• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

वैफल्यग्रस्त प्रशांत जगताप यांचे बेछुट आणि बिनबुडाचे आरोप – संदीप खर्डेकर यांचा घणाघात.

माणगंगा by माणगंगा
September 3, 2021
in मुंबई
0
वैफल्यग्रस्त प्रशांत जगताप यांचे बेछुट आणि बिनबुडाचे आरोप – संदीप खर्डेकर यांचा घणाघात.

वैफल्यग्रस्त प्रशांत जगताप यांचे बेछुट आणि बिनबुडाचे आरोप – संदीप खर्डेकर यांचा घणाघात.

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

पुणे: अमेनिटी स्पेस च्या विषयावरून राष्ट्रवादीत माजलेले रणकंदन, स्थायी समिती सदस्यांसह पक्षादेश धुडकावणारे नगरसेवक आणि महापालिकेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच दिसू लागलेला पराभव,यामुळे राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष प्रशांत जगताप वैफल्यग्रस्त झाले असून आपले अपयश लपविण्यासाठी बेछुट आणि बिनबुडाचे आरोप करत आहेत अशी घणाघाती टीका भाजप चे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी केली आहे.

वस्तूत: भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी ने पुणे शहरात कामांचा धडाका लावला असून 2017 च्या निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करत आणली आहेत.कोरोना च्या संकटकाळात अभूतपूर्व सेवाकार्य करणारे भाजप चे लोकप्रतिनिधी आपापल्या प्रभागात सामान्य पुणेकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी झाले आहेत. येवढेच नव्हे तर पुणेकरांचे मेट्रो चे स्वप्न देखील साकार होतं आहे. अश्या परिस्थितीत येत्या मनपा निवडणुकीत पुणेकर पुन्हा एकदा भाजप ला पसंती देतील हे लक्षात आल्यामुळे प्रशांत जगताप आपले अस्तित्व टिकविण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना लक्ष्य करत आहेत, मात्र या प्रयत्नात आपलेच हसू होतं आहे हे त्यांच्या लक्षात येत नसावे. खरेतर राजकीय सभ्यतेनुसार त्यांनी त्यांच्या बरोबरीच्या नेत्यांवर टीका केली तर एकवेळ समजून घेता येईल पण थेट भाजप प्रदेशाध्यक्षांवर आरोप करताना त्यांना सभ्यतेचे ही भान राहिलेले नाही.

राज्यात त्यांचा पक्ष सहभागी असलेल्या महाभकास आघाडी चे सरकार आहे आणि हे सरकार कश्या पद्धतीने सुडाचे आणि गलिच्छ राजकारण करत आहे ते मा. नारायण राणे प्रकरणात देशाने बघितले आहे, त्यामुळे त्यांना पुणे महापालिकेतील कोणत्याही विषयाची चौकशी करायची असेल तर त्यांनी सत्तेचा दुरुपयोग करून खुशाल करावी त्यास आम्ही योग्य प्रत्युत्तर देऊच, मात्र ते करताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर आरोप करताना त्यांनी संयम बाळगावा असा सल्ला ही संदीप खर्डेकर यांनी दिला आहे. विकास कामांमध्ये अडथळे आणण्याचे सर्व प्रयत्न हाणून पाडले जातील असेही खर्डेकर म्हणाले.

आपल्याच पक्षातील ज्येष्ठ अश्या खासदार वंदनाताईंच्या निर्णयांचा अनादर करणारे प्रशांत जगताप महापौर राजीनामा देणार होते असा कापोलकल्पित दावा करतात हे हास्यास्पद असल्याचे ही खर्डेकर म्हणाले.प्रशांत जगताप यांचा केवळ प्रसिद्धी साठी सारा खटाटोप असून मोठ्या नेत्यांवर बोलले की वारेमाप प्रसिद्धी मिळते आणि आपले अपयश ही झाकता येते असा त्यांचा गैरसमज झाला आहे, ह्या कल्पनाविलासातून त्यांनी लवकर बाहेर यावे वा काहीतरी सकारात्मक कार्य करावे असा सल्ला ही खर्डेकर यांनी दिला आहे.

Views: 157
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
पत्नीच्या रक्षाविसर्जना दिनीच पतीचे निधन

पत्नीच्या रक्षाविसर्जना दिनीच पतीचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)