चिमुकल्या कडून स्वच्छतागृहाची स्वच्छता करून घेतली या तक्रारीबाबत शिक्षण विभागाचा अहवालच तयार झाला नाही…
आटपाडी पश्चिम भागामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्याकडून स्वच्छतागृहाची स्वच्छता करून घेतली स्वच्छता ग्रहांमध्ये पाणी मारत असताना त्याचे व्हिडिओ व फोटो व्हायरल झाले यावरून अनेक प्रसारमाध्यमातून बातमी प्रसिद्ध झाली या बातमीच्या अनुषंगाने त्या शिक्षकांना पंचायत समितीने बोलावून घेऊन सूचना दिल्या होत्या असे समजते .
याबाबत शिक्षणाधिकारी यांना विचारले असता मी खुलासा देतो असे म्हणाले त्यानंतर शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधला खुलासा अर्धवट आहे पूर्ण झाल्यानंतर देतो असे म्हणाले या गोष्टीला बरेच दिवस झाले तरी अद्याप शिक्षण विभागा ने याबाबतचा खुलासा पत्रकारांना दिलाच नाही.
या खुलासामागे नेमकं रहस्य काय दडले हेच समजायला मार्ग नाही शिक्षण विभाग खुलासा का देत नाहीत ज्या गावांमध्ये ही घटना घडली त्या गावातील सर्व शिक्षकांना शिक्षण विभागाने बोलावून घेतले होते त्यानंतर पुढे काय झाले हेच शिक्षण विभागाकडून समजत नसल्याने नक्की काय चर्चा झाली आहे किंवा काय सूचना दिली आहे याबाबत अद्याप शैक्षणिक विभाग खुलासा देण्यास टाळाटाळ करीत आहेत.






