झरे पंचक्रोशी जनता विद्यालय स्वच्छ सुंदर माझी शाळा अभियान मध्ये प्रथम
झरे ता आटपाडी येथील पंचक्रोशी जनता विद्यालय, झरे यांनी ‘संत सोपान काका फाउंडेशन स्वच्छ सुंदर माझी शाळा अभियान २०२५ – २६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांकाचा मान पटकावला.
हा प्रतिष्ठेचा पुरस्कार सांगली येथील शांतिनिकेतन येथे आयोजित सांगली जिल्हा मुख्याध्यापक संघ सांगली व जि. प. माध्य. विभाग सांगली सभेच्या वेळी प्रदान करण्यात आला.
सांगली जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. संजयकुमार झांबरे व सचिव श्री. संतोष नाईक यांच्या हस्ते विद्यालयाला प्रशस्तीपत्रक, पदक व रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. देवानंद घोणते यांनी स्वीकारला. या यशाबद्दल जागृती सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था, झरेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. श्री. साहेबराव चवरे सर , उपाध्यक्ष श्री. भालचंद्र मेटकरी (बापू), सचिव श्री. भीमाशंकर स्वामी सर तसेच संस्थेच्या सर्व संचालकांनी मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
या पुरस्कार वितरण समारंभास सांगली जिल्ह्यातील अनेक शाळांचे मुख्याध्यापक व मुख्याध्यापिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच श्री. जयंत आसगावकर, शिक्षक आमदार श्री. भगवान आप्पा साळुंखे आणि माजी शिक्षक आमदार यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.
झरे पंचक्रोशी जनता विद्यालयाला मिळालेला हा मान संपूर्ण विद्यालय, संस्था, विद्यार्थी, पालक आणि झरे परिसरासाठी अत्यंत अभिमानाची बाब असून, भविष्यातही स्वच्छता, गुणवत्ता आणि सर्वांगीण विकासाची परंपरा कायम राखण्याचा निर्धार विद्यालयाने व्यक्त केले.श्री. हिंदुराव वाघमाेडे सरांची विज्ञान तालुका शिक्षक समितीच्या वतीने ऊपक्रम शील म्हणून निवड केल्याबद्दल प्रा. साहेबराव चवरे सरांनी अभिनंदन केले. प्रा. चवरे सरांनी मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी यांचे अभिनंदन केले.




