पुरातन मंदिर ढासल्याने चार मजूर गंभीर : जखमीपैकी एकाचा मृत्यू
म्हसवड/ प्रतिनिधी :
विरकरवाडी (म्हसवड ता माण)
जिल्हा सातारा येथे नवीन मायाक्का देवीच्या मंदिराचे बांधकाम सुरु असताना आज सोमवारी दुपारी साडेचारच्या दरम्यान जोरदार पाऊस आल्याने बांधकामांवर काम करणारे आठ कामगार नजिकच जुने मायाक्का देवीच्या मंदिराच्या आडोशाला बसले असताना जुने असलेले मायाक्काचे मंदिर हे शहाबाद फरशीचे गरडेल असलेले अचानक खाली कोसळले या मध्ये चार मंजुर गाडले गेले तर चार मजूर बाजूला होते ते पळाले जोरदार पावसात मंदिर पडल्याचा मोठा आवाज होताच गावांतील नागरीक मंंदिरराच्या दिशेने पळाले व मंदिराच्या मलब्यात अडकलेले चार मंजुर काढण्याचा प्रयत्न पावसात सुरु होते अखेर बर्याच वेळानंतर चारी ही मजुरांना बाहेर काढून म्हसवड येथील हाॅस्पिटल मध्ये उपचार सुरु असताना एका मजुरांचा मृत्यू झाला तर इतर तिघांवर उपचार सुरु आहेत.
म्हसवड पासुन चार किलोमीटर अंतरावर असलेल्या विरकरवाडी येथे म्हसवड नगरपालिकेच्या फंडातुन मायाक्का देवीच्या मंदिराचे बांधकाम सुरु होते ते बांधकाम फाऊंडेशन पर्यात आले असुन आज हि ते काम नेहमी प्रमाणे सुरू होते दुपारी पावणे तिनच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला म्हणून. या कामावर असलेले मंजुर जुण्या माय्याक्का मंदिराच््यया आडोसाला गेले होते साडे चारच्या सुमारास अचानक जोरदार आवाज. झाला त्यावेळी मंदिरात बसलेले चार जन गाडले गेले तर जे चौघे. मंदिराच्याकडेला होते ते पळाले व. आरडाओरड केल्यावर गावातील लोक मंदिराच्या दिशेने पळाले नजिकच जेसीबीचे काम सुरु होते
त्या जेसीबीने पर्सी लोखंडी अॅगल माती दगड बाजुला करुन चौघांना हि बाहेर काढले व हाॅस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले यावेळी उपचार सुरू असताना व्यकट पिराजी दुनवड वय ७० हा मयत झाला तर पिराजी खंडाचा कोळी २२ भंडारकोवढे सोलापूर महेश भोई व २३ सोलापूर उद्धव गंगाराम गुंडवड वय ५० तांदुळवाडी परभणी हे तिघे गंभीर तिघे जखमी झाले तर या मध्ये किरकोळ जखमी झालेले रामा नामदेव नरवडे ४०परभणी, दत्ता माणिक गुंडवड ४० परभणी, रवि नाथ बावडी ४० भंडाराकवठे सोलापूर , आदिलशहा कोतवाल ३० सोलापूर हे किरकोळ जखमी झाले या घटनुतुन सुखरुप बाहेर पडले तर यांनी आरडाओरड केल्याने गावातील लोक पावसात हि मंदिराच्या मलब्यात अडलेल्या वाचवण्यासाठी झटत होते
नजिकच जेसीबी उभा होता तो ही मदतीला घेऊन फरसी, अँगल, माती दगडे बाहेर काढत आत अडकलेली चौघे हि बाहेर काढून हाॅस्पिटल पर्यात नेमण्यासाठी माजी उपाध्यक्ष दिपक बनगर , रवि विरकर, आप्पा विरकर, हणमंत राखुंडे , लक्ष्मण कर्ले, लुनेश शिवाजी विरकर , सोपान जठरे आदी विरकरवाडी येथील तरुणांनी धाडसाने पुढे येवून आडकलेल्याचे जिव वाचवले. दरम्यान या अपघाताची म्हसवड पोलीस तपास करीत आहेत







