आर्यारवी एंटरटेनमेंट’ च्या वतीने पत्रकार सदाशिव पुकळे यांना निर्भीड पत्रकार पुरस्कार जाहीर
माणगंगा न्युज
आर्यारवी एंटरटेनमेंट’ च्या वतीने आटपाडी तालुक्यातील पत्रकार सदाशिव पुकळे यांना निर्भीड पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आर्यारवी एंटरटेनमेंट’ आयोजित पत्रकार, मुक्त पत्रकार, संपादक, कला, साहित्य, समाजसेवक पुरस्कार सोहळा 2026′ आयोजकः सन्माननीय श्री. महेश्वर भिकाजी तेटांबे (सिने-नाट्य अभिनेते, दिग्दर्शक, पत्रकार) पुरस्कार स्वरूप-‘स्वाभिमान लेखणी’ पुरस्कार, ‘शब्दवेध गौरव’ पुरस्कार, ‘अजेय लेखणी’ पुरस्कार, ‘कलम-रत्न’ पुरस्कार, ‘साहित्य-संस्कृती जीवनगौरव पुरस्कार, ‘विवेक-दीप’ पुरस्कार, ‘कलागौरव’ पुरस्कार, ‘जनसेवा रक्षक’ पुरस्कार, ‘निर्भीड पत्रकारिता पुरस्कार देण्यात येणार आहेत
पुरस्कार वितरण सोहळा-रविवार दि. १२ जुलै, २०२६ रोजी सकाळी ठीक ९.३० ते १.०० वाजेपर्यंत. सुरेंद्र गावस्कर हॉल, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर (पूर्व), मुंबई – ४०००१४ येथे होणार आहे.पुरस्कार विजेत्यांची नावे ‘निर्भीड पत्रकारिता’ पुरस्कार सन्माननीय श्री. प्रा. डॉ.बी. एन. खरात पत्रकार, समाजसेवक, सन्माननीय श्री दत्ता खंदारे (पत्रकार, संपादकः सा. भगवे वादळ), सन्माननीय दिलीप शेडगे (पत्रकार, संपादकः सा. रत्नागिरी वृत्तांत), सन्माननीय श्री. मोहन भारती (संपादक पोर्टल लोकदर्शन), सन्माननीय श्री. कैलास राजाराम रांगणेकर (संपादक – दै. चौफेर संघर्ष), सन्माननीय श्री. सोपान बुडबाडकर (पत्रकार, समाजसेवक), *सन्माननीय पत्रकार श्री. सदाशिव पुकळे* सन्माननीय श्री. कमलाकर सोन कांबळे (संपादक- दै. यश सिद्धी न्यूज),सन्माननीय श्री. जगदीश पद्माबाई पांडुरंग अडसुळे, नाशिक (संपादक एम बी न्यूज 24 तास), सन्माननीय शुभांगी पासेबंद (पत्रकार, समाजसेवक), सन्माननीय श्री. तुषार गौतम नेवरेकर (पत्रकार, संपादकः दिशा महाराष्ट्राची) या सर्व पत्रकारांना पुरस्कार प्रधान करण्यात येणार आहेत.


