अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त थंड हवेचे कुलर चे वाटप…सभापती पृथ्वीराज पाटील, विद्याताई मोटे,सरपंच सुरज पाटील यांची प्रमुख उपस्थिती
माणगंगा न्युज
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त साध्य फाऊंडेशन व विभुतवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सुरज पाटील यांच्या पुढाकाराने गरजू नागरिकांना 75 थंड हवेचे कुलर वितरण करण्यात आले.
सांगली जिल्हा परिषदेचे बांधकाम व अर्थ सभापती पृथ्वीराज तानाजीराव पाटील, साध्य फाउंडेशनच्या आध्यक्षा विद्याताई मोटे , सरपंच सुरज पाटील यांच्या हस्ते कुलरचे वाटप करण्यात आले.यावेळी ग्रामसेवक, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ,ग्रामपंचायत कर्मचारी ,नागरिक व ग्रमस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


