• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

स्पष्ट आणि परखड;देवेंद्र फडणवीसांविरुद्ध सुरू असलेली व्यर्थ कोल्हेकुई;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
July 11, 2026
in Uncategorized
0
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

*स्पष्ट आणि परखड*;*देवेंद्र फडणवीसांविरुद्ध सुरू असलेली व्यर्थ कोल्हेकुई*;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.चार-पाच दिवसांपूर्वी महाराष्ट्र विशेषतः मुंबई पुणे परिसरात मुसळधार पाऊस कोसळला. परिणामी मुंबई आणि पुणे अक्षरशः ठप्प झाले होते. त्यातच महाराष्ट्र शासनाने मुंबई आणि पुण्यातील अंतर कमी व्हावे म्हणून नव्याने जो मिसिंग लिंक रोड तयार केला आहे, त्याच्यावर बाजूच्या डोंगरातील दरड कोसळली. परिणामी तो रस्ता बंद झाला. ही घटना घडतात राज्यातील विरोधी पक्ष अक्षरशः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तुटून पडले.

या मिसिंग लिंक रोडला तयार करण्यासाठी ७००० कोटींचा खर्च झाला आहे. हा खर्च पाण्यात गेला असा आरोप विरोधक करत होते. इतकेच काय पण समाज माध्यमावर फडणवीसांवर टीका करणारे अनेक व्हिडिओज आणि अनेक पोस्ट देखील व्हायरल होत होत्या.राज्य सरकारने प्रयत्न यांची शिकस्त करून १८ तासात त्या दरळीमुळे मिसिंग लिंक रोडवर जमा झालेला मलबा हटवला आणि त्या रस्त्यावरून वाहतूक पुन्हा पूर्ववत सुरू झाले. यामुळे जे काही रस्त्याचे नुकसान झाले असेल त्याची जुजबी दुरुस्ती केली जाईलच.

हा मिसिंग लिंक रोड एरवी अगदी व्यवस्थित आहे ७००० कोटी रुपये कोणत्याही पाण्यात गेलेले नाहीत.सध्या विधिमंडळाचे अधिवेशन मुंबईत सुरू आहे. तिथे विरोधकांनी याच मुद्यावर स्थगन प्रस्ताव आणला आणि नियम २९३ अन्वये चर्चा घडवून आणली. तिथेही फडणवीसांवर जोरदार आरोप केले गेले. या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे सर्व आरोप तर खोडून काढलेच पण विरोधकांना खडे बोल देखील सुनावले. त्यांच्या त्या भाषणावरच आता टीका होत असून फडणवीसांनी भाषणाची आणि सुसंस्कृतपणाची पातळी सोडली असा आरोप होत आहे. एका महाभागाने समाज माध्यमांवर लिहिले आहे की एरवी फडणवीस हे पंतप्रधान पदाचे दावेदार होते.

पण आता जेव्हा ते मैदानात उतरतील त्यावेळी त्यांच्या याच भाषणातील काही वाक्य देशभरात ऐकवली जातील आणि फडणवीसांचा पुढचा मार्ग बंद केला जाईल. त्याशिवाय देखील फडणवीसांवर अनेक वेगवेगळे आरोप होत आहेत. आता फडणवीस सभागृहात बोलले त्यापेक्षा कितीतरी पातळी सोडून संजय राऊत दररोज सकाळी नऊ वाजता बोलतात. हा मुद्दा जेव्हा मी चर्चेत उपस्थित केला तेव्हा काही मित्रांनी असा मुद्दा मांडला की राऊत सभागृह बाहेर बोलतात आणि फडणवीस सभागृहात बोललेले आहेत.

ते सभागृहाच्या रेकॉर्डवर आलेले आहे. त्यामुळे ते आता नाकारता येणार नाही. म्हणजे रस्त्यावर तुम्ही कितीही शेण खाल्ले तरी चालेल, सभागृहात मात्र तुम्हाला कोणीही काहीही बोलणे तरी तुम्ही शांतच राहायला हवे अशी अपेक्षा लोक करतात. त्यामुळे मी फडणवीसांचे ते पूर्ण भाषण पुन्हा एकदा ऐकले. त्यात फडणवीसांनी मला हव्या तेवढ्या शिवाय शिव्या घाला पण महाराष्ट्राचा अपमान करू नका असे एक वाक्य म्हटले आहे. शिल्लक शिवसेनेचे एक आमदार भास्कर जाधव यांनी माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणजे महाराष्ट्र आहे काय असा प्रश्न उपस्थित केला. याशिवाय देखील फेसबुकवर अनेकांनी याच आशयाचे व्हिडिओ टाकलेले आहेत. राज ठाकरे देखील मुंबईत एका सभेत बोलताना याच आशयाचे वाक्य बोललेले माध्यमांनी दाखवले आहे. वस्तुतः फडणवीस यांनी मी म्हणजे महाराष्ट्र असे म्हटल्याचे मी तरी ऐकले नाही. तरीही आज त्यांच्या पक्षाचे १३२ आमदार निवडून आले आहेत. याशिवाय त्यांचेच मित्रपक्ष असलेले शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या दोघांच्याही जागा मिळवून महायुतीला २३२ आमदारांचे पाठबळ आहे.

त्यामागे फडणवीस यांचे नियोजन आणि मेहनत कारणीभूत आहे हे उभा महाराष्ट्र जाणतो. याचाच अर्थ महाराष्ट्रातील दोन तृतीयांश जनता त्यांच्या सोबत आहे असा काढता येतो. त्याचवेळी भास्कर जाधव यांच्या शिल्लक शिवसेनेचे विश्वप्रवक्ते संजय राऊत हे दररोज सकाळी नऊ वाजता शिवसेना म्हणजेच महाराष्ट्र ठाकरे परिवार म्हणजेच महाराष्ट्र असा दावा करत असतात, तोच दावा उद्धव ठाकरे आणि त्यांचे युवराज आदित्य ठाकरे देखील करतात. आता २८८ पैकी २० आमदार निवडून आणत देखील ठाकरे परिवार म्हणजे महाराष्ट्र असा दावा केला जात असेल तर आज महाराष्ट्रातील अर्ध्यापेक्षा अधिक जनता फडणवीस यांच्या पाठीशी असेल, तर फडणवीस म्हणजे महाराष्ट्र असे म्हणायला काय हरकत आहे? फडणवीस यांनी आपल्या भाषणात विरोधकांच्या थोबाडावर टिचून आम्ही १८ तासात मिसिंग लिंक रोडवर वाहतूक सुरू केली असे वाक्य बोलले आहे. थोबाडावर या शब्दावर फडणवीस विरोधकांचा आक्षेप आहे. त्यातही त्यांनी सभागृहात हे वाक्य बोलायला नको होते असेही म्हटले जात आहे.

सुमारे ३० वर्ष विधिमंडळात वृत्तांकन करताना विधिमंडळात कामकाजात संसदीय शब्द कोणते आणि असांसदीय कोणते याची बऱ्यापैकी माहिती मला आहे. त्या शब्दांच्या यादीत थोबाड हा शब्द असांसदीय असल्याचे मला तरी कुठे आढळले नाही. थोबाड म्हणजे तोंड त्यामुळे थोबाडात मारली असे सहज म्हटले जाते. काही जण तर मुस्कटात मारली असाही शब्दप्रयोग वापरतात. हे दोन्ही शब्द असांसदीय नाहीत. त्याचप्रमाणे मिसिंग लिंक वर दरड कोसळल्यावर फडणवीसांवर समाज माध्यमांवर टीका करणारे जे कोणी आहेत त्यांना फडणवीसांंनी भाडे के टट्टू म्हणून हिणवले आहे. त्यालाही विरोधकांचा आक्षेप आहे मात्र भाडेके टट्टू हा शब्द देखील असंसदीय या यादीत येत नाही. मुंबई पुण्याच्या शुद्ध मराठी भाषेत ही भाडोत्री माणसं असा त्याचा अर्थ होतो. आज सर्वच राजकीय पक्ष अशा प्रकारे समाज माध्यमांवर ट्रोल करण्यासाठी अशी भाडोत्री माणसं वापरत असतात. तो आजच्या जगाचा रिवाज आहे असे म्हटले तरी चालेल. मग त्यांना भाडेके टट्टू म्हटले तर विरोधकांच्या नाकाला मिरच्या का झोंबल्या हा देखील प्रश्न आहे. आपल्या भाषणात फडणवीसांनी या भाडेके टट्टूंना मी बघून घेईल अशी धमकी दिल्याचा आरोप होत आहे.

अशा धमक्या सभागृहाच्या भाषणात आणि सभागृहाबाहेर देखील विरोधकांना दिल्या जात असतात. शिल्लक शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवपंत ठाकरे यांनी फडणवीस यांना एक तर तू राहशील नाहीतर मी अशी खुलेआम धमकी दिली होतीच ना. संजय राऊत रोज सकाळी नऊ वाजता तोंडाला येईल त्या धमक्या देत असतात. नुकतेच त्यांचे सहा खासदार फुटले त्यावेळी त्यांनी त्यांना अगदी अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती. ज्यांनी फडणवीसांना ट्रोल केले आहे त्यांना संजय राऊत यांची ही शिवीगाळ खटकली नाही का? इथे मला एक जुना प्रसंग आठवतो. माझ्या आठवणी प्रमाणे २००१ किंवा २००२ च्या नागपुरातील हिवाळी अधिवेशनात भर सभागृहात भाजप सभागृह नेते गोपीनाथ मुंडे आणि तत्कालीन आघाडी सरकारमधले एक मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यात तू तू मै मै झाली होती. त्यावेळी पद्मसिंह पाटील अक्षरशः अश्लील हावभाव करत सभागृहात बोलले होते, आणि एकमेकांना खुलेआम धमक्या देखील दिल्या होत्या.

परिणामी पिठासीन अध्यक्षांनी हा संवाद सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकला होता. तरीही एका प्रसिद्ध मराठी दैनिकाने हा संवाद हक्कभंग होईल हा धोका पत्करुनही जसाच्या तसा छापला होता. तत्कालीन वाचकांना आणि पत्रकारांना हा प्रसंग निश्चितच आठवेल.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्यावर कायम टीका केली जात आहे. ते मुख्यमंत्री झाल्यावरच मराठा आरक्षणाचा प्रश्न उपस्थित करून तिथे आगीत तेल टाकले गेले. नंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तो प्रश्न थंड्या बस्त्यात गेला होता. पुन्हा शिंदे सरकार येताच फडणवीसांना त्रास देण्यासाठी तो वर काढला गेला. या आंदोलनात मराठा नेत्यांनी फडणवीसांनाच त्यांच्या जातीवरून देखील टारगेट केले होते. आम्ही तुला आरक्षण मागतोय तुझी बायको मागत नाही अशा भाषेत त्यांना ललकारले होते. जे फडणवीस यांचे विरोधक आज फडणवीसांकडून सुसंस्कृतपणाची अपेक्षा करतात, त्यांना हे प्रकार दिसले नाहीत का? आणि दिसले असतील तर त्यावेळी त्यांनी त्यावर टीका का केली नाही, याचेही उत्तर त्यांनी द्यायला हवे.

फडणवीस त्यांची जात आडवी येत असतानाही राजकारणात ज्या झपाट्याने पुढे आले ते त्यांच्या सर्वच राजकीय विरोधकांना खूपते आहे. त्यात विरोधक तर आहेतच, पण स्वपक्षीय देखील आहेत. तेच अशा ट्रोलर्सला उत्तेजन देत असावेत अशी शंका घ्यायला वाव आहे. मात्र काहीही असले तरी फडणवीस यांनी महाराष्ट्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. १९९० नंतर महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाला तीन आकड्यात आमदार निवडून आणता आले नव्हते.

२०१४ मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी महाराष्ट्रात प्रथमच भाजपचे १२२ आमदार निवडून आले होते. २०१९ मध्ये बंद खोलीतल्या खोट्या चर्चेचा आधार घेऊन जनादेशाशी जी गद्दारी केली गेली, तिचे उत्तर फडणवीसांनी त्यांच्या पद्धतीने दिले. नंतर त्यांनी महायुती गठीत करून २०२४ मध्ये २३२ आमदारांचे संख्याबळ आपल्या पाठीशी आणले, हेच अनेकांना खूपते आहे. त्यामुळेच हा पोटशुळ उठतो आहे.मात्र महाराष्ट्राची जनता सुजाण आहे. नीर क्षीर विवेकाने ती काम करते हे आतापर्यंत दिसून आले आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही कोल्हेकुई केली तरी ती व्यर्थच जाईल. फडणवीसांना काही फरक पडणार नाही हे नक्की.

Views: 37
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
भूमी अभिलेख कार्यालयाकडून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची पिळवणूक?मोजणी, नकाशे, हद्द निश्चितीसाठी महिनोनमहिने प्रतीक्षा; कर्मचारी टंचाई, अधिकारी अनुपस्थिती व एजंटगिरीच्या चर्चेमुळे संताप

भूमी अभिलेख कार्यालयाकडून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची पिळवणूक?मोजणी, नकाशे, हद्द निश्चितीसाठी महिनोनमहिने प्रतीक्षा; कर्मचारी टंचाई, अधिकारी अनुपस्थिती व एजंटगिरीच्या चर्चेमुळे संताप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)