राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचे
प्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
विरळी ता.माण येथे शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर.महाराणी देवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी, सांगलीचे.पद्मभूषण डॉ.क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी कला महाविद्यालय, झरे तसेच मौजे विरळी यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष 2023- 24 चे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर दिनांक 6 जानेवारी ते 12 जानेवारी या सप्ताहामध्ये विरळी येथे पार पडत असून या शिबिराचा दुसरा दिवस आणि प्रबोधनाचा पहिला दिवस. आणि या पहिल्या दिवसाचे विचार पुष्पगुंपण्यासाठी ‘राष्ट्रनिर्मितीतील युवकांची भूमिका’ या विषयावरती बोलण्यासाठी आटपाडी येथील प्रा. बालाजी वाघमोडे उपस्थित होते.
बोलताना त्यांनी तथागत गौतम बुद्धांपासून, सम्राट अशोकापासून ते विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांपासून अण्णाभाऊ साठेंपर्यंत युगपुरूषांच्या व्यक्तींच्या कार्यांचा आढावा घेऊन आजच्या युवकांनी मोबाईलच्या जोखडातून बाहेर पडून या महापुरुषांचा आदर्श आपण घेतल्यास राष्ट्रनिर्मितीच्या कार्यामध्ये नक्कीच चांगले योगदान देऊ शकतो. आपण या शिबिरामध्ये ज्यांच्या प्रतिमेचे पूजन करतो त्या गाडगेबाबांनी दगडाचे टाळ करून समाजप्रबोधनाचे काम केलं.
गाव स्वच्छ करत असताना माणसांची मनं सुध्दा साफ करण्याचा आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून प्रयत्न केला. त्यांचाही आदर्श आपण आपल्या डोळ्यापुढे ठेवला पाहिजे आणि या सर्वांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून कार्य केल्यास आपण राष्ट्राच्या उन्नतीचे कार्य सहजरित्या पार पाडू शकतो.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून डॉ.चंद्रकांत गोरड उपस्थित होते. तसेच विरळी गावच्या सरपंच सौ.नीलमताई घुटुकडे, सौ. अंजना सकट, हणमंत घुटुकडे,प्रकाश काशीद, ग्रामपंचायत सदस्य अंजना सकट, तानाजी जमाले,किसन गोरड,जालिंदर गोरड, धनाजी गोरड, तसेच प्रभारी प्राचार्य पाटील आर. एच. , प्रा. पाटील एन. डी. , प्रा. खांडेकर एम.डी. , प्रा. देवकुळे डी.एस., प्रा. शिंगाडे एम. एस ., प्रा. सौ. माया माने, . प्रा. चोपडे के. एस. , श्री दत्ता सुळे विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच विरळी गावचे ग्रामस्थ खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. मुलाणी एस. डी. यांनी केले सूत्रसंचालन प्रा. सौ. काळेल आर. व्ही. यांनी केले तर आभार प्रा. खिलारी व्ही. ए. मानले.