गोंदवलेच्या मुख्य चौकातील धोकादायक झाडामुळे अपघाताचा धोका;आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर तातडीने फांद्या छाटण्याची मागणी
दहिवडी प्रतिनिधि :
गोंदवले येथील मुख्य चौकात दहिवडी -कडील मार्गा लगत असलेले एक मोठे झाड सध्या पूर्णपणे रस्त्याच्या दिशेने झुकलेअसून, त्यामुळे वाहन चालक, पादचारी आणि भाविकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.सध्या सुरू असलेल्या पावसाळी हंगामात तसेच वादळी वाऱ्याच्या परिस्थितीत या झाडांच्या मोठ्या फांद्या तुटून रस्त्यावर कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळेकोणतीही जीवित हानी किंवा गंभीर अपघात घडण्यापूर्वी संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
गोंदवले हे संत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज त्यांच्या पवित्र स्थळामुळे राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. विशेषतः आषाढी वारीच्या काळात पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांची तसेच दर्शनसाठी येणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ या मार्गावर असते, मुख्य चौकातून दिवसभर दुचाकी, चार चाकी, एसटी बस, मालवाहतूक वाहने आणि पायी जाणाऱ्या नागरिकांची सतत ये -जा सुरू असते.अशा ठिकाणी रस्त्याकडे झुकलेले झाड भविष्यात मोठ्या दुर्घटनेचे कारण ठरू शकते. स्थानिक नागरिकांनी सांगितले की पावसाळ्यात जोरदार वारे वाहत असतात झाडांच्या फांद्या मोठ्या प्रमाणावर हलताना दिसतात.जर अशावेळी एखादी मोठी फांदी रस्त्यावर कोसळली तर वाहनांचे नुकसान होण्याबरोबरच निष्पाप नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. प्रशासनाने दुर्घटना घडल्यानंतर कारवाई करण्याऐवजी प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे अधिक आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे
, सार्वजनिक बांधकाम विभाग, संबंधित ग्रामपंचायत तसेच इतर संबंधित यंत्रणांनी संयुक्तपणे पाहणी करून झाडांच्या धोकादायक फांद्यांची तातडीने छाटणी करावी, तसेच आवश्यक असल्यास सुरक्षेच्या दृष्टीने योग्य उपाय योजना कराव्यात, अशी मागणी, परिसरातील नागरिक, वाहन चालक आणि भाविकांकडू करण्यात येत आहे.
रस्ते सुरक्षित ठेवणे ही संबंधित यंत्रणाची प्राथमिक जबाबदारी आहे. संभाव्य धोके वेळेत ओळखून त्यावर उपाय योजना केल्या मोठी दुर्घटना टाळता येऊ शकते. विशेषतः आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर गोंदवले येथे भाविकांची संख्या प्रमाणात वाढत असल्याने या धोकादायक झाडाकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही.प्रशासनाने त्वरित प्रत्यक्ष पाहणी करून झाडांच्या धोकादाय फांद्यांची छाटणी करावी आणि नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून होत आहे. अपघात होण्याची वाट न पाहता, प्रतिबंधात्मक कारवाई करून सुरक्षित वाहतूक व्यवस्था सु निश्चित करणे हीच काळाची गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे.


