गॅस एजंसी वाल्याची दबंगगिरी. तुमच्या गावात गाडी येणार नाही,गरज असेल तर 5 ते 10 की.मी वरून सिलेंडर घेऊन जा, ड्रायव्हर च्या उर्मट बोलण्याने ग्राहक त्रस्त…
. झरे ता.आटपाडी येथील परिसरामध्ये भारत गॅस, इंडियन गॅस च्या गाड्या येत असतात. तर झरे परिसरामध्ये पारेकरवाडी, पडळकरवाडी, पिंपरी बुद्रुक ,तरसवाडी, विभूतवाडी व माण तालुक्यातील काही वाड्या यांचा समावेश होतो. आटपाडी व माण तालुक्यातील बारा वाड्या वस्त्याची झरे ही मोठी बाजारपेठ आहे.
झरे येथे दवाखाने ,बँकेचे व्यवहार तसेच आठवडी बाजार, हायस्कूल, जूनियर, सीनियर कॉलेज असल्याने व कराड पंढरपूर महामार्गावर गाव असल्याने तसेच माण तालुक्यातून झऱ्यातूनच खरसुंडी ला जाणारा रस्ता असल्याने या गावांमध्ये सतत वर्दळ असते. बाजारपेठेचे मोठे गाव असल्याने या गावांमध्ये अनेक उलढाली होत असतात, तर याच गावांमध्ये भारत गॅस एजन्सी म्हसवड ,भारत गॅस एजन्सी खरसुंडी, एचपी गॅस एजन्सी दिघंची व इंडियन गॅस एजन्सी आटपाडी या एजन्सीच्या सिलेंडरच्या गाड्या येथे येत असतात.
झरे ही मोठी बाजारपेठ आहे या बाजारपेठेच्या अवतीभवती दहा ते बारा गावे (वाड्या )आहेत. येथेच सर्व गॅस एजन्सीच्या वाहतूक करणाऱ्या गाड्या येत असतात काही गॅस वाहतूक करणाऱ्या गाड्या प्रत्येक गावात जातात.तर शुभम गॅस एजन्सी चे कामगार वाड्या वस्त्यावर गॅस पुरवत नाहीत.गरज असेल तर झरे तून सिलेंडर घेऊन जावा अन्यथा सिलेंडर मिळणार नाही अशी भाषा वापरतात.
तर ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाच्या घरी दुचाकी गाडी आहे असे होत नाही अनेकांना दुचाकी सुद्धा गाडी नाही त्यांनी सिलेंडर न्यायचा कसा हा मोठा घनप्रश्न आहे.परंतु अलीकडच्या काळामध्ये बुकिंग असल्याशिवाय गॅस मिळत नाही परंतु वाड्यावस्तीच्या नागरिकांनी बुकिंग करून सुद्धा त्यांना गॅस मिळेना अशी अवस्था झाली आहे. शुभम गॅस एजन्सी म्हसवड या एजन्सीकडे अनेक ग्राहकांनी बुकिंग केले असतानाही तुम्ही झरे येथेच येऊन सिलेंडर घेऊन जावा असे सांगितले जाते. ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाच्या घरी दुचाकी नसते, आणि कुटुंबामध्ये महिलाच कुटुंबप्रमुख असतात .त्यांनी चार ते पाच किलोमीटर वरून सिलेंडर न्यायचा कशाने व भरलेला सिलेंडर आणायचा कशाने हा गंभीर प्रश्न आहे. परंतु शुभम गॅस एजन्सी यांच्याकडे बुकिंग असून सुद्धा तुम्ही झरे येथेच येऊन गॅस सिलेंडर घेऊन जावा अन्यथा गॅस मिळणार नाही अशी उर्मट भाषा ग्राहकांना केली जात आहे.
शुभम गॅस एजन्सी म्हसवड यांची गॅसची गाडी आठवड्यातून दोन वेळा येत असते. मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी सिलेंडरची गाडी येत असते. परंतु नागरिकांना त्याच्या गावांमध्ये सिलेंडर पोहच केला जात नाही .याबाबत अनेक वेळा तक्रारी होऊन सुद्धा कामगार कोणाचेही ऐकत नाहीत.
तुम्हाला सिलेंडर घेऊ वाटला तर घ्या अन्यथा घेऊ नका अशी उत्तरे दिली जात आहेत.गॅस एजन्सीचे मालक व कामगार यांच्या उर्मट बोलल्याने झरे परिसरातील बारा वाड्या वस्त्या वरील नागरिकांना गॅस बुकिंग असून सुद्धा मिळत नाही. तरी वरील प्रकारची चौकशी करून गॅस एजंसी वाल्याला समस द्यावी अशी मागणी गॅस धरकातून होत आहे.


