही दमदार करतात. त्यांना यापूर्वीही महाराष्ट्र शासनाबरोबरच इतर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत .
हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल साहित्यिक सुनील दबडे, कवी शिवाजीराव बंडगर, कथाकार साहेबराव चवरे ,डॉक्टर रामदास नाईक नवरे , मेघा पाटील इत्यादी मानदेशी साहित्यिक मंडळींनी हार्दिक अभिनंदन केले. या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


