• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, July 16, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

तळागाळातील पत्रकारांचा शोध आणि सन्मान हेच खरे समाजकार्य; आर्यारवी एंटरटेनमेंटचा पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न..!

माणगंगा by माणगंगा
July 14, 2026
in Uncategorized
0
तळागाळातील पत्रकारांचा शोध आणि सन्मान हेच खरे समाजकार्य; आर्यारवी एंटरटेनमेंटचा पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न..!

तळागाळातील पत्रकारांचा शोध आणि सन्मान हेच खरे समाजकार्य; आर्यारवी एंटरटेनमेंटचा पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न..!

मुंबई (प्रतिनिधी-महेश्वर भिकाजी तेटांबे)समाजातील तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या निर्भीड पत्रकारांचा आणि समाजासाठी झटणाऱ्या निस्वार्थ समाजसेवकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी ‘आर्यारवी एंटरटेनमेंट’च्या वतीने आयोजित पहिला भव्य ‘पत्रकार, मुक्त पत्रकार, संपादक, कला, साहित्य आणि समाजसेवक पुरस्कार सोहळा’ नुकताच मुंबईत अत्यंत उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला.

“महाराष्ट्रातील तळागाळातील लेखणीला सलाम” हा उदात्त हेतू उराशी बाळगून या प्रेरणादायी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दादर (पूर्व) येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर हॉलमध्ये हा सोहळा पार पडला. कार्यक्रमाची दिमाखदार सुरुवात प्रमुख अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. ‘आर्यारवी एंटरटेनमेंट’चे सर्वेसर्वा आणि या सोहळ्याचे मुख्य आयोजक श्री. महेश्वर भिकाजी तेटांबे यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याचा आढावा घेत मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत केले.

तर, डॉ. सूर्यभान डोंगरे यांनी आपल्या रसाळ आणि ओघवत्या वाणीने केलेल्या उत्कृष्ट सूत्रसंचालनाने उपस्थित पत्रकार आणि मान्यवरांची मने जिंकली.या सोहळ्याला अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली. जगप्रसिद्ध बोलके बाहुलाकार श्रीधर कीर, ‘कुटुंब रंगलंय काव्यात’चे सादरकर्ते प्रा. विसुभाऊ बापट, प्रसिद्ध कवी व साहित्यिक अरुण म्हात्रे, साहित्याचार्य पंढरीनाथ तामोरे, ज्येष्ठ पत्रकार गुरुनाथ तिरपणकर, ज्येष्ठ पत्रकार, समाजसेवक प्रभाकर तोडणकर, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते कांचन पगारे, अभिनेते, निर्माते दिलीप कांबळे, समाजसेवक अ‍ॅड. सुनिल भार्गवराम शिर्के, वैभव सुरेश कदम, ‘स्पेस रिअलटर्स’चे अतुल तोडकरी, कृष्णा काजरोळकर आणि अभिनेते अ‍ॅड. गौरव जयवंत पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून मंचावर उपस्थित होते.

या मान्यवरांच्या शुभहस्ते राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या गुणवंतांना त्यांच्या अलौकिक कार्याबद्दल ‘स्वाभिमान लेखणी’, ‘शब्दवेध गौरव’, ‘अजेय लेखणी’, ‘कलम-रत्न’, ‘साहित्य-संस्कृती जीवनगौरव’, ‘विवेक-दीप’, ‘कलागौरव’, ‘जनसेवा रक्षक’, आणि ‘निर्भीड पत्रकारिता’ यांसारख्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. “गावागावांतील पत्रकारांचा सन्मान हे जिकिरीचे काम” आपल्या मनोगतात ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी आयोजकांचे भरभरून कौतुक केले. ते म्हणाले, “महाराष्ट्रातील गावागावांत विखुरलेल्या पत्रकारांचा शोध घेऊन त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान करणे ही अत्यंत जिकिरीची बाब आहे, जी महेश्वर तेटांबे यांनी यशस्वीपणे साध्य करून दाखवली आहे.” प्रा. विसुभाऊ बापट यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाला सदिच्छा दिल्या. तर, जगद्विख्यात बोलके बाहुलाकार श्रीधर कीर यांनी महेश्वर तेटांबे यांच्या धाडसी वृत्तीचे कौतुक करताना सांगितले की, “हा पुरस्कार सोहळा वाखाणण्याजोगा असून, तो प्रत्येक पुरस्कारार्थीला समाजासाठी अधिक जोमाने काम करण्याची नवी प्रेरणा देईल.” ज्येष्ठ पत्रकार गुरुनाथ तिरपणकर यांनी आयोजनातील शिस्तप्रियतेचे कौतुक करत तेटांबे यांच्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.

या भव्य सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी अभिनेत्री लक्ष्मी गुप्ता, प्रियांका फणसोपकर, अभिनेता व दिग्दर्शक अविनाश घाडी, निलेश घाडी, निखिल कटारे, पत्रकार राहुल खरात, रघुनाथ ढोक, केतन भोज, छायाचित्रकार नरेंद्र भोसले आणि राहुल शिंदे यांचे विशेष योगदान आणि सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी अभिनेते अविनाश राऊत यांनी सर्वांचे आभार मानले. ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी गायलेल्या राष्ट्रगीताने या प्रेरणादायी, ऊर्जावान आणि अविस्मरणीय सोहळ्याची सांगता झाली.

Views: 9
Share

Related Posts

Uncategorized

झरे पंचक्रोशी जनता विद्यालय स्वच्छ सुंदर माझी शाळा अभियान मध्ये प्रथम  

July 16, 2026
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

आठवणींच्या हिंदोळ्यावर..स्नेहबंध बेगम परविन सुलतानांसोबतचे…ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

July 16, 2026
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

घ्या समजून राजेहो…रामदेव बाबांचे असे काय चुकले..?ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

July 15, 2026
पिक पाहणीचे अधिकार असलेले अधिकारीच शेतकऱ्यांना देताहेत ठेंगा!ई-पीक पाहणीसाठी हेलपाटे; वेळेत नोंदी होत नसल्याने अनुदान व पीकविम्यावर परिणाम
Uncategorized

पिक पाहणीचे अधिकार असलेले अधिकारीच शेतकऱ्यांना देताहेत ठेंगा!ई-पीक पाहणीसाठी हेलपाटे; वेळेत नोंदी होत नसल्याने अनुदान व पीकविम्यावर परिणाम

July 14, 2026
बालभारतीच्या राज्यस्तरीय सदस्यपदी गुणवंत शिक्षक श्री. जयसिंग अण्णा पाटील यांची निवड
Uncategorized

बालभारतीच्या राज्यस्तरीय सदस्यपदी गुणवंत शिक्षक श्री. जयसिंग अण्णा पाटील यांची निवड

July 14, 2026
सदगुरू कृषि महाविद्यालयात नाशिक सायकलिस्ट असोसिएशन च्या सायकलवरून पंढरीच्या दिंडीचे उत्साहात स्वागत.
Uncategorized

सदगुरू कृषि महाविद्यालयात नाशिक सायकलिस्ट असोसिएशन च्या सायकलवरून पंढरीच्या दिंडीचे उत्साहात स्वागत.

July 13, 2026
Next Post
बालभारतीच्या राज्यस्तरीय सदस्यपदी गुणवंत शिक्षक श्री. जयसिंग अण्णा पाटील यांची निवड

बालभारतीच्या राज्यस्तरीय सदस्यपदी गुणवंत शिक्षक श्री. जयसिंग अण्णा पाटील यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • झरे पंचक्रोशी जनता विद्यालय स्वच्छ सुंदर माझी शाळा अभियान मध्ये प्रथम  
  • आठवणींच्या हिंदोळ्यावर..स्नेहबंध बेगम परविन सुलतानांसोबतचे…ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • घ्या समजून राजेहो…रामदेव बाबांचे असे काय चुकले..?ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • पिक पाहणीचे अधिकार असलेले अधिकारीच शेतकऱ्यांना देताहेत ठेंगा!ई-पीक पाहणीसाठी हेलपाटे; वेळेत नोंदी होत नसल्याने अनुदान व पीकविम्यावर परिणाम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)