राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाेलावली येत्या 8 सप्टेंबरला मुंबईतील पक्ष कार्यालयात बैठक !!
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारसाहेब यांनी विधानसभेच्या पराभूत उमेदवारांची बैठक बोलावली आहे. येत्या 8 सप्टेंबरला मुंबईतील पक्ष कार्यालयात ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडत आहे.
पुढच्या काही महिन्यात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. तसंच पाच महापालिकांच्या निवडणुका देखील पार पडत आहेत. त्या दृष्टीने या बैठकीत नेत्यांना काही महत्त्वाच्या सूचना तसंच विविध विषयांवर चर्चा होणे अपेक्षित आहेत. राज्यात जरी महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडत असल्याने स्थानिक पातळीवरचे निर्णय तिथल्या स्थानिक नेत्यांवर पक्ष सोपविण्याची शक्यता आहे.







