• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

तर उद्धवपंतांनी पक्षभेद आणि जुने राग विसरून देवेंद्र फडणवीसांच्या पाठीशी उभे राहायला हवे…;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
June 28, 2026
in Uncategorized
0
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

*तर उद्धवपंतांनी पक्षभेद आणि जुने राग विसरून देवेंद्र फडणवीसांच्या पाठीशी उभे राहायला हवे…*;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरेंच्या शिल्लक शिवसेनेतले सहा खासदार फुटले आणि शिंदेंच्या अधिकृत शिवसेनेत दाखल झाले. माध्यमांनी त्याचा उल्लेख “ऑपरेशन टायगर” असा केला.

मात्र उद्धवपंत ठाकरेंना तो मान्य नाही. त्यांच्या मते हे “ऑपरेशन टायगर” नसून “ऑपरेशन देवेंद्र फडणवीस” आहे.काल मराठवाड्यातील हिंगोली येथे जाहीर सभेला संबोधित करताना उद्धवपंत म्हणाले की देवेंद्र फडणवीस उद्या भविष्यात पंतप्रधान पदावर दावा सांगू शकतील ही अमित शहांना भीती वाटते आहे. त्यामुळे त्यांचे पंख छाटण्यासाठी अमित शहा एकनाथ शिंदेंना बळ देऊन देवेंद्र फडणवीस यांचे खच्चीकरण करत आहेत. जेणेकरून भविष्यात त्यांनी पंतप्रधानपदाचा विचार सुद्धा करू नये.

यावरून एक बाब सिद्ध आणि स्पष्ट होते की देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधानपदाचे दावेदार होऊ शकतात, त्यांच्यात ती क्षमता आहे, हे उद्धवपंत मान्य करतात. कारण त्यांच्या मते देवेंद्र फडणवीस हे एरवी कामातून गेलेले व्यक्तिमत्व आहे, त्याला भाजप मुख्यमंत्रीच का करते हा प्रश्न उद्धवपंतांना पडलेला दिसतो.

त्यामुळे त्याच उद्धवपंतांनी देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान पदाचे दावेदार होऊ शकतात हे मान्य करावे यातच सर्वकाही आले. तशा परिस्थितीत उद्धवपंत ठाकरेंनी सर्व पक्षभेद विसरून आणि जुने रागलोभ, कथित धोकेबाजी विसरून देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी उभे राहायला पाहिजे.तुम्ही म्हणाल, आज त्या दोघांमधून विस्तव देखील जात नाही. उद्धवपंत जाहीर सभांमधून देवेंद्र फडणवीस यांचा एकेरीत उल्लेख करून अक्षरशः शिवीगाळ करतात.

त्यांनी तरीही देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान करण्यासाठी पाठिंबा का द्यावा आणि कंबर का कसावी?याचे उत्तर अगदी सरळ आणि सोपे आहे. शिवसेना ही मराठी माणसाचे हितसंरक्षण करण्यासाठी स्थापन झालेली संघटना आहे. शिवसेनेचे संस्थापक आणि उद्धवपंतांचे वडील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे मराठी माणूस देशात सर्वोच्च पदी पोहोचावा हे स्वप्न होते. बाळासाहेब यांनी नेहमीच काँग्रेसला विरोध केला होता. मात्र २००७ मध्ये देशाच्या राष्ट्रपतीपदी मराठी कुटुंबातील महिला बसणार आहे हे दिसल्यावर बाळासाहेबांनी पक्षभेद विसरून प्रतिभाताई पाटील यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला होता, आणि शिवसेनेच्या सर्व लोकप्रतिनिधींनी त्यांची त्यावेळी भाजपशी युती असताना आणि भाजपने प्रतिभा पाटील यांच्या विरोधात भैरोसिंह शेखावत यांना उतरवले असतांनाही काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा पाटील यांना मतदान केले होते.

एक मराठी कुटुंबातील महिला देशाच्या सर्वोच्च संवैधानिक पदावर पोहोचते आहे याचा आम्हाला आनंद आहे, आणि त्यावेळी आम्ही पक्षभेद बाजूला ठेवणार असे बाळासाहेबांनी अभिमानाने जाहीर केले होते. शरद पवार जर पंतप्रधान होणार असतील तर त्यांनाही आम्ही पाठिंबा देऊ कारण शेवटी ते मराठी आहेत हेच बाळासाहेब म्हणायचे.आजवर देशाच्या पंतप्रधानपदी एकही मराठी माणूस पोहोचू शकलेला नाही. आधी नेहरूंच्या काळात चिंतामणराव देशमुख हे तितकेच सक्षम नेतृत्व होते. मात्र ते राजकारणामुळे बाजूला पडले होते. नंतर यशवंतराव चव्हाण हे देखील पंतप्रधानपदाचे दावेदार होते. त्यांनाही अखेरपर्यंत संधी मिळाली नाही. शरद पवार तर पंतप्रधान पदाचे स्वप्न बघत बघत म्हातारे झालेले आहेत.

त्यासाठी त्यांनी अनेक राजकीय कसरती देखील केल्या. मात्र त्यांना ते यश मिळू शकलेले नाही. भारतीय जनता पक्षात प्रमोद महाजन हे देखील एक पंतप्रधान पदाचे मटेरियल म्हणून ओळखले जात होते. मात्र त्यांच्या अकाली हत्येमुळे ते नाव बाजूला पडले. त्यानंतर २०१० मध्ये नितीन गडकरी जेव्हा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले, तेव्हा गडकरी देखील भविष्यात पंतप्रधान पदाचे दावेदार होऊ शकतात असे बोलले जाऊ लागले. मात्र दिल्लीतल्या राजकारणामुळे ते बाजूला फेकले गेले. नंतर गोपीनाथ मुंडेंचे देखील नाव घेतले होते,

पण त्यांचाही अपघाती मृत्यू त्यांचे नाव बाजूला टाकण्याला कारणीभूत ठरला. आता जर देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून ओळखले जाणार असतील, तर उद्धव ठाकरेच काय पण प्रत्येक मराठी माणसाने त्याचे स्वागतच करायला हवे. फडणवीस हे उच्चविद्याविभूषित तसेच चतुर आणि अनुभवी राजकारणी आहेत. आपली राजकीय क्षमता आणि चाणक्य नीति त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात वेळोवेळी सिद्ध केलेली आहे. आज नरेंद्र मोदी नंतर भाजपमध्ये पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून जी दोन-तीन नावे घेतली जातात, त्यात फडणवीसांचेही नाव अग्रक्रमाने घेतले जाते. अशावेळी जर फडणवीस पंतप्रधान होणार असतील तर एक मराठी माणूस म्हणून उद्धव ठाकरेंनी सर्व झाले गेले विसरून त्यांना पाठिंबा द्यायला हवा, नव्हे त्यांच्यासाठी कंबर कसायला हवी. आता संजय राऊत म्हणतील की मराठी माणसाला पंतप्रधान करायचे तर फडणवीसच का?

आम्ही शरद पवारांना करू किंवा मग उद्धव ठाकरेंनाच करू. मात्र शरद पवार यांना पंतप्रधान करण्याचे अनेक प्रयोग यापूर्वी फसलेले आहेत. आता विरोधी पक्षातील ही कोणी त्यांना पंतप्रधान म्हणून पुढे करायला तयार नाहीत हे स्पष्ट झाले आहे, आणि ज्या पक्षाचे २०२४ मध्ये फक्त नऊ खासदार निवडून आले आणि आता फक्त तीन खासदार उरले आहेत, त्या शिल्लक शिवसेना या पक्षाच्या नेत्याने पंतप्रधान पदाचे स्वप्न बघणे हे दिवा स्वप्न बघण्यासारखेच होईल. त्याचवेळी फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. आज त्या पक्षाचे २५० च्या आसपास खासदार आहेत. यापूर्वी ते ३०० च्या वरही गेले होते. भविष्यातही तो आकडा ३०० च्या वर जाऊ शकतो. २०२४ मध्ये फडणवीस यांनी महाराष्ट्र पिंजून काढत महायुतीला दणदणीत यश मिळवून दिले होते. संधी मिळाली तर ते संपूर्ण देश पिंजून काढू शकतात.

आजही भाजपचे स्टार प्रचारक म्हणून ते देशभर प्रचार दौरे करतातच. त्याशिवाय भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्यांना समर्थन आहे. अशावेळी जर संघ आणि भाजप ठरणार असेल आणि त्यावेळी अमित शहा फडणवीसांचे पंख छाटण्याचा प्रयत्न करणार असतील, तर त्यावेळी मराठी माणूस पंतप्रधान होतो आहे म्हणून उद्धवपंतांनी फडणवीसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे आणि अमित शहांना मराठी माणसाची ताकद दाखवून द्यायला हवी. तसे झाले तर एक मराठी माणूस पंतप्रधानपदी पोहोचू शकेल आणि मराठी माणूस पंतप्रधानपदी पोहोचला तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न निश्चितच साकार झालेले असेल आणि त्यासाठी हातभार लावला म्हणून ते निश्चितच स्वर्गातून उद्धवपंतांची पाठच थोपटतील यात शंका नाही. अर्थात हे मला जे काही वाटलं ते मी लिहिलं आहे……. तुम्हाला पटतेय का ते बघा…!

Views: 32
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post

आमदारांच्या सूचनेला केराची टोपली! आर्णीच्या गटविकास अधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार..!ॲड. पंडित राठोड यांची ग्रामविकास मंत्र्यांकडे थेट तक्रार;

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)