*श्री संत सेना महाराज समाजाची नागरिक पतसंस्था, चाळीसगावच्या चेअरमनपदी शंकर हिरामण सैंदाणे बिनविरोध*
*चाळीसगाव,
श्री संत सेना महाराज समाजाची नागरिक पतसंस्था मर्या., चाळीसगावच्या चेअरमनपदी शंकर हिरामण सैंदाणे यांची सर्व संचालकांच्या एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. समाजाचे अध्यक्ष शिवाजी भाऊ बहाळकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संचालक मंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत चेअरमनपदाच्या निवडीचा विषय चर्चेला घेण्यात आला.
उपस्थित सर्व संचालकांनी शंकर हिरामण सैंदाणे यांच्या नावाला एकमुखी पाठिंबा दिला व त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश महाले, संचालक लोटन सोनवणे, भिकन बागुल, अशोक चित्ते, गोरख गोफने, प्रवीण अहिरे, श्याम अहिरे, सुभाष महाले, मंगलाबाई अहिरे, कल्पनाबाई सैंदाणे, व्यवस्थापक विजय मोरे तसेच कर्मचारी रेखाबाई वाडेकर, आबासाहेब सैंदाणे आदी उपस्थित होते. नवनिर्वाचित चेअरमन सैंदाणे यांनी सर्वांचे आभार मानून संस्था हितासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही दिली. अध्यक्ष बहाळकर व सर्व संचालकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


